Musk vs Navarro: ट्रम्प टीममध्ये फूट? टॅरिफवरुन मस्क नवारो भिडले, नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयावरुन जागतिक व्यापार क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे अमेरिकेत देखील मोठे वाद सुरु आहेत. दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ टीममध्ये मोठा वादा झाला आहे. ट्रम्प यांचे व्यापर सल्लागार पीटर नवारो यांनी टॅरिफच्या योजनेत मोठी भूमिका बजावली आहे. पण दरम्यान DOGE चे प्रमुख एलॉन मस्क आणि पीटर नवारो यांच्यात मतभेद निर्माण झाले असल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार,डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू आणि टॅरिफच्या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे दोन व्यक्ती एलॉन मस्क आणि पीटर नवारी यांच्या मतभेद होत आहे. 2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी 180 देशांवर सवलतीच्या दरात रेसिप्रोकल टॅक्स लागू केला. यामुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. 2020 नंतरची ही अमेरिकन शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण होती.
दरम्यान पीटर नवारो यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर एलॉन मस्क यांनी नवारो यांच्यावर निशाणा साधला असून त्यांच्या शिक्षणावर तीव्र टिप्पणी केली आहे. मस्क यांनी हार्वर्डमधून इकॉनमध्ये पीएचडी करणे ही वाईट गोष्ट असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवारो यांचे शिक्षण हार्वर्डमधून झाले आहे.
BREAKING: Trump advisor Peter Navarro just attacked Elon Musk on Fox News:
“It was interesting to hear Elon Musk talk about a zero tariff zone with Europe. He doesn’t understand that. And the thing that I think is important about Elon to understand, is he sells cars. That’s… pic.twitter.com/ca1Rl42IG5
— Ed Krassenstein (@EdKrassen) April 6, 2025
एलॉन मस्क यांच्या टिकेनंतर नवारो यांनी एलॉन मस्क यांच्या अमेरिका आणि यूरोपमधील शून्य शुल्कावर भाष्य केले. एलॉन मस्क यांनी अमेरिका आणि यूरोपमध्ये शून्य शुल्काची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, अमेरिका आणि युरोप देश एकत्र पुढे येऊ शकतात, यामुळे दोन्ही देशांत मुक्त व्यापर होईल. पंरतु ट्रम्प यांनी पीटर नवारो यांचा सल्ला मान्य करत युरोपियन युनियनवर 20% कर लादला.
दरम्यान यावर भाष्य करताना नवारो यांनी म्हटले की, एलॉनने फक्त गाड्या विकल्या पाहिजेत, कर क्षेत्राबाबत त्यांना काहीही माहिती नाही आणि जाणून घेण्याची गरज नाही. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठी खळबळ उडाली असून ट्रम्प यांच्या टीममध्ये फूट पडत असल्याचे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता आणखी काय गोंधळ निर्माण होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.