अमेरिकेतील मॉल ऑफ लुइझियाना येथे दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एक जण ठार आणि पाच जण जखमी झाले. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Mall of Louisiana shooting 2026 : जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अमेरिकेतील लुइझियाना राज्यात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ‘मॉल ऑफ लुइझियाना’ (Mall of Louisiana) मध्ये झालेला गोळीबार हा या राज्यातील गन कल्चरचा भीषण चेहरा समोर आणणारा ठरला आहे. फूड कोर्टमध्ये लोक दुपारचे जेवण करत असताना अचानक गोळ्यांचे आवाज घुमले आणि मॉलमध्ये एकच धावपळ उडाली. या घटनेने अवघ्या अमेरिकेला हादरवून सोडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १:२२ वाजता मॉलच्या फूड कोर्टमध्ये दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि पाहता पाहता दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला. कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या डेझायर बॅटन यांनी सांगितले की, “तो अनुभव अत्यंत भयावह होता. गोळ्यांचा आवाज ऐकताच आम्ही स्वतःला एका विश्रांती कक्षात (Break Room) कोंडून घेतले. पोलीस येईपर्यंत आम्ही तिथे जीव मुठीत धरून लपून होतो.” या गोळीबारात १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गोळ्या लागल्याने जखमी झाले आहेत.
Tiroteo en centro comercial deja un muerto y cinco heridos Dos grupos de personas se dispararon entre sí en el área de restaurantes https://t.co/L7p20lv6b5 — Proceso (@proceso) April 24, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘मी खरंच मोठी चूक केली, ते मांजर-कुत्र्यांसारखे…’, इराणचं नाव घेऊन ट्रम्प यांनी पुन्हा केले खळबळजनक विधान
बॅटन रूज पोलीस प्रमुख टीजे मोर्स यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पाच संशयितांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. महापौर सिड एडवर्ड्स यांनी गुन्हेगारांना सज्जड दम भरताना म्हटले की, “जर तुम्ही शहरात अशा प्रकारचे कृत्य केले, तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही.” सध्या मॉल परिसरात डझनभर पोलीस गाड्या, हेलिकॉप्टर्स आणि बुलेटप्रूफ जॅकेट घातलेले सशस्त्र अधिकारी गस्त घालत आहेत.
Fox 8 obtained video from inside the Mall of Louisiana in the aftermath of a mass shooting that left 1 dead and 5 injured. Authorities say suspects are still at large. pic.twitter.com/05lO9M4gQm — FOX 8 New Orleans (@FOX8NOLA) April 24, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Submarine Deal: राजनाथ सिहांची जर्मनी वारी यशस्वी! रडारवर अदृश्य, जर्मनीच्या मदतीने भारत बनवतोय जगातील सर्वात शांत पाणबुडी
मॉलमधील या घटनेच्या अवघ्या चार दिवस आधी, लुइझियानातील श्रेव्हपोर्ट (Shreveport) भागात मानवी क्रूरतेचा कळस पाहिला मिळाला. शमार एल्किन्स (३१) नावाच्या एका वडिलांनी कौटुंबिक वादातून स्वतःच्याच ७ मुलांची आणि एका भाच्याची (वय ३ ते ११ वर्षे) गोळ्या झाडून हत्या केली. या भीषण हत्याकांडात दोन महिलाही गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपीने पळून जाण्यासाठी कार चोरी केली होती, मात्र पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो ठार झाला. एकाच आठवड्यात दोन मोठ्या गोळीबाराच्या घटनांमुळे लुइझियाना राज्यात आता बंदुकीच्या कायद्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.






