फोटो सौजन्य AI
अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीतून अचानक मोठ्या प्रमाणात राख आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही वेळातच राखेचा प्रचंड ढग आकाशात पसरला. हा ढग तब्बल ५० हजार फूट उंचीपर्यंत गेल्याने विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्वालामुखीची राख विमानांच्या इंजिनमध्ये गेल्यास इंजिनच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विमान कंपन्यांनी अनेक मार्गांवरील उड्डाणे रद्द केली किंवा पर्यायी मार्गाने वळवली आहेत.
Indus River Project : लडाखमध्ये सिंधू नदीवर भारताचा पहिला रॉक चेक डॅम; ४ कोटी लिटर पाणी साठवणार
ज्वालामुखीच्या राखेमुळे इंडोनेशियातील अनेक विमानतळांवरील हवाई सेवा विस्कळीत झाली आहे. जकार्तासह विविध भागांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना तासन्तास विमानतळावर प्रतीक्षा करावी लागत आहे.
काही विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी पर्यायी उड्डाणांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. मात्र राखेचे ढग आणि वाऱ्याची दिशा यावर परिस्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने हवाई सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी वेळ लागू शकतो.
Gaza Crisis : गाझातील पॅलेस्टिनींना बाहेर काढण्याच्या योजनेवरून वाद
ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेचा परिणाम केवळ विमानसेवेवरच नाही, तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. काही भागांमध्ये हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अनाक क्राकाटोआ हा इंडोनेशियातील सक्रिय ज्वालामुखी आहे. २०१८ मध्ये याच ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आलेल्या त्सुनामीने मोठी जीवितहानी केली होती. त्यामुळे सध्याच्या उद्रेकाकडे प्रशासन आणि स्थानिक नागरिक अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. ज्वालामुखीच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जात आहेत.






