Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणची डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘Gaza Plan’ वर तीव्र टीका; अयातुल्ला खामेनेई म्हणाले…

डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेऊन तेथे वसाहती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या प्लॅनाला युरोपीय देशांकडून विरोध होत आहे. याच दरम्यान इराणने देखील तीव्र टिका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2025 | 06:30 PM
Iran's top leader Ayatollah Khamenei criticizes Donald Trump's 'Gaza Plan'

Iran's top leader Ayatollah Khamenei criticizes Donald Trump's 'Gaza Plan'

Follow Us
Follow Us:

तेहरान: सध्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये गाझाचा पुनर्विकासावरुन मोठे युद्ध सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेऊन तेथे वसाहती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या धोरणाला अनेक युरोपीय देशांकडून विरोध होत आहे. याच दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी देखील ट्रम्प यांच्या गाझा प्लॅनवर तीव्र टीका करत विरोध केला आहे.

गाझा प्लॅन मूर्खतापूर्ण

खामेनेई यांनी म्हटले आहे की, गाजा आणि पॅलेस्टाईनसाठी अमेरिकेची योजना मूर्खतापूर्ण असून ती कधीही यशस्वी होणार नाही. त्यांनी म्हटले की, “ट्रम्प यांनी अल्पावधीत प्रतिरोध संपवण्याचा दावा केला होता, ते आता प्रतिरोधक लढणाऱ्यांकडून आपल्या कैद्यांच्या छोट्या गटांची देवाणघेवाण करत आहेत आणि यासाठी मोठ्या संख्येने पॅलेस्टाईनी कैद्यांना सोडत आहेत.” अशी माहिती चीनच्या सिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझाच्या पुनर्विकासास सुरुवात; ‘या’ मुस्लिम देशाने आखली महत्वपूर्ण योजना

खामेनेई यांनी इस्लामिक जिहाद चळवळीचे महासचिव जियाद अल-नखलेह आणि त्यांच्या प्रतिनिधींचे तेहरानमध्ये स्वागत केले. यावेळी नखलेह यांनी इराणचे प्रतिरोधासाठी पाठिंब्याबद्दल आभार मानले. यावर खामेनेई यांनी, “आता जागतिक जनमत पॅलेस्टाईनच्या बाजूने असल्यामुळे गाजा आणि प्रतिरोधकांच्या सहमतीशिवाय कोणतीही योजना यशस्वी होणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

ट्रम्प यांचा प्रस्ताव

डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच गाझाच्या पॅलेस्टिनी नागरिकांना शेजारील देशांमध्ये हलवण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार, गाझा सोडणाऱ्या लोकांना परतण्याची मुभा दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने कठोर टीका केली आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. नेतन्याहू म्हणाले की, “ही योजना इस्रायलसाठी अनेक संधींची दारे उघडेल.”

इस्त्रायल हिजबुल्लाह युद्धविराम

दरम्यान, इस्रायलचे सैन्य दक्षिण लेबनानच्या काही भागांतून परतले आहे, मात्र काही ठिकाणी अद्याप त्यांची उपस्थिती आहे. हिजबुल्लाहसोबत झालेल्या युद्धविराम करारानुसार, माघारीसाठी दिलेली वेळ संपली असूनही इस्रायलने 18 फेब्रुवारीपर्यंत माघार टाकण्याचे निश्चित केले आहे.

हिजबुल्लाहचे महासचिव नईम कासिम यांनी धमकी दिली की, “इस्रायलने दिलेल्या वेळेत पूर्ण माघार घ्यावी, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.” इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्त्रायल काट्ज यांनी सैन्याच्या तैनातीला दुजोरा दिला असून हिजबुल्लाहने कोणतेही उल्लंघन केल्यास गंभीर कृतीचे संकेत दिले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘लुला दा सिल्वा यांना विष देण्याचे षड्यंत्र’; ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Irans top leader ayatollah khamenei criticizes donald trumps gaza plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Gaza
  • iran
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.