Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran war strategy : खामेनेईंनी मृत्यूपूर्वीच रचले होते चक्रव्यूह? इराणच्या सूडाने ट्रम्प-नेतन्याहूंची उडाली झोप; जगाला मोठा इशारा

Ayatollah Ali Khamenei : सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनांतर इराण आक्रमक झाला आहे. अमेरिका-इस्रायलवर सातत्याने हल्ले करत आहे. याच दरम्यान या हल्ल्यांचा आराखडा आधीच आखण्यात आला होता असा दावा केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2026 | 03:32 PM
Iran War Strategy

Iran War Strategy

Follow Us
Follow Us:
  • सर्वोच्च नेत्याच्या बलिदानाचा सूड उगवतोय इराण
  • इस्रायल-अमेरिकेला दिली धमकी
  • युद्ध दीर्घकाळ चालणार
Iran war strategy : तेहरान/ वॉशिंग्टन/जेरुसलेम : मध्यपूर्वेतील इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध (US-Israel Iran War) २२ दिवस उलटून गेले आहे. हे युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर येऊन पोहचले आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत अमेरिका-इस्रायलवर प्रहार सुरु केले. सध्या हे युद्ध थांबण्याचे नाव काही घेईना. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या युद्धाचा प्लॅन खामेनेईंनी आधीच करु ठेवला होता असा दावा केला जात आहे.

Middle East War : जगाचं लक्ष भरकटवलं! इराण युद्धाआड नेतन्याहूंचा ‘राजकीय डाव’; अमेरिकेला युद्धात खेचून साधला मोठा स्वार्थ

मिळालेल्या माहितीनुसार, अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांनी मरणापूर्वीच बॅकअप-प्लॅन तयार केला होता असा इराणी अधिकाऱ्याने खुलासा केला आहे. या खुलाशामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्याने दावा केला आहे की, खामेनेईंनी युद्धाच्या तयारीचे आदेश आधीच दिले होते. यामुळे इराणेन अनेक महिन्यांपर्यंत युद्ध लढू शकते.

काय होता खामेनेईंचा ‘मास्टर प्लॅन’?

इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, इराणची सध्या रणनीती अनेक महिन्यांपूर्वीच खामेनेईंच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली होती. सर्वोच्च नेतृत्त्वावर हल्ला किंवा त्यांची हत्या करण्यात आली तर लष्कराने कोणती पावले उचलावीत याचे नियोजन आधीच करण्यात आले होते.  इराणकडे अद्यापही अनेक गुपित लष्करी क्षमता असून येत्या काळात इस्रायल आणि अमेरिकेचा नाश निश्चित असल्याचा इशारा या अधिकाऱ्याने दिले आहे.

सध्या इराणच्या या अचूक हल्ल्यांमुळे युद्धाचा प्लॅन आधीच ठरवण्यात आला होता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इराणने अमेरिका-इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणा निकामी केल्याचाही गावा केला आहे. इराण सातत्याने हल्ले करत आहे.

इस्रायलवर भीषण प्रहार

इराणने रविवारी(२२ मार्च) इस्रायलच्या दक्षिणेकडील डिमोना आणि अराद या शहरांना शेकडो क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात १०० हून अधिक लोक जखमी झाले असून ६ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे डिमोना हे इस्रायलचे अण्वस्त्र संशोधनाचे केंद्र आहे. या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

अमेरिकेवर प्रहार

इराणने याच वेळी हिंद महासागरात अमेरिकेवरही भीषण हल्ला चढवला आहे. इराणने ब्रिटन अमेरिकेच्या संयुक्त लष्करी तळ डिएगो गार्सियावर दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहे. इराणपासून ४००० किमी अंतरावर असलेल्या तळावर हल्ला झाल्याने इराणच्या लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांची ताकद जगाला समजली आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या चिंतेते अधिक भर पडली आहे.

Middle East War : युद्ध पेटलं! डिएगो गार्सियावर हल्ल्यानंतर ब्रिटन आक्रमक; अरब सागरात धाडली घातक अणु पाणबुडी, इराणचा करणार गेम?

Web Title: Iran war strategy khamenei final plan trump netanyahu tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
1

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
2

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
3

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
4

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.