
Iran-Israel War : पश्चिम आशियात युद्धाचं चित्र आणखी बदलतंय; इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, बगदाद विमानतळावर स्फोट
Iran Cluster Bomb Attack on Tel Aviv 2026 : इराण आणि इस्रायलमधील युद्धाने (US-Israel Iran War) आता १९ व्या दिवशी विनाशाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. १८ व्या दिवशी इस्रायलने तेहरानच्या काळजात घुसून इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि बसिज दलाचे कमांडर घोलराझा सोलेमानी यांची हत्या केली होती. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण इराणमध्ये शोककळा पसरली होती. मात्र, इराणने या शोकाचे रूपांतर अवघ्या काही तासांतच भीषण सूडामध्ये केले आहे. इराणने आपल्या प्रगत क्षेपणास्त्र आणि ‘क्लस्टर बॉम्ब’च्या सहाय्याने इस्रायलच्या तेल अवीव शहराला रणांगण बनवले आहे.
इराणने मंगळवारी रात्री तेल अवीवच्या सॅव्हिडोर सेंट्रल ट्रेन स्टेशनला लक्ष्य केले. इराणने यावेळी साध्या क्षेपणास्त्रांऐवजी ‘क्लस्टर बॉम्ब’चा वापर केला, जे हवेतच फुटून शेकडो छोटे बॉम्ब सर्वत्र पसरवतात. या हल्ल्यात रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून मृतांचा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेल अवीवच्या रस्त्यांवर सध्या केवळ रुग्णवाहिकांचे सायरन आणि लोकांचा आक्रोश ऐकू येत आहे. इस्रायलची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली (Iron Dome) देखील इराणच्या या एकत्रित हल्ल्यापुढे हतबल ठरल्याचे पाहायला मिळाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crude Oil: उच्चस्तरीय जागतिक रणनीती! चार टँकर, लाखो बॅरल तेल गुप्त मार्गाने पाठवून ‘या’ मुस्लिम देशाने जिंकले भारताचे मन
इराणचा हा संताप केवळ इस्रायलपुरता मर्यादित राहिला नाही. इराणने कतारची राजधानी दोहा आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरावरही क्षेपणास्त्रे डागली. कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लष्कराने इराणची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, दोहा शहरात झालेल्या प्रचंड स्फोटांच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दुबईमध्येही हवाई संरक्षण यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप करून इराणचा ड्रोन हल्ला हाणून पाडला आहे.
sentdefender: Extensive damage to several areas of Tel Aviv, Israel resulting from the impact of cluster munitions during tonight’s ballistic missile attack by Iran. pic.twitter.com/ZRQGNj1rFg — NΞMICO (@NemicoNetwork) March 17, 2026
credit – social media and Twitter
सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाजवळही क्षेपणास्त्र पडले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रासी यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “अणु प्रकल्पांवर होणारे हल्ले म्हणजे संपूर्ण जगाला विनाशाच्या खाईत लोटण्यासारखे आहे,” असे ग्रासी यांनी म्हटले आहे. दरम्यान, सौदी अरेबियाने या वाढत्या तणावावर चर्चा करण्यासाठी रियाधमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे, ज्यात अनेक इस्लामिक देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dhurandhar 2: कॅनडा-फिनलँड राष्ट्राध्यक्षांनाही ‘धुरंधर’ची भुरळ; लंडनच्या रस्त्यांवरील ‘त्या’ VIRAL VIDEOची चर्चा संपूर्ण जगभर
संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अमीर सईद इरवानी यांनी दावा केला आहे की, अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमणामुळे आतापर्यंत इराणचे १,३०० नागरिक मारले गेले आहेत. मात्र, मानवाधिकार संघटनांच्या (HRANA) मते हा आकडा १,८५८ च्या पार गेला असू शकतो. मध्यपूर्वेतील हे युद्ध आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहिले नसून, ते संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर घेऊन आले आहे.
Ans: इराणने तेल अवीवच्या सॅव्हिडोर सेंट्रल ट्रेन स्टेशनवर अत्यंत घातक अशा 'क्लस्टर बॉम्ब'चा वर्षाव केला, ज्यामुळे मोठा विध्वंस झाला.
Ans: इस्रायलने तेहरानवर हवाई हल्ला करून इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि बसिज कमांडर घोलराझा सोलेमानी यांची हत्या केली होती.
Ans: इराणने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन कतार आणि दुबईच्या हवाई संरक्षण प्रणालींनी हवेतच नष्ट केले, ज्यामुळे तिथे मोठी हानी टळली.