Iran Warning to Muslim Countries Ahead Of Possible U.S. Strike With Shocking Message In Crisis Hour
तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या निर्णायामुळे संपूर्ण जगाला शत्रू बनवून घेतेले आहेच, शिवाय दुसरीकडे इराणसोबतही दिवसेंदिवस संघर्ष वाढत चालला आहे. इराणच्या अणु प्रकल्पांवर आळा घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी वाटाघाटी करण्याची ऑफर दिली होती. मात्र, इराणने ही ऑफर नाकारली. यानंतर ट्रम्प यांनी इराण समर्थित हुथी बंडखोरांवर हल्ला सुरु केला, तसेच इराणलाही नष्ट करुन टाकण्याचा इशारा दिला. त्यांच्या या धमक्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील त्याच भाषेत उत्तर दिले. इराणने देखील आम्ही तुमच्या धक्क्यांना घाबरत नाही असे म्हटले.
या तणावादरम्यान इराणने शेजारील सहा मुस्लिम देशांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणने म्हटले आहे की, जर अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यात कोणत्याही या देशांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली तर याचा गंभीर परिणाम त्यांना भोगावा लागेल. अमेरिकेला मदत करणाऱ्या देशावर इराण कडक कारवाई करेल.
मीडिया रिपोर्टनुसार, इराक, कुवेत, UAE, कतार, तुर्की, आणि बहरीन या देशांना कडक शब्दात इराणने इशारा दिला आहे.
सध्या इराण आणि अमेरिकेतील तणावात दिवसेंदिवस तीव्र वाढ होत आहे. या दरम्यान इराणचा मुस्लिम देशांना दिलेला इशारा युद्धाची सुरुवात असल्याचे म्हटले जात आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इराण युद्धाची तयार करत आहे. इराणने मुस्लिम देशांना अमेरिकेला लष्करी कारवाईसाठी जमीन किंवा हवाई क्षेत्राचा वापर करण्यास परवानगी दिली तर हे इराणविरुद्धचे युद्ध असेल असे म्हटले आहे.
सध्या अमेरिाका इराणवर हल्ल्याच्या तयारीत आहे का? याबाबत इराणला आधीच माहिती मिळाली होती का? इराणने आधीच शेजारी देशांना इशारा का दिला आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान इराणच्या इराक, कुवेत, UAE, कतार, तुर्की, आणि बहरीन या देशांना दिला असून या देशांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणने हेही स्पष्ट केले आहे की, इराण अमेरिकेला त्यांच्या हल्ल्यांचे योग्य ते प्रत्युत्तर देईल, परंतु त्यांच्याविरोधात अमेरिकेला मदत करणाऱ्या देशाला देखील ते सोडणार नाहीत.
इराणने अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास नकार दिला आहे. इराणने ओमानच्या माध्यमातून चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, ओमानच्या माध्यमातून चर्चा झाल्यास दोन्ही देशांमध्ये कोणत्याही दबावाशिवाय, आणि अशांततेशिवाय चर्चा होईल. यापूर्वी देखील ओमानच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली होती.
पंरतु ट्रम्प यांनी यावेळी थेट चर्चा करण्याची ऑफर दिली असून इराणने ही मान्य न केल्यास अमेरिका इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. यामुळे मोठे युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे.