Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणून निवड

World News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष राष्ट्रपती दूत म्हणून निवड केली. बेलारूसमध्ये कैद्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्याचा अनुभव असलेल्या कोएल यांच्यावर आता परदेशात ताब्यात असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुटकेसाठी राजनैतिक प्रयत्नांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 04, 2026 | 07:13 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • बंधकांच्या सुटकेसाठी आता कोएल यांच्यावर मोठी जबाबदारी
  • बेलारूसमध्ये कैद्यांच्या सुटकेचा अनुभव
  • अमेरिकेच्या बंधक धोरणात महत्त्वाची भूमिका
World News:अमेरिका आपल्या एका एका नागरिकाला अत्यंत महत्व देते हे आपण वेळोवेळी पाहिलेले आहे . अशाच आपल्या नागरिकांसाठी जे नागरिक अमेरिका सोडून इतर जगात कुठे अडचणीत आले तर त्यासाठी सगळ्या मार्गांवर पाठपुरवठा करून त्याला मदत करण्यासाठी ट्रम्प सरकार ने आणखीच जास्त कंबर कसली आहे .

गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात दहशदवादी कारवायांमध्ये गुन्हा नोंद असलेल्या एका अमेरिकन नागरिकाला भारतातून सोडून त्याला अमेरिकेत पाठवण्यात आल्याने आता भारतात याविषयी चर्चा सुरु असतानाच समोरील बातमी आली आहे . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंधक प्रकरणांसाठी विशेष राष्ट्रपती दूत म्हणून जॉन कोएल यांची निवड केली आहे.

परदेशात अडकलेल्या किंवा बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुटकेसाठी राजनैतिक प्रयत्नांचे नेतृत्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी आता कोएल यांच्यावर येणार आहे. ट्रम्प यांनी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी ही निवड जाहीर केली. कोएल हे यापूर्वी ट्रम्प यांचे विशेष दूत म्हणून बेलारूसमध्ये काम करत होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवेदनशील चर्चांचा त्यांना अनुभव आहे.

बंधकांच्या सुटकेसाठी आता कोएल यांच्यावर मोठी जबाबदारी

अमेरिकेच्या विशेष राष्ट्रपती दूताच्या भूमिकेत कोएल यांना बंधकांच्या सुटकेसाठी विविध देशांशी राजनैतिक चर्चा करावी लागणार आहे. अमेरिकन नागरिकांना परदेशात चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधणे, संबंधित सरकारांशी संवाद वाढवणे आणि सुटकेसाठी मार्ग शोधणे ही या पदाची प्रमुख कामे आहेत.

या पदाला राजदूताचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे कोएल यांची भूमिका अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

Middle East Breaking : जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला

बेलारूसमध्ये कैद्यांच्या सुटकेचा अनुभव

जॉन कोएल यांचे नाव गेल्या काही काळात बेलारूसमधील त्यांच्या कामामुळे चर्चेत आले आहे. ट्रम्प प्रशासनाचे बेलारूसमधील विशेष दूत म्हणून त्यांनी राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या सरकारशी चर्चा केली. या चर्चांनंतर अनेक राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली. सप्टेंबरमध्येही २५ कैद्यांची सुटका झाली होती.

कोएल यांनी भविष्यात आणखी शेकडो कैद्यांची सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यामुळे कठीण परिस्थितीत राजनैतिक वाटाघाटी करण्याचा त्यांचा अनुभव या नव्या जबाबदारीत उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई

अमेरिकेच्या बंधक धोरणात महत्त्वाची भूमिका

विशेष दूत म्हणून कोएल यांना अमेरिकेच्या बंधकविषयक धोरणात महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. परदेशात ताब्यात असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या प्रकरणांमध्ये अनेकदा राजनैतिक, सुरक्षा आणि कायदेशीर बाबी एकाच वेळी समोर येतात.

त्यामुळे संबंधित देशांशी थेट चर्चा करताना अमेरिकेला विविध सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय साधावा लागतो. कोएल यांची नियुक्ती अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये थेट राजनैतिक संवादाला महत्त्व देण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या भूमिकेचा भाग म्हणून पाहिली जात आहे. त्यांच्या पुढील कामकाजाचा केंद्रबिंदू अमेरिकन नागरिकांची सुटका आणि बंधक प्रकरणांमध्ये प्रभावी वाटाघाटी हा असेल.

Web Title: World news trumps major decision john koel appointed as special envoy for hostage casescp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • Marathi News

संबंधित बातम्या

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली
1

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

Onkar Bhojane On Milind Kawde:  दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
3

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी
4

Chandrapur News: नोटीस काढली, वेळही ठरली; ग्रामसभेला सरपंच-ग्रामपंचायत अधिकारीच अनुपस्थित, ग्रामस्थांकडून स्पष्टतेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.