Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran War : शाळेवरील हल्ल्याला सहा महिने; मुलांना गमावलेल्या पालकांचा शोक अजूनही कायम

Iran War : इराणच्या दक्षिणेकडील मिनाब शहरातील ‘शजरेह तय्यबेह’ शाळेवरील हल्ल्याला सहा महिने पूर्ण झाले, मात्र दुर्घटनेत मुलांना गमावलेल्या पालकांचे दुःख अद्याप कायम आहे. रहिवासी आजही शाळेच्या उद्ध्वस्त इमारतीला आणि मुलांच्या कबरींना भेट देत आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 29, 2026 | 05:01 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मीनाब मधील शाळेच्या अवशेषांवर आजही गर्दी
  • सहा महिने उलटले तरीही पालकांच्या जखमा ताज्याच
  • संघर्षाची किंमत सामान्य नागरिकांनाच
Iran War : जगाने सार्वमताने युद्धासाठी काही नियम बनवले आहेत . ज्यामध्ये शाळा , हॉस्पिटल्स , वृद्धाश्रम तसेच आपत्कालीन सेवा देणाऱ्या जागेवर आणि लोकांवर हल्ले करायचे नाहीत . जर यावर हल्ले झाले तर ते युद्धात केलेला गुन्हा ठरतो . पण अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण युद्धात पूर्ण या नियमांची पायमल्ली केली . आणि इराण , गाझा पट्टीत हल्ले केले . असंख्य लहान मुलं मिसाईल टाकून मारून टाकलीत .

मीनाब मधील शाळेच्या अवशेषांवर आजही गर्दी

इराणच्या दक्षिणेकडील मीनाब शहरातील शजरेह तय्यबेह शाळेवरील भीषण हल्ल्याला सहा महिने पूर्ण झाले आहेत . मात्र या हल्ल्यात आपल्या मुलांना गमावलेल्या पालकांचे दुःख अद्याप कमी झालेले नाही . शाळेची उध्वस्त इमारत आणि मुलांच्या कबरी आजही या दुर्घटनेच्या भयावह आठवणी जाग्या करतात .

मीनाबमधील रहिवाशी या ठिकाणी वारंवार भेट देत असून , आपल्या प्रियजनांच्या आठवणींना उजाळा देत आहेत . अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या सुरवातीच्या काळात हा हल्ला झाला होता . या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली . किमान १५५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते . शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी घडलेल्या या घटनेने स्थानिक नागरिकांमध्येही मोठी अस्वस्थता निर्माण केली आहे .

US Space Academy: अंतराळ युद्धाची तयारी की चंद्र-मंगळावर वर्चस्वाचा प्लॅन? अमेरिकेने केली जगातील पहिल्या ‘स्पेस अकादमी’ची घोषणा

सहा महिने उलटले तरीही पालकांच्या जखमा ताज्याच

हल्ल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी मृत मुलांच्या पालकांसाठी वेळ जणू थांबून राहिल्यासारखा आहे . मुलांच्या आठवणी , त्यांचे शाळेतील दिवस आणि कुटुंबासोबतच्या आठवणी आजही पालकांच्या मनात ताज्या आहेत . अनेक पालक आणि स्थानिक नागरिक शाळेच्या शाळेच्या अवशेषाजवळ तसेच मुलांच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली अर्पण करत आहेत .

उध्वस्त झालेली शाळेची इमारत या हल्ल्याची साक्ष देत आहे . एकेकाकी मुलांच्या आवाजाने गजबजलेला हा परिसर आता शांत झाला आहे . मात्र येथे येणाऱ्या पालकांच्या डोळ्यातून त्यांच्या वेदना स्पष्ट दिसून येतात . मुलांना गमावल्याचे दुःख आजही त्यांना असहाय्य झाले आहे.

Brazil Elections : ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत टीव्ही-रेडिओची सुरु लढाई; लुला आणि फ्लाविओ बोल्सोनारो यांच्यात चुरशीची लढत

संघर्षाची किंमत सामान्य नागरिकांनाच

इराणमधील या घटनेमुळे युद्ध आणि संघर्षाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना कसा बसतो , हे पुन्हा समोर आले आहे . संघर्षाच्या काळात लष्करी लक्षांबरोबर नागरी भाग आणि नागरिकांच्या सुरक्षेतीचा प्रश्नही गंभीर बनतो . शाळकरी मुलांसारखा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने या घटनेचे दुःख अधिक तीव्र झाले आहे .

मीनाबमधील नागरिकांसाठी सहा महिने केवळ कालावधी नाही , तर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थित गेलेले सहा महिने आहेत . मृत मुलांच्या कबरींना भेट देताना पालक त्यांच्या आठवणी जपत आहेत . त्यांच्या मानसिक आणि सामाजिक जखमा दीर्घकाळ राहिल्या आहेत .

Web Title: Iran war six months since the attack on the school grief of parents who lost their children still lingers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Iran US Israel
  • Iran War

संबंधित बातम्या

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा
1

Iran-US Tension : अमेरिकेच्या आर्थिक दबावाविरोधात इराण आक्रमक; सर्व देशांना दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.