
iran turns back pakistan ship selan strait of hormuz shehbaz sharif mediation fail 2026
Strait of Hormuz ship turnaround news : मध्य-पूर्वेतील तणावाच्या (US-Israel Iran War) आगीत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला इराणने जमिनीवर आणले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या इशाऱ्यावरून ‘शांतीदूत’ बनू पाहणाऱ्या शहबाज शरीफ सरकारला इराणने असा काही दणका दिला आहे की, संपूर्ण इस्लामाबादमध्ये शांतता पसरली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) कराचीकडे जाणारे एक मोठे मालवाहू जहाज भर समुद्रात रोखून पाकिस्तानचा मोठा अपमान केला आहे.
‘सेलान’ नावाचे एक कंटेनर जहाज संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) शारजाह बंदरातून ६,८५० टन माल घेऊन पाकिस्तानच्या कराची बंदराकडे निघाले होते. २००० साली बांधलेले हे जहाज ओमानमार्गे होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) पोहोचले. मात्र, तेवढ्यात इराणी लष्कराच्या (IRGC) बोटींनी या जहाजाला घेरले. इराणी अधिकाऱ्यांनी जहाजाच्या कॅप्टनला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, त्यांना या जलमार्गातून पुढे जाण्याची परवानगी नाही. कोणत्याही संघर्षापेक्षा जहाजाला परत वळवणेच योग्य असल्याचे सांगत, इराणने हे जहाज पुन्हा युएईकडे धाडले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट
विशेष म्हणजे, ही घटना घडण्यापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, “जर अमेरिका आणि इराण सहमत असतील, तर पाकिस्तान या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी निर्णायक चर्चेचे आयोजन करण्यास तयार आहे.” पाकिस्तानला वाटले होते की ते मध्यस्थी करून जागतिक राजकारणात आपले वजन वाढवतील. मात्र, इराणने त्यांचे जहाज अडवून हे स्पष्ट केले की, आम्हाला तुमच्या मध्यस्थीची गरज नाही. इराणने या कृतीतून पाकिस्तानला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे.
#WallStreet #BolsaUSA [ERROR DE TRADUCCIÓN: #BREAKINGNEWS IRAN TURNS BACK CONTAINER SHIP IN STRAIT OF HORMUZ The container ship Selen was stopped for lacking proper permission to transit the Strait of Hormuz, according to IRGC Navy commander Alireza Tangsiri. Passage requires f… — *Mister_Mercado (@sharkputs) March 24, 2026
credit – social media and Twitter
तज्ज्ञांच्या मते, इराणने केवळ पाकिस्तानलाच नाही, तर अमेरिकेलाही इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाशी पाकिस्तानचे असलेले जवळचे संबंध पाहता, इराणने जाणीवपूर्वक पाकिस्तानचे जहाज टार्गेट केले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगाची ‘लाईफलाईन’ आहे आणि तिथे आमचेच राज्य चालते, हे इराणला या निमित्ताने सिद्ध करायचे होते. अमेरिकेच्या सांगण्यावरून मध्यस्थीचा आव आणणाऱ्या देशांना इराण थारा देणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Popularity : ट्रम्प यांची बायडेनपेक्षाही वाईट स्थिती! 61% अमेरिकन जनतेने फिरवली पाठ; युद्ध आणि महागाईनेच केला घात
या घटनेमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक अधिक धोक्यात आली आहे. ६,८५० टन मालाचे जहाज कोणत्याही ठोस कारणाशिवाय परत पाठवणे, हे आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे उल्लंघन मानले जात आहे. पाकिस्तान आणि युएईने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण अंतर्गत गोटात या अपमानाचा मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानचे ‘शांतता उपक्रम’ आता कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Ans: अधिकृतपणे इराणने सुरक्षेचे कारण दिले असले तरी, प्रत्यक्षात पाकिस्तानच्या अमेरिकाधार्जिण्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना विरोध दर्शवण्यासाठी ही कारवाई केल्याचे मानले जात आहे.
Ans: जगातील २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच अरुंद जलमार्गातून होते, त्यामुळे यावर ताबा मिळवणे म्हणजे जागतिक ऊर्जेवर नियंत्रण मिळवणे होय.
Ans: शरीफ यांनी अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानमध्ये चर्चेचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली होती, जी इराणने आपल्या कृतीने फेटाळून लावली.