खामेनेई इराणमधून रशियाला पळून जाण्याच्या तयारीत; 'या' दाव्यामुळे उडाली खळबळ आणि मोसादनेही दिला दुजोरा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Ali Khamenei escape plan Russia 2026 : गेल्या काही आठवड्यांपासून इराणमध्ये महागाई, बेरोजगारी आणि हुकूमशाही राजवटीविरुद्ध सुरू असलेली निदर्शने आता नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांनी आपला देश सोडण्याचा गुप्त आराखडा आखल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ब्रिटीश वृत्तपत्र ‘द टाईम्स’ (The Times) च्या वृत्तानुसार, ८६ वर्षीय खामेनेई यांनी देशात आपली सत्ता कोसळल्यास रशियाला आश्रय घेण्यासाठी ‘प्लॅन बी’ (Plan B) तयार ठेवला आहे.
इराणमध्ये सध्या आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रियालची घसरण आणि ४२ टक्क्यांहून अधिक असलेला महागाई दर यामुळे त्रस्त जनता रस्त्यावर उतरली आहे. राजधानी तेहरानसह देशातील २१ राज्यांमध्ये ‘हुकूमशाह मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या जात आहेत. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप तरुणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, २०२२ च्या ‘महसा अमिनी’ आंदोलनानंतरचे हे सर्वात मोठे जनआंदोलन मानले जात असून, यावेळी आंदोलक थेट सर्वोच्च नेत्याच्या सत्तेला आव्हान देत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade War: ‘त्यांना मला खूश करायचे होते… ‘PM Modi आणि Trump यांच्यात ‘ऑइल’वरून ठिणगी; USने पुन्हा उगारली Tariff तलवार
गुप्तचर अहवालानुसार, खामेनेई यांनी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठीच नाही, तर आपल्या विशाल आर्थिक साम्राज्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठीही तयारी केली आहे. या योजनेत त्यांचे कुटुंब आणि संभाव्य उत्तराधिकारी मोज्तबा खामेनेई यांच्यासह २० जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, खामेनेई यांची एकूण संपत्ती सुमारे ९५ अब्ज डॉलर्स (सुमारे ८ लाख कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे. ही संपत्ती ‘सेताद’ (Setad) या शक्तिशाली संस्थेच्या माध्यमातून चालवली जाते, ज्यावर खामेनेईंचे थेट नियंत्रण आहे.
#BREAKING Supreme Leader Ali Khamenei has a back-up plan to flee Iran for Moscow with a close circle of up to 20 aides and family should unrest intensify and security forces desert or fail to suppress the protests, The Times reported on Sunday, citing an intelligence report… pic.twitter.com/3Gw16V9p2o — Iran International English (@IranIntl_En) January 4, 2026
credit : social media and Twitter
इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसाद (Mossad) चे माजी अधिकारी बेनी सबती यांनी या दाव्याला दुजोरा दिला आहे. सबती यांच्या मते, “खामेनेई यांच्यासाठी रशियाशिवाय दुसरा कोणताही सुरक्षित पर्याय उरलेला नाही.” नोव्हेंबर २०२४ मध्ये सीरियाचे हुकूमशहा बशर अल-असद ज्याप्रमाणे आपले सरकार कोसळल्यानंतर मॉस्कोला पळून गेले, त्याच पावलावर पाऊल ठेवून खामेनेई आपली सुटका करून घेण्याची शक्यता आहे. खामेनेई आणि पुतिन यांचे संबंध जुने आहेत आणि रशियन संस्कृतीशी आपली साम्यता असल्याचे खामेनेई यांनी यापूर्वीही म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026 : संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याचा ट्रम्पचा प्लॅन; अमेरिकेचे ‘जानेवारी कॅलेंडर’ लीक आता ‘या’ 5 देशांवर नजर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या परिस्थितीवर कडक भूमिका घेतली आहे. शांततापूर्ण आंदोलकांवर गोळीबार झाल्यास अमेरिका गप्प बसणार नाही, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून इराणवर लादलेले कठोर निर्बंध आणि लष्करी कारवाईची टांगती तलवार यामुळे खामेनेई यांच्या राजवटीला घरघर लागली आहे.
Ans: वाढती महागाई (४२% पेक्षा जास्त), बेरोजगारी, पाण्याचे दुर्भिक्ष आणि हुकूमशाही राजवटीच्या विरोधात इराणमधील जनता रस्त्यावर उतरली आहे.
Ans: विविध अहवाल आणि रॉयटर्सच्या तपासानुसार, खामेनेई यांची एकूण संपत्ती सुमारे ९५ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे.
Ans: सीरियाचे माजी नेते असद यांच्याप्रमाणेच खामेनेईंना रशिया हा सर्वात सुरक्षित देश वाटतो, कारण त्यांचे पुतिन यांच्याशी चांगले संबंध आहेत.






