Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait Of Hormuz : ‘मूर्खाच्या ट्विटवरून मार्ग उघडणार नाही!’ इराण आक्रमक; होर्मुझ बंद होताच ‘oil prices’ अनियंत्रित

IRGC Warns US : मोजतबा खामेनी यांच्या आदेशानुसार इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. नौदलाने इशारा दिला आहे की, हा जलमार्ग आता केवळ सर्वोच्च नेत्यांच्या आदेशानेच उघडला जाईल, ट्वीटद्वारे नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 19, 2026 | 01:30 PM
iran irgc closes strait of hormuz warns us trump tweet oil crisis 2026

iran irgc closes strait of hormuz warns us trump tweet oil crisis 2026

Follow Us
Follow Us:
  • मूर्खाच्या ट्विटवर निर्णय नाही
  • जलमार्ग पुन्हा बंद
  • जागतिक इंधन संकट

Mojtaba Khamenei orders Hormuz closure : जागतिक राजकारणात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील अहंकार टोकाला पोहोचला आहे. इस्लामाबादमधील शांतता चर्चेचा दुसरा टप्पा अयशस्वी ठरल्यानंतर इराणने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) जगाला हादरवून देणारी घोषणा केली आहे. “होर्मुझची सामुद्रधुनी उघडायची की नाही, याचा निर्णय केवळ आमचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी घेतील, कुणा मूर्ख व्यक्तीच्या ट्विटमुळे आम्ही हा मार्ग मोकळा करणार नाही,” अशा शब्दांत इराणने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्रम्प यांची नाकेबंदी आणि इराणचा संताप

काही दिवसांपूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी होर्मुझचा मार्ग सुरक्षितपणे पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले की, जोपर्यंत इराण संपूर्ण अटी मान्य करत नाही, तोपर्यंत अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटवली जाणार नाही. ट्रम्प यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे इराणचा संयम सुटला आणि त्यांनी पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. आयआरजीसीने चॅनल १६ वरून रेडिओ संदेश प्रसारित करून सर्व आंतरराष्ट्रीय जहाजांना सावध केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RELOSA : 3000 सैनिक, 10 जेट विमाने, 5 युद्धनौका! होर्मुझमधील जहाजावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

“जहाजे बुडवू!” आयआरजीसीचा थेट इशारा

इराणच्या नौदलाने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहील, तोपर्यंत जगातील सर्वात महत्त्वाचा हा तेल मार्ग ‘नो-गो झोन’ असेल. परवानगीशिवाय या जलमार्गातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही शत्रू राष्ट्राच्या किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना थेट लक्ष्य करून उद्ध्वस्त केले जाईल. मोजतबा खामेनी यांच्या आदेशाशिवाय आता एकही थेंब तेल या मार्गातून पुढे जाऊ दिले जाणार नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ऑडिओ संदेशामुळे आंतरराष्ट्रीय नौदल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

The Strait of Hormuz is “closed”. “We’ll open it by the order of our leader of the revolution Imam Khamenei, not by the tweets of idiot (trump). “All vessels that have a connection with our enemies will be targeted if they try to pass. pic.twitter.com/METhynKptQ — Ibrahim Zulfiqari Statements 𓂆 (@Jafry313) April 18, 2026

credit – social media and Twitter

जागतिक तेल बाजारात महायुद्धाची नांदी?

होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणे म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेची नस दाबली जाण्यासारखे आहे. दररोज लाखो बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक याच अरुंद जलमार्गातून होते. दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर तेलाच्या किमती स्थिर झाल्या होत्या, परंतु इराणच्या या नवीन निर्णयामुळे किमतींनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. जर हा जलमार्ग दीर्घकाळ बंद राहिला, तर भारत, चीन आणि युरोपीय देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होऊन महागाई गगनाला भिरेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: परवानगी देऊनही गोळ्या का झाडल्या? इराणच्या ‘धोकेबाजी’चा Audio पुरावा लीक; दिल्लीत इराणच्या राजदूतांना झापले

शांतता चर्चेवर संशयाचे सावट

राजनैतिक विश्लेषकांच्या मते, ट्रम्प आणि खामेनी यांच्यातील हा ‘ईगो वॉर’ जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवू शकतो. एका बाजूला अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी आणि दुसऱ्या बाजूला इराणची लष्करी ताकद, यामुळे मध्यममार्गाची शक्यता धूसर होत चालली आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष मोजतबा खामेनी यांच्या पुढील अधिकृत आदेशाकडे आणि ट्रम्प यांच्या संभाव्य लष्करी प्रतिसादाकडे लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा का बंद केली?

    Ans: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नाकेबंदी कायम ठेवण्याचे जाहीर केल्यामुळे आणि शांतता चर्चा यशस्वी न झाल्यामुळे इराणने हा मार्ग पुन्हा बंद केला आहे.

  • Que: इराणने ट्रम्प यांच्याबद्दल काय विधान केले आहे?

    Ans: इराणच्या नौदलाने म्हटले आहे की, होर्मुझचा मार्ग केवळ सर्वोच्च नेत्यांच्या आदेशाने उघडला जाईल, एखाद्या "मूर्खाच्या ट्विटवर" (ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टवर) नाही.

  • Que: होर्मुझ बंद झाल्याचा भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: होर्मुझमधून भारताचा मोठा तेल पुरवठा होतो. हा मार्ग बंद झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात आणि महागाईत मोठी वाढ होऊ शकते.

Web Title: Iran irgc closes strait of hormuz warns us trump tweet oil crisis 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • iran
  • Mojtaba Khamenei
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran News: इराणमध्ये मशिदीजवळ सुन्नी धर्मगुरू मोहम्मद अन्वर रिगी यांची गोळ्या झाडून हत्या; सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात प्रचंड तणाव
1

Iran News: इराणमध्ये मशिदीजवळ सुन्नी धर्मगुरू मोहम्मद अन्वर रिगी यांची गोळ्या झाडून हत्या; सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात प्रचंड तणाव

US-Iran War: युद्ध कधी थांबेल? इराणच्या विदेश मंत्र्यांनी ठेवली अट; इराणी सैन्याचा ट्रम्प यांना इशारा
2

US-Iran War: युद्ध कधी थांबेल? इराणच्या विदेश मंत्र्यांनी ठेवली अट; इराणी सैन्याचा ट्रम्प यांना इशारा

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार
3

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार

US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ
4

US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.