Iran deports 50 lakh Afghans in 16 days on espionage charges
तेहरान : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता शांत होत चालला आहे. दरम्यान या युद्धबंदीनंतर इराणने काही दिवसांताच इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे. इराणने तालिबानविरोधात मोठी कारवाई केली आहे. इराणने देशातील अफगाण नागरिकांना देशातून हद्दपार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु केली आहेत. इराणने गेल्या १६ दिवसांत ५ लाखांहून अधिक अफगाणिस्तानना देशातून बाहेर काढले आहे.
इराणची आतापर्यंतची ही सर्वात मोठी सक्ती मानली जात आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, २४ जून रोजी ही कारवाई सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून ९ जुलैपर्यंत इराणने ५ लाखहून अधिक अफगाण नाहरिकांना हद्दपार केले आहे. एका दिवसांत तब्बल ५१ हजार लोकांना बाहेर काढण्यात येते आहे. इराणने गेल्या आठवड्यापर्यंत अफगाणी नागरिकांना मायदेशी परतण्याचा अल्टीमेट्म दिला होता. त्यानंतर नागरिकांना जबरदस्तीने हाकलण्यात येईल असे म्हटले होते.
इराण बऱ्याच काळापासून देशातील अफगाण नागरिकांना हाकलून लावू इच्छित होते. इराणमच्या अनेक शहरांमध्ये रोजरागारासाठी अनेक अफगाण नागरिकांना वास्तव घेतला होता. परंतु ही संख्या प्रचंड वेगाने वाढत होती. इराणच्या तेहरान, मशहाद आणि इस्फाहन सारख्या शहरांमध्ये अफगाणिस्तानींची मोठी संख्या होती. हे सर्व रोजगारासाठी बांधकाम, स्वच्छता आणि शेती काम करत होती. दरम्यान या सर्वांना इराणने हाकलवले आहे. इस्रायलसोबच्या युद्धबंदीनंतर ही कारवाई केली जात आहे.
इराणने या कारवाई संदर्भात स्पष्ट करताना सांगितले की, अफगाण नागरिक इस्रायलसाठी हेरगिरीचे काम करत होते. यामुळे राष्ट्राच्या आणि इराणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करण्यात येत आहे. इराणच्या या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान इराणच्या या कारवाईवर जगभरातील मानवाधिकार संघटनांकडून तीव्र टीका केली जात आहे. इराण बऱ्याच काळापासून हेरगिरीचे खोटे आरोप करुन लोकांना हद्दपार करत असल्याचे मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र आणि अफगाणिस्कतानच्या अधिकाऱ्यांनी इराण या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढत असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे इराणने इस्रायलशी युद्ध सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक गुप्तहेरांना अटक केली आहे. यापैकी सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेला हा मोठा धक्का आहे. इराणची ही कारवाई देखील अद्याप सुरु आहे.