Iran’s Economy Declining Amid Political Uncertainty and Popular Discontent
तेहरान: सध्या इराण मोठ्या संकटात आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेसोबत तणाव वाढत असून देशाची परिस्थिती बिघडत आहे. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तेल उत्पादनांवर निर्बंध लादले. अशा परिस्थितीत इराणचे सर्वोच्चे नेते खामेनेईंनी मोठा धक्का बसला आहे. दरम्यान इराणच्या न्यायाधीशांनी देशाच्या परिस्थितीबाबत मोठा खुलासा केला आहे. इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालले असल्याचे म्हटले आहे.
इराणमधील वाढती महागाई
इराणच्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गुलाम हुसैन मोहसेनी इजेई यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराण आता राहण्यालायक देश राहिलेला नाही. सध्या इराणची अर्थव्यवस्था कमकुवत होत चालली आहे. देशातील चलानाचे मूल्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जवळपास 30% पर्यंत महागाई वाढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2019 पासून महागाईचा दर प्रत्येक वर्षी 40% वाढत चालला आहे.
यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. मुख्य न्यायाधीश मोहसेनी ईजेई यांच्या मते, लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. सरकारच्या सर्व शाखांनी सुधार करण्यासाठी वर काम करणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी देशातील गुंणवणूकदारांना पाठिंबा देण्याची गरज अधोरेखित केली आहे.
इराणमधील अन्य समस्या
इराण महागाई व्यतिरिक्त भ्रष्टाचाराच्या संकटातही सापडला आहे. देशातील अनेक मोठ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून खामेनेई सरकार देशातील या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अमेरिकेसह इतर देशांचे निर्बंध
इराणवर अमेरिका आणि इतर पाश्चत्य देशांनी कठोर व्यापर निर्बंध लादले आहेत. अण्वस्त्रे बनवल्यामुळे आणि अशांतता पसरवल्यामुळे इराणला अनेक निर्बंधाचा सामना करावा लागत आहे. शिवाय, गाझापट्टीत सुरु असलेल्या हमास-इस्त्रायल युद्धामुळे देखील इराणचे इस्त्रायलसोबत तणाव वाढत आहे. शिवाय इराणचे तुर्कीसोबतही संबंध बिघडत चालले आहेत. दोन्ही देशांमध्ये सीमावाद सुरु आहे.
इराण मोठ्या संकटात
सध्या इराणसमोर अनेक मोठ्या अडचणी आहेत. आर्थिक संकट, महागाई, भ्रष्टाचार, इस्त्रायल आणि अमेरिकेसोबत तणाव, तुर्कीसोबत सीमावाद, व्यापारावर जागतिक निर्बंध यासर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन विस्कळीत होत चालले आहे. याशिवाय इराणवर मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. विशेष करुन महिलांवर हिजाब सक्तीच्या निर्णयावरुन मोठा गोंधळ सुरु आहे. महिलांच्या हक्कांच्या उल्लंघनाचा इराणवर अनेकवेळा आरोप करण्यात आला आहे. मात्र, इराणने सतत हे आरोप फेटाळून लावले आहेत.