Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Ultimatum: ‘याच्या’ बदल्यात ‘Hormuz’ नाहीच; इराणला अमेरिकेची अट अमान्य; पाकिस्तानच्या प्रस्तावावर विचार सुरू

World War 3 Alert : Iran इराणने युद्धविरामाचा विचार करण्यास आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास नकार दिला आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी तेहरानने आपली भूमिका अधिक कठोर केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 06, 2026 | 02:40 PM
iran rejects us ceasefire deal hormuz strait trump ultimatum deadline 2026

iran rejects us ceasefire deal hormuz strait trump ultimatum deadline 2026

Follow Us
Follow Us:
  • इराणची ‘नो तडजोड’ भूमिका
  • ट्रम्प यांचा ‘डेडलाईन’ वॉर
  • पाकिस्तानचा मध्यस्थीचा प्रयत्न

Donald Trump ultimatum to Iran May 2026 : आखाती देशांमधील युद्धाचा वणवा आता विझण्याऐवजी अधिकच भडकताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेला अल्टिमेटम संपायला आता अवघे काही तास उरले असताना, इराणने (Iran) आपली भूमिका अधिकच कठोर केली आहे. “सीझफायरच्या (युद्धविराम) बदल्यात आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही,” असे तेहरानने स्पष्ट शब्दात बजावले आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी इराणने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण जगात ‘बॅटल अलर्ट’ जारी झाला आहे.

ट्रम्प यांचा ‘मंगळवार रात्री ८’ चा अल्टिमेटम

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून इराणला शेवटचा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता (ईस्टर्न टाईम), म्हणजेच भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी, इराणवर मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले आहे की, जर इराणने होर्मुझची नाकेबंदी उठवली नाही, तर त्यांच्या देशात एकही वीज प्रकल्प किंवा सुरक्षित पूल शिल्लक राहणार नाही. यापूर्वी ट्रम्प यांनी केवळ पायाभूत सुविधांवर हल्ल्याचा इशारा दिला होता, मात्र आता त्यांनी वेळ निश्चित केल्याने युद्धाचा धोका वाढला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rising India: जगाला हवी S Jaishankar यांची दुर्बिण! प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञाकडून त्यांच्या ‘या’ 3 मंत्रांची मोठी प्रशंसा

पाकिस्तानचा प्रस्ताव अन् इराणची नाराजी

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शेजारील देश पाकिस्तानने या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असून इराणला एक शांतता प्रस्ताव पाठवला आहे. इराणचे अधिकारी सध्या या प्रस्तावावर विचार करत आहेत. मात्र, इराणने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. “अमेरिका कायमस्वरूपी शांततेसाठी गंभीर नाही, ते केवळ आमच्यावर दबाव टाकत आहेत,” असे इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इराणचा दावा आहे की, तात्पुरत्या युद्धविरामाच्या बदल्यात होर्मुझसारखा महत्त्वाचा लष्करी आणि आर्थिक मार्ग ते मोकळा करणार नाहीत.

As it currently stands, Iran has refused all proposals for negotiations outright, and has no interest to meet with the US either directly or indirectly. Mediators have failed to bring the two parties together and bring about a ceasefire. Oh well… I guess they want the hellfire pic.twitter.com/UnIEluuepC — Mor Edge Insight (@MorEdge_Insight) April 5, 2026

credit – social media and Twitter

होर्मुझची सामुद्रधुनी: जागतिक अर्थव्यवस्थेची ‘जीवनवाहिनी’

होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद झाल्यामुळे संपूर्ण जगाचे टेन्शन का वाढले आहे? कारण, जगातील एकूण तेल पुरवठ्याचा एक मोठा भाग याच अरुंद सागरी मार्गातून जातो. जर हा मार्ग बंद राहिला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती इतक्या वाढतील की जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते. इराणला माहित आहे की, हेच त्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे, म्हणूनच ते सीझफायरच्या बदल्यात हे शस्त्र म्यान करायला तयार नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Majid Khatami: ज्याच्या एका आदेशाने अमेरिकाही हादरत होती, अमेरिका-इस्रायलने त्यालाच केले ठार; गुप्तचर यंत्रणेचे मोडले कंबरडे

आगामी २४ तास अत्यंत कळीचे!

पाकिस्तानच्या प्रस्तावात दोन टप्प्यांत शस्त्रसंधी लागू करण्याचे म्हटले आहे, मात्र ट्रम्प यांच्या आक्रमकतेमुळे इराण घाईत कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. “आम्ही दबावाखाली किंवा कोणाच्या मुदतीमुळे तडजोड करणार नाही,” असे इराणने ठणकावून सांगितले आहे. आता सर्वांच्या नजरा बुधवारी सकाळी ट्रम्प यांच्या संभाव्य कारवाईकडे लागल्या आहेत. जर ट्रम्प यांनी खरंच इराणच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य केले, तर हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगाला विळख्यात घेईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला अल्टिमेटम कधी संपणार आहे?

    Ans: ट्रम्प यांचा अल्टिमेटम मंगळवारी रात्री ८ वाजता (ईस्टर्न टाईम) संपणार आहे, जो भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी असेल.

  • Que: इराणने युद्धविरामासाठी कोणती अट नाकारली आहे?

    Ans: युद्धविरामाच्या बदल्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची अमेरिकेची अट इराणने अमान्य केली आहे.

  • Que: पाकिस्तानने इराणला कोणता प्रस्ताव दिला आहे?

    Ans: पाकिस्तानने युद्ध थांबवण्यासाठी एक शांतता प्रस्ताव दिला आहे, ज्यावर इराण सध्या विचार करत आहे.

Web Title: Iran rejects us ceasefire deal hormuz strait trump ultimatum deadline 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Donald Trump
  • iran
  • Pakistan News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक
1

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका
2

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
3

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
4

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.