Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinese Spy Satellite: इराणला ड्रॅगनने दिले ‘हेरगिरीचे डोळे’; अंतराळातून रचला अमेरिकेच्या विनाशाचा कट, वाचा कसे ते?

Space War : अमेरिकी माध्यमांनी असा दावा केला आहे की, इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकी लष्करी तळांची टेहळणी करण्यासाठी आणि त्यांच्यावर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करण्यासाठी चिनी हेरगिरी उपग्रह TEE-01B चा वापर केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 15, 2026 | 03:42 PM
iran uses chinese spy satellite tee01b toattack us military bases 2026

iran uses chinese spy satellite tee01b toattack us military bases 2026

Follow Us
Follow Us:
  • चीन-इराण गुप्त युती
  • अमेरिकेचे मोठे नुकसान
  • १० पटीने वाढली ताकद

Iran use Chinese spy satellite TEE-01B : जागतिक राजकारणात आता युद्धाची व्याख्या बदलली असून, हे युद्ध जमिनीवरून थेट अंतराळात पोहोचले आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी (America) दिलेल्या एका अत्यंत खळबळजनक अहवालानुसार, इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या अति-सुरक्षित लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी चीनच्या हेरगिरी उपग्रहाची मदत घेतली आहे. ‘TEE-01B‘ नावाच्या या उपग्रहाने अमेरिकेच्या तळांची अशी माहिती इराणला दिली, ज्याने अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला मोठे भगदाड पाडले आहे.

काय आहे ‘TEE-01B’ उपग्रहाचा खेळ?

चिनी कंपनी ‘अर्थ आय’ द्वारे विकसित केलेला ‘TEE-01B’ हा केवळ एक नागरी उपग्रह नाही, तर तो इराणच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड्स’ (IRGC) साठी एक शक्तिशाली अस्त्र ठरला आहे. हा उपग्रह अर्ध्या मीटरपर्यंतच्या रिझोल्यूशनसह प्रतिमा टिपू शकतो. याचा अर्थ असा की, जमिनीवर उभी असलेली विमानेच काय, तर एखादी छोटी गाडीही या उपग्रहाच्या नजरेतून सुटू शकत नाही. २०२४ च्या उत्तरार्धात इराणने हे तंत्रज्ञान हस्तगत केले आणि तेव्हापासून अमेरिकेच्या तळांवर संकटाचे सावट आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘MemeWar’मध्ये इराणचा USला ‘चेकमेट’! येशू ख्रिस्तांनी तोडला ट्रम्पचा जबडा; ‘या’ VIRAL VIDEOमुळे जगभरात हास्याची लाट

प्रिन्स सुलतान एअरबेसवर इराणचा अचूक प्रहार

या उपग्रहाचा सर्वात भयानक वापर १३ ते १५ मार्च दरम्यान पाहायला मिळाला. चिनी उपग्रहाने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या ‘प्रिन्स सुलतान’ हवाई तळाची चोख टेहळणी केली. या माहितीच्या आधारे इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेची पाच महत्त्वाची इंधन भरणारी विमाने जागीच खाक झाली. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी या नुकसानीला दुजोरा दिला असून, अमेरिकेच्या हवाई दलासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. इतकेच नाही, तर जॉर्डन, बहरीन आणि इराक मधील अमेरिकन तळांवरही याच उपग्रहाने पाळत ठेवली होती.

FT claimed Iran secretly acquired a Chinese-built spy satellite (TEE-01B) in late 2024 via the Revolutionary Guard aerospace unit. Leaked documents suggest the satellite was used to monitor key US military bases across the Middle East, producing time-stamped imagery… pic.twitter.com/h9VuPYq9vJ — Iran’s Today (@Iran) April 15, 2026

credit – social media and Twitter

इराणची ताकद अचानक कशी वाढली?

इराणकडे स्वतःचा ‘नूर-३’ उपग्रह आहे, पण त्याची क्षमता मर्यादित होती. चीनच्या ‘TEE-01B’ मुळे इराणची अचूकता १० पटीने वाढली. याच कारणामुळे इराणला अमेरिकेची अत्यंत प्रगत अशी F-16 आणि F-35 लढाऊ विमाने शोधणे आणि ती पाडणे सोपे झाले. हल्ल्याचे नियोजन करण्यापासून ते हल्ला झाल्यानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यापर्यंत (Bala) इराणने या चिनी डोळ्यांचा पुरेपूर वापर केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : European Union: अमेरिकेला ‘बाय-बाय’! होर्मुझसाठी युरोपचा मोठा प्लॅन; भारत आणि चीनची घेणार मदत? आखाती देशांत नवी समीकरणे

तज्ज्ञांचा इशारा: ही तर जागतिक युद्धाची नांदी!

इराण प्रकरणाच्या तज्ज्ञ निकोल ग्राजेव्स्की यांच्या मते, इराणच्या एरोस्पेस फोर्सच्या हातात हे तंत्रज्ञान पडणे म्हणजे आखाती देशांमधील लष्करी समतोल बिघडण्यासारखे आहे. परदेशी तंत्रज्ञानाच्या या मदतीने इराण आता अमेरिका आणि इस्रायलला सडेतोड उत्तर देण्याच्या स्थितीत आला आहे. चीन आणि इराणची ही छुप्या पद्धतीची लष्करी युती भविष्यात जगाला मोठ्या संकटात टाकू शकते, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी कोणत्या उपग्रहाचा वापर केला?

    Ans: इराणने चीनच्या 'TEE-01B' (Earth Eye) या शक्तिशाली हेरगिरी उपग्रहाचा वापर करून अमेरिकन तळांची टेहळणी केली आणि हल्ले केले.

  • Que: या हल्ल्यात अमेरिकेचे किती नुकसान झाले आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, इराणच्या हल्ल्यात अमेरिकेची ५ इंधन भरणारी विमाने आणि काही प्रगत लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत.

  • Que: चिनी उपग्रह 'TEE-01B' इराणच्या स्वतःच्या उपग्रहापेक्षा किती शक्तिशाली आहे?

    Ans: हा चिनी उपग्रह इराणच्या स्वदेशी 'नूर-३' उपग्रहापेक्षा प्रतिमा टिपण्याच्या बाबतीत १० पटीने अधिक अचूक आहे.

Web Title: Iran uses chinese spy satellite tee01b to attack us military bases 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • America
  • China
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
1

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
4

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.