इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करत आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणावामुळे प्रादेशिक आणि जागतिक देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर अमेरिकेपासून ते रशियापर्यंतच्या देशांनी भारताला संयम राखण्यास सांगितले आहे. याच दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली आहे.
भारत-पाकमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी अराघाची भारत-पाक दौऱ्यावर आहेत. सोमवारी (05 मे) इस्लामाबादला पोहोचले आहेत. यानंतर मंगळवारी ते नवी दिल्लीला भेट देतील. दरम्यान पाकिस्तानने इराणच्या या ऑफरचे स्वागत केले आहे. परंतु भारताने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने नेहमीच पाकिस्तानसोबतच्या वादाला द्विपक्षीय असल्याचे संबोधले आहे. तसेच पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाला, मुख्यत: काश्मीर मुद्द्यावरुन आक्षेप घेतला आहे.
Iranian Foreign Minister Abbas Araghchi arrived in Islamabad on an official visit. He was received by Additional Secretary West Asia , Syed Asad Gillani, Iranian Ambassador to Pakistan and other senior officials.
He will hold important meetings with the Pakistani leadership… pic.twitter.com/QdFx8BXR1J— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) May 4, 2025
दरम्यान तज्ज्ञांनी इराणच्या या ऑफरला एक तणाव कमी करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल म्हटले आहे. इराणच्या या ऑफरने तेहरानला शांती दूत म्हणून पाहिले जात आहे. सध्या इराण अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. मात्र तरीही इराणने भारत पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. इराणचे दोन्ही देशांशी असलेले संबंध दृढ आहेत. यामुळे इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यास यशस्वी होतील अशी अशा व्यक्त केली जात आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरु झाल्यास दोन्ही देशांचा विकास थांबेल. दोन्ही देशांमधील विकासाच्या योजनांवर याचा परिणाम होई. तसेच दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्था आणि व्यापारावर देखील याचा परिणाम होईल. याचा थेट फायदा रशिया, अमेरिका. चीनसारख्या देशांना होईल.
परंतु याचा फटका इराणला देखील बसण्याची शक्तयता आहे. इराणचे बारत आणि पाकिस्तानसोबत मजबूत व्यापार आणि सांस्कृतिक संबंध आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान युद्धात आमने-सामने आल्यास इराणवर देखील परिणा होण्याची शक्यता आहे. यामुळे इराणला दोन्ही मित्र देशांमध्ये युद्धा होऊ नये असे वाटणार.
यामुळे आता हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे की, इराण आपल्या दोन्ही मित्र देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास यशस्वी होतात, की दोन्ही देश युद्धासाठी आमने-सामने येतात.