India's demand for action after threat from Khalistani supporters form canada
ओटावा: सध्या कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकंमध्ये भातविरोधी आक्रोश अजूनही कायम आहे. कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारत आणि कॅनडामधील संबंध सुरधारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. खलिस्तानी संघटनांनी पुन्हा एकदा भारतविरोधी तीव्र आंदोलने सुरु केली आहेत. शिवाय पंतप्रधान मोदींना कॅनडात आल्यावर मारण्याचीही धमकी दिली आहे. यावर भारताने चिंता व्यक्त केली आहे.
खलिस्तानी समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उघड धमकी दिली होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान या खलिस्तानी समर्थांकांच्या धमकीनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारत सरकारने दहशतवादी पन्नूच्या धमक्यांना गांभीर्याने घेतले आहे.
भारताने कॅनडाकडे खलिस्तानी समर्थकांच्या कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच यावर कठोर कारवाईची देखील मागणी केली आहे. परंतु अद्याप कॅनडाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने भारतामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याशिवाय कॅनडात भारतीय राजदूतांचा छळ होत असून असुरक्षितता निर्माण झाली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध केला आहे.
यामध्ये निदर्शनांदरम्यान भारताचा तिरंगा फाडून जाळून भारतविरोधी कृत्य केले आहे. एवढेच नव्हे तर, पंतप्रधान मोदी कॅनडात आले, तर त्यांची इंदिर गांधीप्रमाणे हत्या करण्याचीही खुली धमकी खलिस्तानी समर्थकांनी दिली आहे. या मोर्चांदरम्यान भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच पंतप्रधान मोदींना मारुन टाकण्याच्या घोषणा दिल्या.
Adv. Vineet Jindal has officially filed a complaint with the Vancouver Police & RCMP against Khalistani extremists for glorifying terrorism & inciting violence outside the Indian Consulate in Vancouver on June 6, 2025.
The complaint highlights:
⁰🔻 Threats to PM Modi⁰🔻… pic.twitter.com/bY2wNJ03iG— Adv.Vineet Jindal (@vineetJindal19) June 9, 2025
एका कॅनेडियन पत्रकाराने या आंदोलनाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावर टाकले. त्याच्यावरही खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला, त्याला धमकावले. खलिस्तानी समर्थकांनी इंदिरा गांधीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे राजकारण संपवण्याची धमकी दिली.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात शीख फॉर जस्टिस दहशतवादी संटनेचे गुरपंतवंत सिंग यांनी निदर्शकांचे नेतृत्व केले.य त्यांनी एक व्हिडिओ जारी करत पंतप्रधान कार्नी यांचे आभार मानले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याची संधी दिल्याने कार्नी यांचे आभार मानले. सध्या कॅनडात गेल्या ४८ तासापासून निषेध सुरु आहे.