Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : ‘Thank you people of India’ एक संदेश आणि गेम ओव्हर; इराणनच्या इस्रायलवर हल्ल्याचा ‘हा’ VIDEO तुफान VIRAL

US-Iran War: ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 चा भाग म्हणून इराणने इस्रायली आणि अमेरिकी लष्करी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. विशेष म्हणजे, इराणने आपल्या क्षेपणास्त्रांवर "धन्यवाद" लिहून अनेक देशांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 27, 2026 | 01:59 PM
iran missile attack thank you india operation true promise 4 israel us bases 2026

iran missile attack thank you india operation true promise 4 israel us bases 2026

Follow Us
Follow Us:
  • ‘थँक यू’ क्षेपणास्त्र
  • ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४
  • सांस्कृतिक आणि राजकीय संदेश

Iran Missile attack Thank You India : मध्य-पूर्वेतील युद्धाने (US-Israel Iran War) आज एक अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक वळण घेतले आहे. शुक्रवार, २७ मार्च २०२६ ची सकाळ इस्रायलसाठी काळ बनून आली. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ने (IRGC) इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. मात्र, या लष्करी कारवाईपेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती इराणने वापरलेल्या एका अनोख्या ‘मेसेजिंग’ची. इराणने आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर जगातील काही देशांचे आभार मानले आहेत, ज्यात भारताचे नाव प्रामुख्याने दिसून येत आहे.

क्षेपणास्त्रावर ‘थँक यू इंडिया’ कशासाठी?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, इराणच्या लष्कराने क्षेपणास्त्रांवर इंग्रजीमध्ये ‘Thank You’ असे लिहून भारत, पाकिस्तान, स्पेन आणि जर्मनी या देशांच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तज्ञांच्या मते, इराण या माध्यमातून अशा देशांमधील जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यांनी अमेरिकेच्या आक्रमक धोरणांना विरोध केला आहे किंवा तटस्थ राहून शांततेची मागणी केली आहे. विशेषतः स्पेनच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला लष्करी तळ देण्यास नकार दिल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थही इराणने अशीच कृती केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: ‘PM Modi आणि मी अशक्यही शक्य करू’, नेतृत्वाची नवी वाख्या भारताचे पंतप्रधान; वाचा Trumpने का काढली आठवण?

कुठे कुठे झाले हल्ले? अमेरिकन तळांनाही बसला फटका!

‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४’ हे केवळ इस्रायलपुरते मर्यादित नव्हते. इराणने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अमेरिकेच्या प्रभावाखालील तळांना लक्ष्य केले. यामध्ये अशदोदमधील तेल डेपो, मोदिइन वस्तीमधील लष्करी तळ आणि कुवेत-कतारमधील अल-धाफ्रा, अल-उदेरी आणि अली अल-सालेम यांसारख्या प्रमुख हवाई तळांचा समावेश होता. या हल्ल्यांमध्ये ड्रोन देखभाल हँगर्स आणि ट्रान्सपोर्ट विमानांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा इराणच्या ‘प्रेस टीव्ही’ने केला आहे.

Iran launches WAVE 83 missile AND drone attack on ‘Zionist soldiers’ — IRIB THANK YOUS written on missiles in English to people across globe pic.twitter.com/wjjVietkAo — RT (@RT_com) March 26, 2026

credit – social media and Twitter

इराणची ‘सायकोलॉजिकल वॉरफेअर’ रणनीती

इराणने क्षेपणास्त्रांवर पोस्टर्स लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी हिरोशिमा-नागासाकीच्या आठवणी जागवून अमेरिकेला चिडवले होते. यावेळी त्यांनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांचे चित्र क्षेपणास्त्रावर लावून अमेरिकेच्या मोहिमेला ‘बेकायदेशीर’ ठरवणाऱ्या जागतिक नेत्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. हा एका प्रकारचा मानसिक दबाव (Psychological Warfare) आहे, ज्याद्वारे इराण जगाला सांगू इच्छितो की ते या लढाईत एकटे नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Earthquake : अवघ्या 10 मिनिटांत 3 देश हादरले! जपानच्या किनारपट्टीवर भीतीचा थरार; तर नेपाळ आणि भारतातही भूकंपाचे धक्के

भारतासाठी याचे काय आहेत अर्थ?

इराणने भारताचे आभार मानणे हे भारताच्या संतुलित परराष्ट्र धोरणाचे फळ मानले जात आहे. भारताने सातत्याने दोन्ही बाजूंना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, इराणच्या या कृतीमुळे जागतिक राजकारणात भारताची प्रतिमा कशी प्रतिबिंबित होईल, याकडे मुत्सद्द्यांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, कारण नुकतेच त्यांनी मोदींसोबत काम करण्याचे सूतोवाच केले होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने क्षेपणास्त्रांवर 'थँक यू इंडिया' का लिहिले आहे?

    Ans: इराणने आपल्या मोहिमेला जागतिक पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि ज्या देशांच्या जनतेने अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा विरोध केला आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे लिहिले आहे.

  • Que: 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४' नक्की काय आहे?

    Ans: हे इराणचे इस्रायल आणि अमेरिकेविरुद्धचे चौथे मोठे लष्करी अभियान आहे, जे २७ मार्च २०२६ रोजी राबवण्यात आले.

  • Que: या हल्ल्यात कोणत्या प्रमुख तळांना लक्ष्य करण्यात आले?

    Ans: अशदोद तेल डेपो, अल-धाफ्रा हवाई तळ आणि मोदिइन लष्करी तळ यांसह अनेक अमेरिकन आणि इस्रायली तळांना लक्ष्य करण्यात आले.

Web Title: Iran missile attack thank you india operation true promise 4 israel us bases 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • missile air strike
  • US-Israel Iran War
  • Video Viral
  • World War 3

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.