
Iran Protest Crackdown: इराण हादरलं! निदर्शकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा करणार कठोर कारवाई
Iran Protest Crackdown: गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस सुरू झालेल्या निदर्शनांनी इराणला हादरवून टाकले. आता, ही निदर्शन मोठ्या प्रमाणात कमी झाली आहेत आणि खामेनेई राजवटीने दंगलखोरांवर कारवाई सुरू केली आहे. इराणच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ज्यांना अधिकारी दंगलखोर म्हणत आहेत अशा आंदोलकांना अल्टिमेटम दिला. उच्च पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अशा निदर्शकांनी तीन दिवसांत आत्मसमर्पण करावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, तथापि, इराणी सरकारने या आंदोलकांना आर्थिक अडचणी दूर करण्याचे आश्वासनदेखील दिले आहे.
मानवाधिकार गटांचे म्हणणे आहे की, या कारवाईत हजारो लोक मारले गेले आहेत. इराणमधील अलीकडील निदर्शने इराणी नेतृत्त्वासमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणून उदयास आली आहेत. वाढत्या महागाई आणि इराणी चलनात तीव्र घसरण यामुळे सुरू झालेल्या निदर्शनांनी लवकरच खामेनेई राजवटीला उलथवून टाकण्याच्या मागणीपर्यंत मजल मारली, निदर्शनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इराणने इंटरनेट ब्लॉक केले आहे आणि आंतरराष्ट्रीय फोन कॉलदेखील प्रतिबंधित केले आहेत. यामुळे, निदर्शने आणि हिंसाचाराची संपूर्ण माहिती अद्याप अस्पष्ट आहे. तथापि, इराणी अधिकाऱ्यांने देशभरात इंटरनेट सेवा हळूहळू पूर्ववत केली जाईल असे सांगितले.
दरम्यान, अधिकारी निदर्शकांवर मृत्युदंडाचा वापर करू शकतात अशी चिंतादेखील वाढली आहे. संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला की, इराण फाशीचा वापर धमकीचे शस्त्र म्हणून करत आहे. मानवाधिकार गटांच्या मते, चीननंतर इराणमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर संबंधिक फाशी देण्यात येते. संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी इराणमध्ये १,५०० लोकांना फाशी देण्यात आल्याचे वृत्त आहे. सुरक्षा अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले की निदर्शनाच्या संदर्भात आतापर्यंत सुमारे ३,००० लोकांना अटक करण्यात आली आहे, जरी मानवाधिकार गटांचे म्हणणं आहे की, ही संख्या २०,००० पर्यंत असू शकते.
दरम्यान, इराणी पोलिस प्रमुख अहमद-रेझा रादान यांनी सांगितले की, काही तरुणांना दिशाभूल करून दंगलीत सामील करण्यात आले. त्यांनी त्यांना कमी शिक्षा मिळाली म्हणून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले, जे अनवधानाने दंगलीत सामील झाले त्यांना शत्रू सैनिक म्हणून नव्हे तर सौम्यतेने वागवले जाईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की निदर्शने सुरुवातीला शांततापूर्ण होती परंतु नंतर ती हिंसेत रूपांतरित झाली. इराणचे कट्टर प्रतिस्पर्धी, अमेरिका आणि इस्स्रायल यांनी इराणला अस्थिर करण्याच्या या प्रयत्नात भूमिका बजावली. इराणी अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ आणि न्यायपालिका प्रमुख गुलामहोसेन मोहसेनी एप्लाई यांनी निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादी घटनांना चिथावणी देणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल.