Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक

Ahmadinejad Mossad Agent: एका अमेरिकन वृत्तपत्राने असा दावा केला आहे की, इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद हे मोसादच्या संपर्कात असलेले एक एजंट होते आणि त्यांनी इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्यासाठी इस्रायलसोबत कट रचला होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 15, 2026 | 08:30 PM
ahmadinejad mossad agent iran coup plot israel failed strategy khamenei assassination irgc house arrest

ahmadinejad mossad agent iran coup plot israel failed strategy khamenei assassination irgc house arrest

Follow Us
Follow Us:
  • धक्कादायक आंतरराष्ट्रीय खुलासा
  • परिषदांच्या नावाखाली गुप्त बैठका
  • इस्रायलचा महाप्लॅन का फसpath? 

जागतिक राजकारणात आणि गुप्तहेर विश्वात आजवरचा सर्वात मोठा आणि थरारक खुलासा समोर आला आहे. ज्या नेत्याच्या कट्टर देशप्रेमावर संपूर्ण इराणचा (iran) आंधळा विश्वास होता, ज्याने अमेरिकेसारख्या महासत्तेला आणि इस्रायलला उघडपणे आव्हान दिले होते, तोच नेता चक्क आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचा गुप्त एजंट निघाला तर? ऐकायला हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या कथेसारखे वाटेल, पण अमेरिकेचे नामांकित वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने (New York Times) आपल्या एका विशेष अहवालात असाच खळबळजनक दावा केला आहे. इराणचे माजी अत्यंत आक्रमक राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद (Mahmoud Ahmadinejad) हे इस्रायली गुप्तचर संस्था ‘मोसाद’ (Mossad) च्या संपर्कात होते आणि त्यांनी इराणमधील सध्याची राजवट उलथवून टाकण्यासाठी (Couplet) इस्रायलसोबत एक गुप्त करार केला होता.

महमूद अहमदीनेजाद हे एकेकाळी इराणच्या राजकारणातील सर्वात शक्तिशाली आणि कट्टरपंथी चेहरे मानले जात होते. त्यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की, ते इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांनाही थेट आव्हान देत असत. त्यांनी आपल्या कार्यकाळात इराणच्या आण्विक कार्यक्रमाला (Nuclear Program) कमालीची गती दिली होती आणि इराणला अण्वस्त्रधारी देश बनवण्याचे स्वप्न दाखवले होते. मात्र, अशा या कट्टर नेत्याचे अचानक इस्रायलसारख्या इस्लामिक देशांच्या सर्वात मोठ्या शत्रूशी सूत कसे जुळले, आणि ते मोसादचे एजंट कसे बनले, याची इनसाईड स्टोरी अत्यंत धक्कादायक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fools Gold: जपानला समुद्रात समुद्राखाली 700 मीटरवर ‘अदृश्य सोने’; ज्वालामुखीच्या खडकांमध्ये अणू पातळीवर दडलेय अफाट सोने

अयातुल्ला खामेनी यांच्याशी वैर आणि राजकीय अंत

अहमदीनेजाद आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यातील संबंध सुरुवातीला अत्यंत घट्ट होते. २००५ च्या अध्यक्षीय निवडणुकीत खामेनी यांच्या पाठिंब्यामुळेच अहमदीनेजाद यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. त्यांनी सलग दोन वेळा इराणचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले. मात्र, दुसऱ्या कार्यकाळाच्या उत्तरार्धात त्यांच्यात आणि खामेनी यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले. २०१६ मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना खामेनी यांनी अहमदीनेजाद यांना २०१७ ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक न लढवण्याचा जाहीर सल्ला दिला, कारण त्यांच्या उमेदवारीमुळे देशात राजकीय फूट पडू शकत होती.

अहमदीनेजाद यांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून अर्ज भरला, पण इराणच्या शक्तिशाली ‘गार्डियन कौन्सिल’ने (Guardian Council) त्यांचा अर्ज फेटाळून लावला. यानंतर २०२१ आणि २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. सलग तीन वेळा निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकले गेल्यामुळे अहमदीनेजाद यांचे राजकीय भवितव्य पूर्णपणे संपुष्टात आले होते. सत्तेच्या याच हव्यासापोटी आणि खामेनी यांच्यावर सूड उगवण्यासाठी २०२१ मध्ये अहमदीनेजाद यांनी इराणमधील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी परकीय शक्तींचा वापर करण्याचे ठरवले आणि त्यांनी मोसादशी संधान साधले.

आंतरराष्ट्रीय परिषदांचा बहाणा आणि मोसाद प्रमुखांशी भेट

वृत्तानुसार, मोसादने अहमदीनेजाद यांच्यासारख्या हाय-प्रोफाइल नेत्याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आणि गुप्त बैठका घेण्यासाठी ‘ट्रॅक-२ डिप्लोमसी’चा (Track-2 Diplomacy) अत्यंत हुशारीने वापर केला. या आंतरराष्ट्रीय कटात इस्रायलला त्यांचे जवळचे मित्रराष्ट्र असलेल्या ग्वाटेमाला आणि हंगेरी या देशांनी पडद्यामागून मदत केली.

दोन्ही पक्षांमधील पहिली गुप्त बैठक २०२३ मध्ये ग्वाटेमाला येथे झाली, जिथे अहमदीनेजाद एका पर्यावरण परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आले होते. ही परिषद केवळ एक दाखवण्यापुरता देखावा होती. यानंतर २०२४ मध्ये हंगेरीमधील प्रसिद्ध लुडोविका विद्यापीठात हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आडून अहमदीनेजाद यांनी थेट मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्निया (David Barnea) यांची अत्यंत गुप्त भेट घेतली. या भेटीत इराणमधील सत्तापालटाचा अंतिम ब्ल्यूप्रिंट (Blueprint) तयार करण्यात आला. यानंतर मोसादने या संपूर्ण घडामोडींची माहिती अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएला (CIA) देखील दिली होती. या दौऱ्यांसाठी लागणारा कोट्यवधींचा निधी मोसादनेच पुरवला होता, असा दावाही अहवालात आहे.

बदलेली प्रतिमा आणि ‘सत्तापालटानंतरचा’ इस्रायलचा प्लॅन

२०२१ मध्ये मोसादच्या संपर्कात आल्यानंतर अहमदीनेजाद यांच्या सार्वजनिक वर्तनात आणि प्रतिमेत अचानक मोठा बदल झाला. जे अहमदीनेजाद आधी आपल्या प्रत्येक भाषणात इस्रायलच्या विनाशाची भाषा करत असत, त्यांनी २०२१ नंतर इस्रायलवरील आपली टीका हळूहळू कमी केली आणि २०२५ पर्यंत ती पूर्णपणे बंद केली. त्याऐवजी त्यांनी आपला मोर्चा इराणच्या ‘गार्डियन कौन्सिल’ आणि धार्मिक राजवटीकडे वळवला. ते इराणच्या दुर्गम गावांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या ऐकू लागले आणि त्यांना मदतीचे आश्वासन देऊ लागले. हे सर्व यासाठी केले जात होते, जेणेकरून जेव्हा इस्रायलच्या मदतीने सत्तापालट होईल, तेव्हा इराणी जनतेने त्यांना आपला नवा नेता म्हणून सहज स्वीकारावे आणि कोणताही विरोध करू नये.

इस्रायलच्या योजनेनुसार, जर हा सत्तापालट यशस्वी झाला असता आणि अहमदीनेजाद इराणच्या सिंहासनावर बसले असते, तर इराण आणि इस्रायलमधील अनेक दशकांचे वैर कायमचे संपले असते. अहमदीनेजाद यांनी केवळ इस्रायलला अधिकृत मान्यताच दिली नसती, तर इराणला ‘अब्राहम कराराचा’ (Abraham Accords) एक प्रमुख भाग बनवले असते, ज्यामुळे मध्यपूर्वेचे संपूर्ण राजकारण इस्रायलच्या मुठीत आले असते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Strikes Iran: इराणवर अमेरिकेचा 7 तास थरारक बॉम्बहल्ला! होर्मुझ सामुद्रधुनीजवळ युद्ध पेटले; युद्धनौका आणि लढाऊ विमाने मैदानात

इस्रायलचा महाप्लॅन का आणि कसा फसला?

अहवालानुसार, इस्रायलची ही सर्वात मोठी गुप्त मोहीम दोन मुख्य कारणांमुळे पूर्णपणे अपयशी ठरली:

पहिले कारण म्हणजे, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर एक अत्यंत मोठा लष्करी हल्ला केला, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. इस्रायलला वाटले होते की या मोठ्या धक्क्यामुळे इराणची जनता राजवटीच्या विरोधात रस्त्यावर उतरेल आणि यादरम्यान अहमदीनेजाद सैन्याच्या मदतीने सत्ता काबीज करतील. मात्र, इस्रायलचा हा अंदाज पूर्णपणे चुकला. ज्या इराणी जनतेने आधी सरकारला विरोध केला होता, तीच जनता परकीय आक्रमणाच्या वेळी आपल्या देशाच्या आणि राजवटीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. लोकांनी उठाव करण्याऐवजी इराणी सरकारला पाठिंबा दिला, ज्यामुळे इस्रायलची रणनीती कोलमडली.

दुसरे कारण म्हणजे, पश्चिम इराणमधून एकाच वेळी समन्वित हल्ला करण्यासाठी मोसादने ज्या कुर्दिश लढवय्यांना (Kurdish Fighters) विशेष प्रशिक्षण दिले होते, ते नियोजित वेळेत कोणतीही मोठी लष्करी कारवाई करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. यामुळे अंतर्गत उठाव होऊ शकला नाही. हा कट उघडकीस येताच इराणच्या शक्तिशाली ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) वेगाने हालचाली करत अहमदीनेजाद यांना तातडीने नजरकैदेत (House Arrest) टाकले. ते शेवटचे खामेनी यांच्या अंत्यविधीच्या वेळी कडक सुरक्षेत दिसले होते, आणि आता त्यांचे संपूर्ण भवितव्य अंधारात सापडले आहे.

Web Title: Ahmadinejad mossad agent iran coup plot israel failed strategy khamenei assassination irgc house arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • iran
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?
1

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो
2

Heramb Karmarkar : ‘फक्त माझ्या मुलाचा मृतदेह परत करा…’ ओमान जहाजावरील हल्ल्यात पुण्याचा अभियंता शहीद; सासऱ्यांचा टाहो

इस्रायलची ३.३ अरब डॉलर ची सैन्य रसद धोक्यात ,अमेरिकन संसदेत हिंदू संसदपटटू रो खन्ना यांनी मांडला विरोध प्रस्ताव
3

इस्रायलची ३.३ अरब डॉलर ची सैन्य रसद धोक्यात ,अमेरिकन संसदेत हिंदू संसदपटटू रो खन्ना यांनी मांडला विरोध प्रस्ताव

NJROTC : कोण आहे 300 अमेरिकी नौदल कॅडेट्सचे नेतृत्व करणारी 17 वर्षीय रिद्धी चौहान? जाणून घ्या तिची रंजक कहाणी
4

NJROTC : कोण आहे 300 अमेरिकी नौदल कॅडेट्सचे नेतृत्व करणारी 17 वर्षीय रिद्धी चौहान? जाणून घ्या तिची रंजक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.