Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘या, आम्ही तुमची वाट पाहतोय!’ अराघची यांचा अमेरिकेवर घातक प्रहार; US सैन्यासाठी ‘यमद्वार’ ठरेल इराण

Iran Warns US: अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांनंतरही, इराणने माघार घेण्याची कोणतीही चिन्हे दाखवलेली नाहीत. परराष्ट्र मंत्री अराघची म्हणाले की देश जमिनीवर हल्ला करण्यास तयार आहे आणि वाटाघाटी नाकारल्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 06, 2026 | 01:39 PM
iran foreign minister araghchi warns us against ground attack

iran foreign minister araghchi warns us against ground attack

Follow Us
Follow Us:
  • इराणची युद्धाला तयारी
  • वाटाघाटींना पूर्णविराम
  • इस्रायलचा इतिहास

Abbas Araghchi NBC interview Iran war 2026 : मध्यपूर्वेतील युद्धाचा वणवा (US-Israel Iran War) आता अशा टोकाला पोहोचला आहे जिथे मुत्सद्देगिरीचे सर्व मार्ग बंद होताना दिसत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्रायल इराणमध्ये ‘ग्राऊंड ऑपरेशन’ म्हणजेच जमिनीवरील लष्करी कारवाई करण्याची तयारी करत असतानाच, इराणने अत्यंत कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एनबीसी (NBC) ला दिलेल्या एका स्फोटक मुलाखतीत स्पष्ट केले की, इराण आता कोणत्याही परिस्थितीत युद्धबंदीची (Ceasefire) मागणी करणार नाही.

“आम्ही घाबरत नाही, आम्ही सज्ज आहोत!”

तेहरानहून व्हिडिओ लिंकद्वारे बोलताना अराघची यांचा आत्मविश्वास आणि आक्रमकता स्पष्टपणे जाणवत होती. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, अमेरिकन सैन्य इराणच्या भूमीवर पाऊल ठेवणार या कल्पनेने त्यांना भीती वाटते का? त्यावर अराघची हसले आणि म्हणाले, “नाही, उलट आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. आम्हाला आमच्या लष्करी क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. जर अमेरिकेने जमिनीवर युद्ध सुरू केले, तर ती त्यांच्यासाठी सर्वात मोठी ऐतिहासिक चूक आणि समस्या ठरेल.” इराणने गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या युद्धासाठी तयारी केली असून त्यांचे सैन्य आता ‘मोबिलायझेशन मोड’मध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून

वाटाघाटींचा ‘धोका’ आणि अमेरिकेचा विश्वासघात

अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केला की, वॉशिंग्टन कधीही ‘गुड फेथ’ म्हणजेच प्रामाणिक हेतूने चर्चा करत नाही. त्यांनी उघड केले की, गेल्या वर्षी आणि या वर्षी दोनदा अमेरिकेसोबत गुप्त चर्चा सुरू होत्या. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा जेव्हा टेबलावर चर्चा सुरू असायची, त्याच वेळी अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले. “ज्या पक्षाला चर्चेच्या आड हल्ले करायचे आहेत, त्यांच्याशी पुन्हा चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे म्हणत त्यांनी मुत्सद्देगिरीचे दरवाजे तूर्तास बंद केले आहेत.

Iran Ready For US Ground Invasion, Foreign Minister Says – NBC Iranian Foreign Minister Abbas Araghchi said on Thursday that Iran is ready for a U.S. ground invasion of the country as the war between Iran, the U.S. and Israel has quickly spread across the region. He also refused… — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) March 5, 2026

credit – social media and Twitter

इस्रायलचा पराभव होईल: इराणचा दावा

मुलाखतीदरम्यान अराघची यांनी जूनमध्ये इस्रायलसोबत झालेल्या १२ दिवसांच्या संघर्षाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, त्या काळात अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर बॉम्बफेक केली होती, तरीही इराणने गुडघे टेकले नाहीत. “त्यावेळीही आम्ही युद्धबंदी मागितली नव्हती, पण अखेर इस्रायललाच बिनशर्त युद्ध थांबवावे लागले होते. इराण हा माघार घेणारा देश नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : worldwar3: ट्रम्प यांचा ‘Plan B’ सक्रिय! ‘विनाशकारी हल्ल्यात’ इराणचे ‘Azadi Sports Complex’ उद्ध्वस्त; 12000 सीट्सचा इनडोअर अरेना

जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट

ट्रम्प प्रशासनाने इराणला पूर्णपणे संपवण्याचा विडा उचलला आहे, तर इराणने आपली अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सज्जता वाढवली आहे. जर अमेरिकेने खरंच जमिनीवरून हल्ला केला, तर या युद्धाची व्याप्ती संपूर्ण जगाला कवेत घेईल, अशी भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सध्या जगभरातील मुस्लिम देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असले तरी, त्यांनी अमेरिकेला दिलेली ही थेट धमकी युद्धाच्या आगीत तेल ओतणारी ठरली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेसोबतची चर्चा का थांबवली आहे?

    Ans: इराणच्या मते, जेव्हा जेव्हा अमेरिकेसोबत चर्चा सुरू झाली, तेव्हा अमेरिकेने चर्चेच्या दरम्यानच हल्ले केले. अमेरिकेच्या या 'दुहेरी' धोरणामुळे इराणने आता वाटाघाटी नाकारल्या आहेत.

  • Que: अमेरिकेच्या जमिनीवरील हल्ल्याला (Ground Attack) इराण घाबरत आहे का?

    Ans: नाही, परराष्ट्र मंत्री अराघची यांनी स्पष्ट केले की इराणचे सैन्य गेल्या अनेक वर्षांपासून या दिवसाची तयारी करत आहे आणि अमेरिकन सैन्य जमिनीवर उतरल्यास ती अमेरिकेसाठी मोठी अडचण ठरेल.

  • Que: इराणने युद्धबंदीची (Ceasefire) मागणी केली आहे का?

    Ans: नाही, इराणने स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी कोणत्याही देशाकडे किंवा अमेरिकेकडे युद्धबंदीची मागणी केलेली नाही आणि ते लढण्यासाठी सज्ज आहेत.

Web Title: Iran foreign minister araghchi warns us against ground attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Iran Attack
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US-Iran Tension : ‘आम्ही युद्धाची भाषाही…’, अमेरिकेला इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अंतिम इशारा; होर्मुझमध्ये प्रचंड विध्वंस
1

US-Iran Tension : ‘आम्ही युद्धाची भाषाही…’, अमेरिकेला इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अंतिम इशारा; होर्मुझमध्ये प्रचंड विध्वंस

Middle East Conflict : मध्यपूर्व पुन्हा पेटलं! इराणचा अमेरिकन नौदल तळावर मोठा हल्ला; MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा
2

Middle East Conflict : मध्यपूर्व पुन्हा पेटलं! इराणचा अमेरिकन नौदल तळावर मोठा हल्ला; MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा

Apache Helicopter Crash : हेलिकॉप्टर क्रॅशनंतर अमेरिकेचा पलटवार? इराणवर अनेक ठिकाणांवर भीषण हल्ले
3

Apache Helicopter Crash : हेलिकॉप्टर क्रॅशनंतर अमेरिकेचा पलटवार? इराणवर अनेक ठिकाणांवर भीषण हल्ले

Red Sea बनणार युद्धाचा आखाडा? हुथी बंडखोरांकडून इस्रायली जहाजांची संपूर्ण ‘नाकेबंदी’; जागतिक तेल पुरवठा धोक्यात
4

Red Sea बनणार युद्धाचा आखाडा? हुथी बंडखोरांकडून इस्रायली जहाजांची संपूर्ण ‘नाकेबंदी’; जागतिक तेल पुरवठा धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.