ओटावा: कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी G-7 शिखर परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिले आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाने कॅनडात खलिस्तानी समर्थकांमध्ये संताप पसरला आहे. त्यांच्यावर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आलेल्या निमंत्रणावर खलिस्तानी समर्थकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा हवाला देत कार्नी यांच्यावर टीका केली जात आहे. परंतु मार्क कार्नी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले आहे.
पत्रकारांनी मार्क कार्नी यांना निज्जरच्या हत्येत मोदींच्या सहभागाबद्दल विचारण्यात आले, त्यावेळी कार्नी यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्यांनी म्हटले की, या प्रकरणावर कायदेशी प्रक्रिया सुरु आहे आणि यामध्ये बरीशीची प्रगती झाली आहे. परंतु या प्रक्रियेवर भाष्य करणे योग्य नाही असे कार्नी यांनी स्पष्ट केले.
भारत हा G-7शिखर परिषदेचा सदस्य नाही, परंतु भारताला गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले असल्याचे कार्नी यांनी सांगतिले. कार्नी यांनी भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे, सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. जागतिक पुरवठा साखळी मध्ये भारत महत्वाची भूमिका बजावतो यामुळे भारताला परिषदेसाठी आमंत्रित करणे महत्वाचे असल्याचे म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याची पुष्टी करत म्हटले की, भारत आणि कॅनडा या लोकशाही देशातील जनतेशी संबंधित दृढ आहेत. दोन्ही देश परस्पर संबंध आणि हिताच्या आधारावार एकत्र काम करले. तसेच नरेंद्र मोदींनी शिख परिषदेला भेटीची उत्सुकता व्यक्त केली.
कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात भारताशी संबंध बिघडले होते. जस्टिन ट्रुडोंनी कोणत्याही ठोस पुराव्यासह निज्जर हत्याकांडात भारत सामील असल्याचा गंभीर आरोप केला होता. यामुळे दोन्ही देशांती संबंधामध्ये कटुता निर्माण झाली होती. या कारणास्तव भारताला G-7 शिखर परिषदेत आमंत्रण मिळेल यावर अनिश्चितता होती. परंतु कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाने भारताला परिषेदसाठी आमंत्रण मिळाले आहे.
कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांची १८ जून २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती. गुरुद्वाराबाहेर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तसेच भारताने निज्जरला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केले होते. निज्जरवर भारतात अनेक खून आणि दहशतवादी कारवायां केल्याचा आरोप होता. पण कॅनडाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर कॅनडाचे माजी पंतप्रधान यांच्या निज्जरच्या हत्येत भारताचा सहभागाच्या आरोपामुळे हे संबंध अधिक बिघडले. होते.