इराणी गायकाला हिजाबविरोधी गाणे गायल्याने तुरुंंगवासाची शिक्षा; तेहरान न्यायालयाचा निर्णय(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान: इराणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणी गायक मेहदी यार्ही याला इराणी सरकारच्या हिजाबविरुद्ध कायद्याबद्दल आवाज उठवल्यामुळे शिक्षा देण्यात आली आहे. या इराणी गायकाला तुरुंगवास सुनावण्यात आली आहे. तसेच त्याला शरिया कायद्यानुसार 74 कोडे मारण्याची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. इराणमध्ये सर्व कायदा आणि सुवस्था शरिया कायद्यानुसार कार्य करते.
महिलांना हिजाब काढण्यास प्रोत्साहित केले
मिळालेल्या माहितीनुसार, इराणी गायक मेहदी यार्ही याला महिलांना हिजाब काढण्यास प्रोत्साहित करणारे गाणे गायल्याबद्दल ही शिक्षा देण्यात आली आहे. सिंगरच्या वकिलाने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली. इराणी सरकारच्या हिजाब कायद्यांविरोधात निदर्शनांना पाठिंबा, तसेच महिलांना हिजाबविरोधाक प्रोत्साहित करणारे गाणे गायल्याने मेहदील शिक्षा देण्यात आली आहे.
त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 42 वर्षीय यार्ही यांनी ऑगस्च 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. आता तेहरान क्रांतिकारी न्यायालयाने यार्ही यांनी 2 वर्षे 8 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना 74 कोडे मारण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यार्ही यांच्या शिक्षेचा एक वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे. त्यांना दंडही ठोठवण्यात आला आहे.
Converting one year of #MehdiYarrahi‘s imprisonment to electronic bracelet
Zahra Minoui, the lawyer of pop singer Mehdi Yerahi, announced this news and wrote: “Following the submission of the case of my client, Mr. Mehdi Yarrahi, to the execution branch, due to his illness and… pic.twitter.com/ns477ZuPHK
— Ali Naseri (@alireigns1011) February 26, 2024
मेहदी यारहीने कोणते गाणे गायले?
इराणी गायक मेहदी यार्ही याने प्रसिद्ध गाणे ‘रुसारितो’ गाणे गायले आणि रिलीज केले. हे गाणे रिलीज केल्यानंतर चार दिवसांत यार्हीला अटक करण्यात आली.
इराणवर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप
इराणवर अनेकदा मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे, विशेषत: महिलांच्या हक्कांचे उल्लंघनाचा अनेकवेळी आरोप झाला आहे. मात्र, इराणने सतत हे आरोप फेटाळून लावले आहेत. मानवी हक्क संघटनांनी आणि जागतिक समुदायाने महिलां विरोधातील इराणच्या कायद्यांचा अधिकारांवर आघात म्हटले आहे. हे कायदे महिलांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालतात, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. परंतु इराण सरकारने स्पष्ट केले आहे की हिजाबची संस्कृती टिकवणे आणि महिलांना विशिष्ट ड्रेस कोडचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हा या कायद्यांचा मुख्य उद्देश आहे.