बॉलीवूडचा 'धुरंधर' इफेक्ट! फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांना लागलं वेड; लंडनमध्ये जॉगिंग करताना चक्क रणवीर सिंगच्या सिनेमाची चर्चा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Finland President Dhurandhar Movie : बॉलीवूडचा (Bollywood) प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून तो आता सातासमुद्रापार जागतिक नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब! नुकताच लंडनच्या हायड पार्कमध्ये एक असा प्रसंग घडला की, ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Alexander Stubb and Mark Carney) जेव्हा आपल्या पत्नींसोबत लंडनच्या रस्त्यांवर मॉर्निंग वॉक आणि जॉगिंग करत होते, तेव्हा त्यांच्या संवादात अचानक भारताचा आणि बॉलीवूडच्या ‘धुरंधर’ चित्रपटाचा विषय निघाला.
अलेक्झांडर स्टब यांनी स्वतः आपल्या ‘X’ (ट्विटर) हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत धावताना दिसत आहेत. संवादादरम्यान कार्नी यांनी स्टब यांना विचारले की, “भारतातील तुमची इन्स्टाग्राम स्टोरी कशी होती?” त्यावर हसत स्टब यांनी उत्तर दिले की, “‘धुरंधर’ पाहिल्यानंतर मी खूप मोठा झालो आणि तो चित्रपट पाहताना माझ्या लक्षात आले की, हा काही साधा खेळ नाही.” दोन्ही जागतिक नेत्यांचा हा हलकाफुलके संवाद आता ‘धुरंधर इफेक्ट’ म्हणून ओळखला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ordnance Factory Day: भारताची ‘शस्त्रशक्ती’ धनुष तोफ ते पिनाक रॉकेट! वाचा भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीज्नी देशाला कसं बनवलं शक्तिशाली?
काही दिवसांपूर्वी अलेक्झांडर स्टब भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या मुलाने त्यांना भारतात येण्यापूर्वी ‘धुरंधर’ चित्रपट पाहण्याचा आग्रह धरला होता. स्टब यांनी केवळ तो चित्रपट पाहिलाच नाही, तर त्यातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईचे आणि गुप्तहेर मोहिमेचे कौतुकही केले. इतकेच नाही तर, या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ पाहण्यासाठी ते स्वतः आतुर असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. एका देशाच्या सर्वोच्च नेत्याने बॉलीवूड चित्रपटाबद्दल इतकी आत्मीयता दाखवणे, हे भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे यश मानले जात आहे.
No ice-hockey rinks available, so a nice morning run in Hyde Park with Prime minister @MarkJCarney, Diana and Suzanne. pic.twitter.com/frvOts0V6v — Alexander Stubb (@alexstubb) March 17, 2026
credit – social media and Twitter
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि आर. माधवन यांसारख्या तगड्या स्टारकास्टने नटलेल्या या चित्रपटाने २०२५ मध्ये कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. हा चित्रपट भारताच्या एका अत्यंत धाडसी आणि गोपनीय गुप्तहेर मोहिमेवर आधारित आहे. चित्रपटामधील हाय-व्होल्टेज ॲक्शन आणि भू-राजकीय (Geo-politics) मांडणीमुळे परदेशातील प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाची मोठी क्रेज निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait: महासत्ता हतबल नाही तर आक्रमक! अमेरिकेचे 5,000 पौंडांचे ‘बंकर बस्टर’ बरसले इराणच्या छाताडावर; जमिनीखालचे तळ बेचिराख
‘धुरंधर’च्या अफाट यशानंतर आता ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा सिक्वेल १९ मार्च २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. ७ मार्चला रिलीज झालेल्या ट्रेलरने आधीच यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांनी या चित्रपटाचा उल्लेख केल्यामुळे आता जागतिक स्तरावर या चित्रपटाची ओपनिंग ऐतिहासिक ठरेल, असा अंदाज चित्रपट व्यापार तज्ज्ञांनी वर्तवला आहे. फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांचा हा व्हिडिओ म्हणजे बॉलीवूडच्या वाढत्या सॉफ्ट पॉवरचे उत्तम उदाहरण आहे.
Ans: अलेक्झांडर स्टब यांनी त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरून हा चित्रपट पाहिला आणि त्यातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईने ते प्रभावित झाले आहेत.
Ans: या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत
Ans: हा बहुप्रतीक्षित सिक्वेल १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






