Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NJROTC : कोण आहे 300 अमेरिकी नौदल कॅडेट्सचे नेतृत्व करणारी 17 वर्षीय रिद्धी चौहान? जाणून घ्या तिची रंजक कहाणी

भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनी रिद्धी चौहान या नेव्ही ज्युनियर रिझर्व्ह ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्स (NJROTC) मध्ये बटालियन कमांडिंग ऑफिसर आहेत. त्या पाण्याखालील रोबोट कार्यक्रमाचे नेतृत्वही करतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 15, 2026 | 04:27 PM
riddhi chauhan indian american girl commands 300 us navy cadets njrotc queens new york naval academy prep school

riddhi chauhan indian american girl commands 300 us navy cadets njrotc queens new york naval academy prep school

Follow Us
Follow Us:
  • जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली
  • अष्टपैलू नेतृत्व आणि तंत्रज्ञान
  • अध्यात्म आणि संस्कारांची शिदोरी

आज जागतिक स्तरावर भारतीय वंशाच्या तरुणाईने आपल्या बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुंदर पिचाई, सत्य नाडेला यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता थेट अमेरिकेच्या (America) संरक्षण आणि नौदल प्रशिक्षणापर्यंत पोहोचला आहे. सध्या अमेरिकेतून अशीच एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे, ज्याने प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचवली आहे. अवघ्या १७ वर्षांची भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनी रिद्धी चौहान हिने अमेरिकेत एक नवा इतिहास रचला आहे. न्यू यॉर्कमधील क्वीन्स भागात राहणारी रिद्धी बेंजामिन एन. कार्डोझो हायस्कूलच्या ‘नेव्ही ज्युनियर रिझर्व्ह ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्स’ (NJROTC) बटालियनची ‘बटालियन कमांडिंग ऑफिसर’ बनली आहे. हे या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांसाठी असलेले सर्वोच्च मानाचे पद आहे.

जेव्हा वयाच्या १७ व्या वर्षी इतर मुले आपल्या शाळेच्या अभ्यासाचे नियोजन करत असतात किंवा मोबाईल गेमिंगमध्ये व्यस्त असतात, तेव्हा रिद्धी चौहान पहाटे ७ वाजण्यापूर्वीच शाळेच्या परेड ग्राउंडवर हजर असते. आठवड्यातून चार दिवस ती कडक शिस्तीत सुमारे ३०० अमेरिकन कॅडेट्सच्या परेडचे आणि कठीण सरावाचे नेतृत्व करते. तिची ही कामगिरी पाहून अमेरिकेतील दिग्गज लष्करी अधिकारीही थक्क झाले आहेत. रिद्धीचे कुटुंब मूळचे राजस्थानमधील जयपूरचे आहे. तिचे आई-वडील रुचिका आणि दिलीप चौहान गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. आपल्या मुलीने मिळवलेल्या या यशाने चौहान कुटुंब अत्यंत भारावून गेले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fools Gold: जपानला समुद्रात समुद्राखाली 700 मीटरवर ‘अदृश्य सोने’; ज्वालामुखीच्या खडकांमध्ये अणू पातळीवर दडलेय अफाट सोने

निकालापासून ते रँकपर्यंत… प्रत्येक पद रिद्धीने कष्टाने मिळवले!

रिद्धी चौहानचा हा प्रवास सोपा नव्हता. तिने पहिल्याच वर्षी स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी NJROTC कार्यक्रमात प्रवेश घेतला होता. सुरुवातीला एक सामान्य कॅडेट म्हणून काम केल्यानंतर, तिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टप्प्याटप्प्याने बढती मिळवली. तिने ‘अकॅडमिक कमांडर’ (Academic Commander), ‘STEM कमांडर’, ‘प्लाटून लीडर’ (Platoon Leader) आणि ‘इन्स्पेक्शन कमांडर’ (Inspection Commander) अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आणि अखेर ती बटालियनची सर्वोच्च ‘कमांडिंग ऑफिसर’ बनली.

ती केवळ मैदानावरच हुशार आहे असे नाही, तर अभ्यासातही ती अव्वल आहे. शैक्षणिक कमांडर म्हणून काम करताना तिने आपल्या हायस्कूलच्या संघाला सलग दोन वर्षे ‘लीडरशिप अँड अकॅडमिक बाऊल’च्या दुसऱ्या फेरीत पोहोचवले. एवढेच नव्हे तर तिच्या नेतृत्वाखाली त्यांच्या युनिटने राष्ट्रीय शैक्षणिक परीक्षेत संपूर्ण अमेरिकेत प्रथम क्रमांक पटकावला होता.

पाण्याखालील रोबोटिक्स (SeaPerch) चे यशस्वी नेतृत्व

रिद्धीची तांत्रिक समज आणि विज्ञानाची आवड अफाट आहे. तिने तिच्या बटालियनच्या पहिल्या-वहिल्या ‘सीपर्च’ (SeaPerch) या पाण्याखालील रोबोट कार्यक्रमाचे नेतृत्व केले. या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे तिच्या हाताखालील इतर कॅडेट्सना रोबोटिक्स आणि अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रातील प्रत्यक्ष आणि व्यावहारिक अनुभव घेता आला. विज्ञानाची आणि नौदलाची सांगड घालत तिने केलेला हा प्रयोग अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरला.

रिद्धीच्या मते, “नेतृत्व करणे म्हणजे केवळ हुकूम सोडणे नव्हे, तर इतरांची सेवा करणे आणि स्वतः एक उत्तम उदाहरण बनून दाखवणे होय.” रिद्धी आपल्या या शांत आणि संयमी नेतृत्वशैलीचे संपूर्ण श्रेय तिच्या कुटुंबावर असलेल्या संस्कारांना आणि ‘BAPS स्वामीनारायण संस्थे’ला देते. ती सांगते की, संस्थेचे अध्यात्मिक गुरु महंत स्वामी महाराज यांच्याकडून तिला मिळालेले नम्रता, करुणा आणि नि:स्वार्थ सेवेचे धडे तिच्या आयुष्याचा पाया बनले आहेत, ज्याने तिला कठीण प्रसंगातही शांत राहून योग्य निर्णय घेण्याची ताकद दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Strikes Iran: इराणवर अमेरिकेचा 7 तास थरारक बॉम्बहल्ला! होर्मुझ सामुद्रधुनीजवळ युद्ध पेटले; युद्धनौका आणि लढाऊ विमाने मैदानात

अमेरिकन नौदलात अधिकारी बनण्याचे स्वप्न आता अगदी जवळ!

अमेरिकन सैन्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नेव्हल अकॅडमी प्रिपरेटरी स्कूल’मध्ये (NAPS) आता रिद्धी चौहानला अधिकृत प्रवेश मिळाला आहे. हा तिच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरला आहे. या प्रवेशामुळे अमेरिकेच्या मुख्य नौदलात (US Navy) थेट ‘कमिशन ऑफिसर’ (Naval Officer) बनण्याचे तिचे बालपणापासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. राजस्थानच्या मातीतून गेलेल्या एका कुटुंबाच्या १७ वर्षांच्या कन्येने आज अमेरिकेच्या नौदलाच्या उंबरठ्यावर घेतलेली ही झेप खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

Web Title: Riddhi chauhan indian american girl commands 300 us navy cadets njrotc queens new york naval academy prep school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • America
  • Indian
  • Navy
  • New York city
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.