रुग्णांच्या बचावकार्यत मदत केली. युक्रेनने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
युक्रेन: मागील अनेक महिन्यांपासून युक्रेन व रशियामध्ये विनाशकारी युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये तणावाचे वातावरण असताना पुन्हा एकदा रशियाने कीवमधील मुलांच्या रुग्णालयावर सोमवारी (दि.8) हल्ला केला. मुलांच्या रुग्णालयाला रशियन क्षेपणास्त्राचा फटका बसला. यावेळी रुग्णालयाचे आणि त्यातील रुग्णांचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या मोठ्या हल्ल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय घाबरून पळून गेले. त्यांच्या या संघर्षाच्या काळात भारतीय विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. या सहकार्याचे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने कौतुक केले आहे.
रशियाने केलेला हा हल्ला युक्रेनियन शहरांवर मोठ्या हवाई हल्ल्याचा एक भाग होता. यामध्ये किमान 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र रुग्णायलातील रुग्ण वाचवण्याचा भारतीय विद्यार्थ्यांनी पुरेपुर प्रयत्न केला. त्याबदद्ल युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “हे भारतीय विद्यार्थी मानवतेचे उदाहरण देतात. लहान मुलांसाठी असलेल्या एका मोठ्या हॉस्पिटलवर हल्ला करण्यात आला. संघर्षादरम्यान अनेक आव्हाने समोर असूनही, भारतीय विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रूग्णांवर उपचार करण्यात आणि बचाव कार्यात मदत या विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थी कीव येथील मुलांच्या रुग्णालयावर झालेल्या विनाशकारी हल्ल्यानंतर स्थानिक डॉक्टर आणि बचाव कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
युक्रेनने ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कीवमधील मुलांच्या रूग्णालयावर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनने आमच्या डॉक्टरांना आणि बचावकर्त्यांना मदत केली. जीवनाची मूल्ये सामायिक करणाऱ्यांचे आभार.”
🇮🇳🇺🇦 Indian students who study medicine in Ukraine helped our doctors and rescuers after Russia’s attack on a children’s hospital in Kyiv. Thank you to those who share the values of life!
Photo: Ukrainian State Center for International Education pic.twitter.com/QK0XkNlATk
— MFA of Ukraine 🇺🇦 (@MFA_Ukraine) July 10, 2024
नरेंद्र मोदींचा संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर
दुसरीकडे, ऑस्ट्रियामध्ये पंतप्रधान मोदींनी जागतिक संघर्ष, विशेषतः युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध सोडवण्यासाठी “संवाद आणि मुत्सद्देगिरी” च्या महत्त्वावर भर दिला. याआधी, पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय बैठकीत संघर्षांदरम्यान मुलांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता. ही घटना अत्यंत “हृदयद्रावक” असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा जीव गेल्याचे दु:ख होते.
झेलेन्स्कींनी केली निराशा व्यक्त
“जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नेत्याने मॉस्कोमध्ये जगातील सर्वात रक्तरंजित गुन्हेगाराला मिठी मारताना पाहणे ही एक मोठी निराशा आणि शांतता प्रयत्नांना एक विनाशकारी धक्का आहे.” अशी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी खंत व्यक्त केली. तसेच झेलेन्स्की यांनी रशियाच्या सर्वात मोठ्या मुलांच्या हॉस्पिटलवर क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन मुलांसह 37 लोक ठार झाले आणि 170 जण जखमी झाले. ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टही केली आहे.