
Fran Rally against Iran Khamenei Regime
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक महिला एका रॅलीदरम्यान हिजाब काढून फेकताना दिसत आङे. हा व्हिडिओ इराणमधील असल्याचा दावा केला जात होता. परंतु हा व्हिडिओ फ्रान्सच्या पॅरिस येथील इराणमधील आंदोलकांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीचा आहे. या व्हिडिओत महिलेने इराणच्या सरकारच्या दडपशाहीविरोधात, सक्तीच्या हिजाबाविरोधात, मानवाधिकार उल्लंघन आणि इराणमध्ये निदर्शकांवर झालेल्या हिंसाचाराविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की शेकडो लोक या रॅलीमध्ये इराणी आंदोलकांच्या समर्थनार्थ आले आहेत.
या आंदोलनात विविध देशांचे लोक झेंडा घेऊन आले आहे. तसेच मानवाधिकारांचे पोस्टर्स, घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. एका महिलेने स्टेजवर सर्व लोकांसमोर हिजाब काढला आहे. यानंतर तिच्या टी-शर्टवर प्रतीकात्मक संदेश लिहिला आहे. यावर आक्षेपार्ह संदेश लिहिण्यात आले आहे. हा संदेश पाहून अनेजकण हैराण झाले आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फ्रान्स, ब्रिटन, युरोपसह अनेक देशांमध्ये लोक खामेनेई सरकारविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत रस्त्यांवर उतरले आहेत.
Camille Eros confronta corajosamente o ditador do Irã, tirando o véu que massacra milhares de mulheres todos os anos, desde 1979, após a revolução islâmica que, desde então, mudou drasticamente o rumo de uma nação.
Com um recado real e ousado, Camille representa o que nenhum… pic.twitter.com/kWBJPS16W6 — Carìna Belomé (@CarinaBelome) January 12, 2026
इराणमधील परिस्थिती सध्या अत्यंत बिकट बनली आहे. राजधानी तेहरानसह, अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहे. तसेच सुरक्षा दलांच्या बलपूर्वक कारावईमध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. रस्त्यांवर मृतदेहांच्या रांगा लागल्या आहेत. लोक सरकारविरोधात तीव्र आक्रोश करत आहेत.
Ans: इराणसंबंधी व्हायरल होत हिजाब काढणाऱ्या महिलेचा व्हिडिओ हा फ्रान्समध्ये पॅरिस येथे इराण आंदोलकांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीचा आहे.
Ans: फ्रान्समध्ये इराणच्या आंदलोकांच्यासमर्थनार्थ रॅली काढण्यात आली असून याचा उद्देश महिलांवरील दडपशाही, सक्तीचा हिजाब, मानवाधिकाराचे उल्लंघन, आणि सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध करणे आहेत.