Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नॉर्वेस्थित हैगाव मानवाधिकार’ गटाने सांगितले की, रिव्होल्यूशनरी गार्डने पश्चिम इलम प्रांतातील मालेकशाही जिल्ह्यात आंदोलकांवर थेट गोळ्या झाडल्या. यामध्ये कुर्द अल्पसंख्याक समुदायाचे ४ लोक ठार झाले. या गटाने पुढे सागितले की, आणखी २ जणांच्या मृत्यूच्या वृत्ताची ते चौकशी करत आहेत, तसेच डझनभर लोक जखमी झाले आहेत. सरकारी कारवाईत जखमीची संख्या ३० वर पोहोचली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी इशारा दिला होता की, इराणने आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर केला, तर अमेरिका गप्प बसणार नाही. ट्रम्प यांच्या या धमकीला इराणी अधिकाऱ्याऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे आता ट्रम्प हस्तक्षेप करतील का असा सवाल आंदोलकांकडून उपस्थित होत आहे. ट्रम्प प्रशासनाकडून इराणवर लादलेले कठोर निर्बंध आणि लष्करी कारवाईची टांगती तलवार यामुळे खामेनेई यांच्या राजवटीला घरघर लागली आहे.
गुप्तचर अहवालानुसार, खामेनेई यांनी बिघडती परिस्थिती पाहता केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठीच नाही, तर आपल्या विशाल आर्थिक साम्राज्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठीही तयारी केली आहे. या योजनेत त्यांचे कुटुंब आणि संभाव्य उत्तराधिकारी मोज्तबा खामेनेई यांच्यासह २० जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, खामेनेई यांची एकूण संपत्ती सुमारे ९५ अब्ज डॉलर्स (सुमारे ८ लाख कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे. ही संपत्ती ‘सेताद’ या शक्तिशाली संस्थेच्या माध्यमातून चालवली जाते, ज्यावर खामेनेईंचे थेट नियंत्रण आहे.
इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू






