Middle East War : जगाचं लक्ष भरकटवलं! इराण युद्धाआड नेतन्याहूंचा 'राजकीय डाव'; अमेरिकेला युद्धात खेचून साधला मोठा स्वार्थ (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
1. अमेरिकेचा थेट सहभाग
राजकीय तज्ज्ञांच्या मते, बेंजामिन नेतन्याहूंनी (Benjamin Netanyahu) यांनी इराणला इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका असल्याचे मानले आहे. याचा पार्श्वभूमीवर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडे मदत मागत इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत थेट अमेरिकेचा सहभाग करुन घेतला आहे. यामुळे इस्रायलला महासत्तेचे जागतिक सुरक्षा कवच मिळाले आहे.
२. भ्रष्ट्राचाराच्या खटल्यांपासून सुटका
नेतन्याहू २०१९ पासून अंतर्गत भ्रष्ट्राचाराच्या तीन गंभीर प्रकरणांचा सामना करत आहे. देशातील विरोधकांचा आरोप आहे की, नेतन्याहूंनी इराणविरोधात युद्धाचा फायदा न्यायालयानी कारवाई लांबणीवर टाकण्यासाठी केला आहे. नुकतेच इस्रायलचे राष्ट्रपती हर्झोग यांच्याकडे माफीची विनंती करण्यात आली होती. ज्यामुळे खटल्यांऐवजी पूर्णपणे युद्धावर लक्ष्य केंद्रित करण्यात येईल. शिवाय युद्धाच्या काळात नेतृत्वात कोणताही बदल सहसा केला जात नाही. ज्याचा फायदा नेतन्याहूंनी घेतला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
३. न्यापालिका आणि सत्तेवर नियंत्रण
युद्धाच्या गोंधळात नेतन्याहूंनी न्यायपालिकेचे अधिकार कमी करणारा अजेंडा पुन्हा एकदा उठवला आहे. अटॉर्नी जनरलच्या अधिकाऱ्यांवर मार्यादा आणणे आणि प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवण याचा हेतू आहे. यामुळे युद्धाचा वापर कवच म्हणून केला जात असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
४. पॅलेस्टाईनच्या मुद्यावरुन जगाला भरकटवले
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष मध्यपूर्वेतील इराण (Iran) संघर्षाकडे लागले आहे. यामुळे गाझातील मानवतावादी संकट आणि वेस्ट बँकमधील हिंसाचारावरुन सर्वांचे लक्ष विचलित झाले आहे. इराणवरील हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायही मोठ्या प्रादेशिक युद्धाकडे वळाला आहे. ज्यामुळे उस्रायलवरील पॅलेस्टाईन मुद्द्यावरुन असलेला दबाव कमी झाला आहे.
५. लोकप्रियता आणि सत्तेचे गणित
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेतन्याहूंची लोकप्रियता गेल्या काही काळात अत्यंत कमी झाला होती. यामुळे कठोर प्रशासक म्हणून प्रतिमा पुन्हा उभारण्यासाठी इराण युद्धाचा वापर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेतन्याहूंवरील जनतेचा विश्वास ६०% वरुन ६२% पर्यंत पोहोचला आहे. यामुळे देशांतर्गत निवडणुकांमध्ये पुन्हा सत्ता हाती येण्याची शक्यता आहे. नेतन्याहूंनी इराण युद्धाला राजकीय ढाल बनवले आहे.
Ans: मध्यपूर्वेतील इराण संघर्षामुळे इस्रायलमध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. जनतेचे लक्ष अंतर्गत राजकीय आणि कायदेशीर अडचींपासून विचलित झाले आहे. यामुळे नेतन्याहूंच्या नेतृत्त्वारचा विश्वास काही प्रमाणात वाढला आहे. ज्याचा देशाच्या निवडणुकीत नेतन्याहूंना मोठा फायदा होत आहे.
Ans: बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर २०१९ पासून भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणांमुळे देशात न्यायालयीन प्रक्रियेला त्यांना सामोरे जावेल लागत आहे. तसेच हे टाळण्यासाठी युद्धाचा वापर केला असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.
Ans: इराणसंघर्षामुळे जगाचे लक्ष गाझा आणि वेस्ट बँकमधील परिस्थितीकडून काही प्रमाणात हटले आहे, यामुळे इस्त्रायलवरील आंतरराष्ट्रीय दबाव कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.






