Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक; भारताबद्दल केले ‘हे’ वक्तव्य

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच वेळी इराणने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानला भेट दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2025 | 12:07 PM
Iran Foreign Minister meets senior Pakistani leaders mediates between India and Pakistan

Iran Foreign Minister meets senior Pakistani leaders mediates between India and Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच वेळी इराणने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची शांती दूत म्हणून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर अराघची यांनी सोमवारी (05 मे) पाकिस्तानला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. अराघची यांनी पाकिस्तान आणि भारताला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

अराघची यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी आशियातील सध्याची परिस्थिती आणि प्रादेशिक समस्येवर चर्चा केली. अराघची यांनी म्हटले की, केवळ संवादानेच दोन्ही देशांमधील समस्या सोडवता येतील. यावर इशाक दर यांनीही सहमती दर्शवली. दरम्यान पाकिस्तान दौरा पूर्ण करुन अराघची गुरुवारी भारत दौऱ्यावर येणार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला पोहोचले; भारत-पाक तणाव कमी करण्यात होणार यशस्वी?

FM of Iran Seyed Abbas Araghchi met with DPM/FM Senator Mohammad Ishaq Dar @MIshaqDar50 in Islamabad. Both the leaders reaffirmed their commitment to strong Pakistan-Iran ties & agreed to boost cooperation in trade, energy & connectivity. They also exchanged views on the evolving… pic.twitter.com/16d5DCdjsO

— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) May 5, 2025

आणखी काय म्हणाले अब्बास अराघची?

ज्म्मू आणि काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली. यानंतर दोन्ही देशांतील थंडावलेले संबंध पुन्हा एकदा बिघडण्यास सुरुवात झाली. भारताच्या कारवाईने पाकिस्तान बिथरला आहे. तसेच संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीने भारताला धमक्यांवरुन धमक्या देते आहे. अशातच इराणने दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही इराणचे शेजारी देश आहेत. तसेच इराणचे दोन्ही देशांशी संबंध अधिक चांगले आहेत. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती इराणसाठी खूप महत्वाची आहे. यामुळे अराघची यांनी म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक संवादाने समस्या सोडवण्याचे आवाहन करतो.

पाकिस्तान आमचा शेजारी देश आहे, तसेच पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध देखील आहेत. परंतु आमचे भारताशीही तितकेच चांगले संबंद आहेत. यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन समस्या सोडवावी.

इशाक दार यांचे भारतावर आरोप

दरम्यान पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पुन्हा भारतावर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, भारताने कोणतीही कारवाई केल्यास आम्ही त्याचे सडेतोड उत्तर देऊ. दोन्ही देशांतील तणावपूर्ण परिस्थितीला इशाक दार यांनी भारताला जबाबदार धरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्रायलचे येमेनच्या प्रमुख बंदरावर जोरदार बॉम्ब हल्ले; हुथीं बंडखोरांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर

 

Web Title: Iran foreign minister meets senior pakistani leaders mediates between india and pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • iran
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
1

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
2

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
3

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
4

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.