Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Embassy: ‘कभी इंडिया आके देखो…’ भारताला नरक’ बोलणाऱ्या ट्रम्पना इराणने दाखवली जागा; केले ‘असे’ धडाकेबाज Tweet

Donald Trump India Hell comment : इराणच्या मुंबई दूतावासाने त्यांना सांस्कृतिक शुद्धीकरण करण्याचा सल्ला दिला आहे, तर भारताने हे वक्तव्य अनुचित आणि अन्यायकारक असल्याचे सांगत त्याचा निषेध केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 24, 2026 | 11:08 AM
iran embassy slams donald trump hell comment on india cultural detox 2026

iran embassy slams donald trump hell comment on india cultural detox 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचे वादग्रस्त विधान
  • इराणचे सडेतोड उत्तर
  • भारत सरकारचा निषेध

Donald Trump India Hell comment : जागतिक राजकारणात सध्या शब्दांचे युद्ध रंगले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताविषयी केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून, या वादात आता इराणने भारताची बाजू घेत ट्रम्प यांना आरसा दाखवला आहे. ट्रम्प यांनी भारताला ‘नरक’ म्हटल्यानंतर मुंबईतील इराणच्या दूतावासाने त्यांना दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमका वाद काय आहे? ट्रम्प काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी पुराणमतवादी पॉडकास्ट होस्ट मायकल सॅव्हेज यांच्या विधानांचा पुनरुच्चार केला होता. या पोस्टमध्ये भारत आणि चीनला ‘नरककुंड’ संबोधण्यात आले होते. इतकेच नाही तर, अमेरिकेतील भारतीय टेक वर्कर्सना इंग्रजी येत नाही आणि ते मूळ अमेरिकन लोकांना कामावर घेत नाहीत, असा अत्यंत खालच्या पातळीवरील आरोपही करण्यात आला होता. अमेरिकेतील जन्मजात नागरिकत्वाच्या कायद्यावर टीका करताना त्यांनी भारताला लक्ष्य केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘मी खरंच मोठी चूक केली, ते मांजर-कुत्र्यांसारखे…’, इराणचं नाव घेऊन ट्रम्प यांनी पुन्हा केले खळबळजनक विधान

इराणच्या दूतावासाचा ‘पॉवरफुल’ पलटवार

ट्रम्प यांच्या या विधानावर भारतापेक्षाही तीव्र प्रतिक्रिया मुंबईतील इराणच्या दूतावासाकडून आली. इराणने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर महाराष्ट्रातील काही सुंदर गड-किल्ल्यांची आणि निसर्गाची छायाचित्रे शेअर करत ट्रम्प यांना ‘सांस्कृतिक शुद्धीकरण’ (Cultural Detox) करण्याचा सल्ला दिला. इराणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “कदाचित ट्रम्प यांना एकतर्फी सांस्कृतिक शुद्धीकरणासाठी पाठवले पाहिजे; यामुळे त्यांचा हा अनावश्यक मूर्खपणा कमी होईल. कधीतरी भारताला प्रत्यक्ष भेट द्या, मगच बोला!” इराणच्या या उत्तराने भारतीयांची मने जिंकली आहेत.

Maybe someone should book a one-way cultural detox for Mr. #Trump, it might just reduce the random bakwaas 😏 Kabhi #India aa ke dekho, phir bolna. pic.twitter.com/kkocLZ31XX — Iran in Mumbai (@IRANinMumbai) April 23, 2026

credit – social media and Twitter

भारत सरकारची भूमिका: ‘अनुचित आणि चुकीचे’

भारत सरकारने ट्रम्प यांच्या या विधानांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, ही विधाने भारत-अमेरिका संबंधांचे वास्तव दर्शवत नाहीत. भारत आणि अमेरिका यांचे संबंध परस्पर आदर आणि सामायिक हितांवर आधारित आहेत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. हिंदू अमेरिकन फाऊंडेशननेही यावर चिंता व्यक्त केली असून, अशा विधानांमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायाला लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Louisiana Shooting: अमेरिकेतील मॉल ऑफ लुइझियाना फूड कोर्टमध्ये वादाचे रूपांतर थेट गोळीबारात; एक जण ठार आणि पाच जण जखमी

डॅमेज कंट्रोलचा अमेरिकेचा प्रयत्न

वाढता वाद पाहून भारतातील अमेरिकी दूतावासाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवक्त्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्षांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात असून, त्यांच्या मते भारत हा एक महान देश आहे. विशेष म्हणजे, पुढील महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यापूर्वी निर्माण झालेला हा तणाव कमी करण्याचे मोठे आव्हान आता अमेरिकन मुत्सद्यांसमोर आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 'नरक' का म्हटले?

    Ans: ट्रम्प यांनी एका पॉडकास्ट होस्टच्या विधानांचा हवाला देत अमेरिकेतील स्थलांतरित कायद्यावर टीका करताना भारत आणि चीनला 'नरक' संबोधले होते.

  • Que: इराणच्या दूतावासाने ट्रम्प यांना कोणता सल्ला दिला?

    Ans: इराणने ट्रम्प यांना त्यांचा 'मूर्खपणा' थांबवण्यासाठी 'कल्चरल डिटॉक्स' (सांस्कृतिक शुद्धीकरण) करण्याचा आणि एकदा भारताला भेट देण्याचा सल्ला दिला आहे.

  • Que: भारत सरकारने यावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: परराष्ट्र मंत्रालयाने ही विधाने चुकीची, अनुचित आणि भारत-अमेरिका संबंधांच्या वास्तवाच्या विरोधात असल्याचे सांगत निषेध व्यक्त केला आहे.

Web Title: Iran embassy slams donald trump hell comment on india cultural detox 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.