मोदींचे राजकारण G-7 मध्ये संपेल...; खलिस्तान समर्थकांकडून पत्रकाराचा खळबळजनक दावा
Canada News: खलिस्तान समर्थकांकडून एका तपास पत्रकाराला धमकी दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. प्रसिद्ध तपास पत्रकार मोचा बेझिरगन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, व्हँकूवरमधील डाउनटाउन परिसरात सुरू असलेल्या एका साप्ताहिक रॅलीचे चित्रीकरण करत असताना आंदोलकांनी त्यांना घेरले आणि धमकावले.
बेझिरगन म्हणाले, “मी माझे पत्रकार म्हणून कर्तव्य पार पाडत होतो. मात्र चित्रीकरणादरम्यान काही आंदोलकांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ही बाब केवळ माझ्या कामात अडथळा निर्माण करणारी नव्हे, तर माध्यम स्वातंत्र्यावरही गंभीर आघात करणारी आहे.” या प्रकारामुळे कॅनडामध्ये पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, माध्यम प्रतिनिधींनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.
एका Parle -G बिस्किटाची किंमत वाचून व्हाल थक्क; गाझातील बापाची मुलीसाठी जीवापाड धडपड
खलिस्तान समर्थकांकडून धमकी मिळाल्यानंतर तपास पत्रकार मोचा बेझिरगन यांनी आपबीती सांगितली. “ही घटना माझ्यासोबत फक्त दोन तासांपूर्वी घडली आणि मी अजूनही थरथरतोय. व्हँकूवरच्या डाउनटाउनमध्ये सुरू असलेल्या एका रॅलीच्या चित्रीकरणादरम्यान आंदोलकांनी त्यांना घेरले, पाठलाग केला आणि त्यांच्या हातातील फोन हिसकावून घेतला, असा आरोप त्यांनी केला.
“ते अक्षरशः गुंडासारखे वागले. त्यांनी मला रेकॉर्डिंग करू देऊ नये म्हणून माझ्यावर दबाव टाकला आणि माझा पाठलाग सुरू केला. हा अनुभव भयावह होता,” असे बेझिरगन यांनी नमूद केले. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बेझिरगन म्हणाले, “कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावाचा मूळ आधार राजकीय आहे. पण आपण येथे भूमिगत काय सुरू आहे ते दुर्लक्षित करत आहोत. हे लोक इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचा जयजयकार करत आहेत. ते भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण G-7 परिषदेत संपेल, असेही म्हणत आहेत.” या प्रकारामुळे केवळ पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत नव्हे, तर कॅनडामधील खलिस्तान समर्थकांच्या वाढत्या धोकादायक प्रवृत्तीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
खलिस्तान समर्थकांवर गंभीर आरोप करत मोचा बेझिरगन यांनी सांगितले की, “हे लोक इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना आपले पूर्वज मानतात आणि त्यांच्या कृत्यांचे खुलेआम glorification करत आहेत.” व्हँकूवरमध्ये झालेल्या एका रॅली दरम्यान बेझिरगन यांना जमावाने घेरले, धमकावले आणि त्यांच्या हातातील फोन हिसकावून घेतला.
“जेव्हा मी त्यांना विचारले की, ‘तुम्ही इंदिरा गांधींसारखे नरेंद्र मोदी यांचेही राजकारण संपवणार आहात का?’ – तेव्हा त्यांनी उघडपणे सांगितले की, आम्ही इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचे वंशज आहोत. ते हिंसेचे उदात्तीकरण करत होते. त्यांच्या मागे लागलेल्या जमावाचे नेतृत्व करणारा व्यक्ती पूर्वी त्यांना ऑनलाईन त्रास देत होता. “मी कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि न्यूझीलंडमधील खलिस्तानी निदर्शनांचे दस्तऐवजीकरण करत आहे. त्यामुळे याआधीही मला लक्ष्य केले गेले आहे.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
“रविवारी रॅलीचे चित्रीकरण करत असताना अचानक दोन-तीन लोक माझ्यासमोर आले. मी बॅकअप रेकॉर्डिंग सुरू केले, तेव्हा त्यांच्यापैकी एकाने माझ्या हातातील फोन हिसकावून घेतला,” असे बेझिरगन म्हणाल्या. यावेळी जवळच उपस्थित असलेल्या व्हँकूवर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना माघार घेण्यास भाग पाडले. यानंतर बेझिरगन यांनी पोलीस ठाण्यात आपला अधिकृत जबाबही नोंदवला.