Iran's Sunni leaders call on world Muslims to unite against Israel
Israel Iran War news Marathi : तेहरान : इस्रायल आणि इराणच्या १२ दिवसांच्या संघर्षावर आता विराम लागला आहे. परंतु या युद्धात माघार न घेतल्याने जगभरातील मुस्लिमांमध्ये इराणची छाप बदलले आहे. सध्या संपूर्ण जगातील मुस्लिमांनकडून इराणच्या शिया मुस्लिमांची वाह वाह होत आहे. संपूर्ण युद्धात इराणचे शिया बहुसंख्य लोक जगातील सुन्नी मुस्लिमांची पसंती बनत आहे. गेल्या काही काळात शिया आणि सुन्नी मुस्लिमांमधील तणाव देखील निवळल आहे.
याच वेळी इराणने सुन्नी मुस्लिमांना इस्रायलविरोधी येण्याचे आवाहन केले आहे. जगातील सर्व सुन्नी मुस्लिमांनी शिया मुस्लिमांसोबत हात मिळवणी करावी. यामुळे आपली ताकद बळकट होईल आणि इस्रायलला नष्ट करता येईल असे इराणच्या शिया मुस्लिमांनी म्हटले आहे.
सुन्नी मुस्लिमांनी युद्धविरामानंतर एक निवेदन जारी केली आहे. या निवेदनात इराणच्या घडामोडींचे वर्णन करण्यात आले आहे. इराणच्या अलीकडच्या इस्रायलविरोधी कारवाईमुळे भू-राजकीय वळण आल्याचे यामध्ये म्हटले आहे. तसेच ‘कुफ्र’वर इस्लामच्या ऐतिहासिक विजय म्हणून संबोधले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, हा इस्लामिक रिपल्बिकचा आणि जगातील इस्लामिक देशांचा विजय असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
याशिवाय निवेदनात इस्रायलविरोधी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी इस्रायलला कर्करोग म्हणून संबोधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्रायलचा गाजावरील सततचा ताबा आणि पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांचा निषेध केला आहे. तसेच इस्रायल राजव्यवस्थेतचे बेकायदेशीर अस्तित्व घेत आहे तसेच निरापराध लोकांचा रक्क सांडत आहेत असे निवेदनात म्हटले आहे.
इराणच्या शिया मुस्लिमांनी कुराणचा हवाला देत, सुन्नी धर्मगुरुंना तसेच संपूर्ण जगातील मुस्लिम समुदायाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. विशेष करुन तरुणांना, विचारवंतांना आणि इस्लामिक देशांच्या नेत्यांना इस्रायलच्या अतेरिकी हल्ल्याविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. इस्लामाच्या सन्मानासाठी आणि अल-कुद्सच्या पावित्र्याच्या रक्षणासाठी हे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. इस्लामच्या शत्रूंविरुद्ध प्रतिकार करणे प्रत्येक मुस्लिमांचे धार्मिक आणि नैतिक कर्तव्य आहे. यामुळे इस्लामिक जगाने मजबूत, एकजूट आणि दृढनिश्चयी होण्याची वेळ आली आहे.