
Islamic school building collapse in Indonesia killed 1 stundent
मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या ईस्ट जावा प्रांतातील सिदोअर्जो येथील अल-खोजिनी येथे ही घटना घडली. यावेळी विद्यार्थी दुपारची नमाज पठण करत होते.या दुर्घटनेत एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ६५ लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, लष्करी दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्माचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचाव कार्य सुरु असून मलबा हटवण्याचे कार्य सुरु आहे. आठ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले. पण अजून काही विद्यार्थी मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मलब्यात अडकले विद्यार्थ्यांमध्ये १२ ते १७ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी पालकांची व स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेची वाट पाहत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या इमारतीवर अनाधिकृतपणे अतिरिक्त मजल्याचे बांधकाम सुरु होते. यामुळे बांधकामादरम्यान छत आणि भिंती कोसळल्या.सध्या घटेची चौकशी सुरु आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याच वेळी शाळेचे प्रमुख अब्दुस सलाम यांनी सांगितले की, मूळ इमारत ही तीन मजली होती. त्यावर अजून एक मजला वाढवण्याचे नियोजन करण्यात आले होते. घटनेच्या दिवशी तिसऱ्या मजल्यावर कॉंक्रीट ओतण्याचे कार्य सुरु होते, यावेळी अचानक ही घटना घडली. तिसऱ्या मजला खाली कोसळले. यावेळी सर्वात खालच्या मजल्यावर प्रार्थना सुरु होती. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी नमाड अदा करत होते.
तज्ज्ञांच्या मते, या दुर्घटनेमागे शाळेच्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम सामग्री व अनधिकृत विस्तार जबाबादार आहे. इमारत जीर्ण झाली असताना बांधकाम सुरु करण्यात आले होते, ज्यामुळे ही घटना घडली. यामुळे शाळेच्या प्रशासनावर तीव्र टीका केली जात आहे. या घटनेने संपूर्ण इंडोनेशिया हादरला आहे.
प्रश्न १. इंडोनेशियात काय आणि कुठे दुर्घटना घडली?
इंडोनेशियाच्या ईस्ट जावा प्रांतातील सिदोअर्जो येथील अल-खोजिनी येथे इस्लामिक बोर्डिंग स्कूलची इमारत कोसळली आहे.
प्रश्न २. इंडोनेशियाती दुर्घटनेत किती जीवितहानी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी नमाज पठण करत असताना ही घटना घडली आहे, यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखील अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रश्न ३. काय आहे इंडोनेशियातील दुर्घटनेचे कारण?
इंडोनेशियाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेची मूळ इमारत तीन मजली असून त्यावर आणखी अनधिकृत बांधकाम सुरु होते. तसेच यामध्ये वापरलेली सामग्री ही निकृष्ट दर्जाची असले, ज्यामुळे ही घटना घडली.