Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine: ‘आता रशियाला धडा शिकवण्याची वेळ’ इराण युद्धविरामाची घोषणा होताच युक्रेनची ट्रम्पकडे ‘ही’ विशेष मागणी

Ukraine War: अमेरिका आणि इराण यांच्यातील ४० दिवसांच्या युद्धानंतर दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला आहे. या राजनैतिक विजयामुळे युक्रेनमध्ये आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी आता रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्पना....

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 08, 2026 | 03:31 PM
iran usa ceasefire ukraine demands russia war stop trump operation epic fury 2026

iran usa ceasefire ukraine demands russia war stop trump operation epic fury 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • इराण युद्धात शस्त्रसंधी
  • युक्रेनची मोठी मागणी
  • ट्रम्प यांचा ‘विजयोस्त्व’

Ukraine demands Russia ceasefire from Trump : जागतिक राजकारणात आज एक अत्यंत ऐतिहासिक वळण पाहायला मिळाले. मध्य-पूर्वेतील रणांगणावर (US-Israel Iran War) गेल्या ३८ दिवसांपासून सुरू असलेला अमेरिका आणि इराणमधील रक्तरंजित संघर्ष अखेर तात्पुरता थांबला आहे. दोन्ही देशांनी दोन आठवड्यांच्या ‘सीझफायर’वर (युद्धविराम) स्वाक्षरी केली आहे. या काळात दोन्ही देशांचे प्रतिनिधी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एकत्र येऊन कायमस्वरूपी करारावर चर्चा करणार आहेत. इराणमधील ही शांततेची बातमी येताच, गेल्या चार वर्षांपासून रशियाच्या (Russia Ukraine War) आक्रमणाचा सामना करणाऱ्या युक्रेनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

युक्रेनचे ट्रम्प यांना साकडे: “आता पुतिन यांची पाळी!”

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाचे युक्रेनने मनापासून स्वागत केले आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री त्सिबिहा यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना ट्रम्प यांच्या ‘डिसायसिव्हनेस’चे (निर्णायकता) कौतुक केले. त्सिबिहा म्हणाले की, “ज्याप्रमाणे अमेरिकेने इराणला चर्चेच्या टेबलावर आणले, त्याच निर्णायकतेने आता रशियालाही युद्धविराम करण्यास भाग पाडले पाहिजे.” युक्रेनचा विश्वास आहे की जर ट्रम्प यांनी रशियावर दबाव वाढवला, तर वर्षानुवर्षे चाललेले हे युद्ध देखील संपुष्टात येऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Crisis: इराण संकटात पाकिस्तानची स्क्रिप्ट व्हाईट हाऊसने लिहिली? शहबाज शरीफ यांची ती ‘पोस्ट’ धक्कादायक अन् पुरावे VIRAL

व्हाईट हाऊसचा विजयोन्माद: ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ यशस्वी!

अमेरिकेच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या युद्धविरामाला अमेरिकेचा मोठा विजय म्हणून घोषित केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ या लष्करी मोहिमेने आपली सर्व उद्दिष्टे वेळेच्या आधीच पूर्ण केली आहेत. ट्रम्प यांनी सुरुवातीला हे युद्ध ४ ते ६ आठवडे चालेल असा अंदाज वर्तवला होता, परंतु अमेरिकन लष्कराच्या जबरदस्त कामगिरीमुळे अवघ्या ३८ दिवसांत इराणला नमवण्यात यश आले आहे. या यशाने डोनाल्ड ट्रम्प यांची जागतिक स्तरावर ‘पीसमेकर’ (शांतता प्रस्थापित करणारा) म्हणून प्रतिमा निर्माण करण्यास मदत केली आहे.

White House claims victory, welcomes opening for ‘long-term peace’ White House Press Secretary Karoline Leavitt has lauded the ceasefire as a victory for the US that she said Trump and the American military “made happen”. From the beginning, she said, Trump had estimated the… pic.twitter.com/7xI70Lqiho — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 8, 2026

credit – social media and Twitter

पाकिस्तानची मध्यस्थी अन् इस्लामाबादमधील पुढील बैठक

या संपूर्ण युद्धविराम प्रक्रियेत पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोन्ही देशांना एकत्र आणण्यासाठी पाकिस्तानने केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आहे. आता पुढचे १४ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेत इराण आपल्या अणुकार्यक्रमाबाबत आणि अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांबाबत काय तडजोड करतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. जर इराणचे हे मॉडेल यशस्वी झाले, तर तेच मॉडेल रशिया-युक्रेन युद्धासाठी देखील वापरले जाऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House Protest: इराण युद्धाला 15 दिवसांचा ‘विश्राम’! ट्रम्प यांच्या निर्णयाने वॉशिंग्टन पेटलं; व्हाईट हाऊसला आंदोलकांचा वेढा

जागतिक तणाव कमी होणार का?

तज्ज्ञांच्या मते, इराणमधील युद्धविराम हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा दिलासा आहे. यामुळे तेलाच्या किमतीत स्थिरता येण्याची शक्यता आहे. मात्र, युक्रेनची मागणी पाहता आता चेंडू रशियाच्या कोर्टात आहे. पुतिन या युद्धविरामाला कसा प्रतिसाद देतात आणि ट्रम्प रशियावर कशाप्रकारे दबाव आणतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. युक्रेनला आशा आहे की ट्रम्प यांची ही ‘डिसायसिव्ह’ भूमिका त्यांना न्याय मिळवून देईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका आणि इराणमध्ये किती दिवसांचा युद्धविराम झाला आहे?

    Ans: अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या (१४ दिवस) युद्धविरामावर सहमती झाली आहे.

  • Que: 'ऑपरेशन एपिक फ्युरी' नक्की काय आहे?

    Ans: 'ऑपरेशन एपिक फ्युरी' ही अमेरिकेने इराणविरुद्ध राबवलेली ३८ दिवसांची लष्करी मोहीम आहे, जी यशस्वी झाल्याचा दावा व्हाईट हाऊसने केला आहे.

  • Que: युक्रेनने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कोणती मागणी केली आहे?

    Ans: ज्याप्रमाणे इराणला युद्धविराम करण्यास भाग पाडले, त्याचप्रमाणे रशियालाही युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणण्याची मागणी युक्रेनने केली आहे.

Web Title: Iran usa ceasefire ukraine demands russia war stop trump operation epic fury 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

White House Firing : अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’बाहेर गोळीबार; ट्रम्प यांच्याबाबत मोठी अपडेट…
1

White House Firing : अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’बाहेर गोळीबार; ट्रम्प यांच्याबाबत मोठी अपडेट…

Oil Crisis 2026 : जगावर दिवाळखोरीचे सावट! इराण युद्धामुळे 27 देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त; मदतीसाठी वर्ल्ड बँकेसमोर पसरले हात
2

Oil Crisis 2026 : जगावर दिवाळखोरीचे सावट! इराण युद्धामुळे 27 देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त; मदतीसाठी वर्ल्ड बँकेसमोर पसरले हात

पश्चिम आशियातील युद्ध आता लवकरच थांबणार; ‘या’ अटींवर झाले एकमत
3

पश्चिम आशियातील युद्ध आता लवकरच थांबणार; ‘या’ अटींवर झाले एकमत

IvankaTrump : सत्य की तथ्य? ‘ट्रम्पची मुलगी होती निशाण्यावर…’ इराण ‘असा’ घेणार होता सूड; अमेरिकेत कमांडो तैनात
4

IvankaTrump : सत्य की तथ्य? ‘ट्रम्पची मुलगी होती निशाण्यावर…’ इराण ‘असा’ घेणार होता सूड; अमेरिकेत कमांडो तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.