Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bible Prophecy : केवळ निसर्गचक्र नाही! धार्मिक ग्रंथांतील ‘प्रलयाच्या’ खुणा इस्रायलमध्ये? ‘या’ भविष्यवाण्या झाल्या खऱ्या

Israel इस्रायलमधील नेतिवोट शहरात मधमाश्यांच्या थव्यामुळे गोंधळ उडाला. सोशल मीडियावर याला 'आपत्तीचे चिन्ह' म्हटले गेले, मात्र तज्ज्ञांच्या मते ही एक नैसर्गिक घटना आहे. यापूर्वी तेल अवीवमध्येही कावळे दिसले होते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 17, 2026 | 03:00 PM
israel bees crows swarm netivot tel aviv prophecy bible quran signs 2026

israel bees crows swarm netivot tel aviv prophecy bible quran signs 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • निसर्गाचा प्रकोप की दैवी संकेत?
  • धार्मिक ग्रंथांचे संदर्भ
  • तज्ज्ञांचा खुलासा

Bible prophecies Israel insects 2026 : सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इस्रायलकडे लागलेले आहे, मात्र यावेळी कारण युद्ध नसून काही ‘विचित्र’ नैसर्गिक घटना आहेत. दक्षिण इस्रायलमधील नेतिवोट (Netivot) शहरात नुकताच निसर्गाचा एक असा अवतार पाहायला मिळाला, ज्याने आधुनिक विज्ञानालाही विचार करायला भाग पाडले आहे. हजारो मधमाश्यांच्या थव्याने अचानक शहरावर ताबा मिळवला, रस्ते अडवले आणि वाहनांवर हल्ले केले. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होताच, यामागे काहीतरी ‘दैवी’ किंवा ‘अशुभ’ संकेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

नेतिवोटमध्ये मधमाश्यांचे तांडव: विमान वाहतूकही विस्कळीत!

स्थानिक वेळेनुसार, मधमाश्यांच्या या महाभयंकर थव्याने नेतिवोटच्या रहिवासी भागावर हल्ला केला. केवळ लोकच नाही, तर रस्त्यावरून जाणारी वाहनेही या मधमाश्यांनी वेढली होती. परिस्थिती इतकी गंभीर होती की, काही काळ स्थानिक विमान वाहतूकही सुरक्षिततेच्या कारणास्तव थांबवावी लागली. इस्रायली प्रशासनाला तातडीने विशेष पथके पाचारण करावी लागली. ही केवळ एक कीटकांची हालचाल नसून, तो एक संघटित हल्ला वाटत होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal-India Border: नेपाळमध्ये बालेन शाह यांची मोठी ‘घेराबंदी’! भारतीय वाहनांना प्रवेशासाठी मोजावे लागणार पैसे; सीमेवर तणाव वाढला

बायबल आणि कुराणमधील ‘त्या’ ओळींची चर्चा

या घटनेनंतर सोशल मीडियावर एका वेगळ्याच युद्धाला सुरुवात झाली आहे. अनेक वापरकर्ते याला सामान्य निसर्गचक्र मानण्यास तयार नाहीत. बायबलमधील यशया ७:१८ (Isaiah 7:18) या वचनाचा संदर्भ दिला जात आहे, ज्यात प्रलयाच्या वेळी कीटकांच्या थव्यांचा उल्लेख आहे. तसेच, कुराणमधील सूरह अल-अराफ (Surah Al-A’raf) मधील त्या भागाचा हवाला दिला जात आहे जिथे टोळधाड, बेडूक आणि रक्ताच्या पावसाला ‘इशारा’ मानले गेले आहे. नेतिवोटमधील मधमाश्या आणि यापूर्वी तेल अवीवमध्ये दिसलेले हजारो कावळे, हे सर्व इस्रायलच्या विनाशाचे संकेत असल्याचे दावे नेटिझन्स करत आहेत.

🫣 🐝 In the Israeli city of Netivot, tens of thousands of bees swarmed a shopping center Operations were paralyzed, and emergency services had to step in to handle the situation. pic.twitter.com/U2afOlZYCZ — NEXTA (@nexta_tv) April 15, 2026

credit – social media and Twitter

कावळ्यांचे सावट आणि प्रादेशिक तणाव

काही आठवड्यांपूर्वी तेल अवीवच्या आकाशात हजारो कावळ्यांनी मांडलेले फेर धरले होते. ज्यू संस्कृती आणि अनेक लोककथांमध्ये कावळ्यांना मृत्यू किंवा संकटाचे दूत मानले जाते. हमास, हिजबुल्लाह आणि इराणशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या नैसर्गिक घटनांना ‘अशुभ’ मानले जात आहे. नागरिक याकडे केवळ योगायोग म्हणून न पाहता, भविष्यातील मोठ्या युद्धाची किंवा नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना म्हणून पाहत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Airbus H130 crash : इंडोनेशियामध्ये मोठा विमान अपघात! बोर्नियोच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले; 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

विज्ञान काय सांगते?

दुसरीकडे, पर्यावरणाशी संबंधित तज्ज्ञांनी या सर्व दाव्यांना पूर्णपणे नाकारले आहे. तज्ज्ञांच्या मते, मधमाश्यांचे थवे तयार होणे ही एक प्रजनन प्रक्रिया (Swarming) असू शकते किंवा हवामानातील अचानक बदल आणि अन्नाचा शोध यामुळे कीटक आणि पक्षी अशा प्रकारे मोठ्या संख्येने एकत्र येतात. हे दावे केवळ धार्मिक अन्वयार्थ असून त्यांचा विज्ञानाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, श्रद्धेच्या आणि भीतीपोटी पसरलेल्या अफवांच्या वादळात विज्ञानाचा आवाज सध्या क्षीण पडताना दिसत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलमधील मधमाश्यांच्या घटनेला 'चिन्ह' का म्हटले जात आहे?

    Ans: सोशल मीडियावर या घटनेला बायबल आणि कुराणमधील आपत्तीच्या इशाऱ्यांशी (भविष्यवाण्यांशी) जोडले जात असल्याने, लोक याला संकटाचे चिन्ह मानत आहेत.

  • Que: तेल अवीवमध्ये कावळ्यांच्या थव्याचा काय अर्थ काढला जात आहे?

    Ans: कावळ्यांचे अचानक मोठ्या संख्येने येणे हे प्रादेशिक संघर्ष आणि येणाऱ्या युद्धाचे प्रतिकात्मक संकेत असल्याचे काही लोकांचे मत आहे.

  • Que: शास्त्रज्ञांचे या घटनांबद्दल काय मत आहे?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, या नैसर्गिक पर्यावरणीय घटना असून हवामान बदल किंवा प्रजननामुळे घडतात, यांचा धार्मिक भविष्यवाण्यांशी थेट संबंध नाही.

Web Title: Israel bees crows swarm netivot tel aviv prophecy bible quran signs 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Israel
  • Prophecy
  • World news

संबंधित बातम्या

US Defense : युद्धाच्या वणव्यात शस्त्रसाठा भरून काढण्यासाठी GM आणि Ford मैदानात; ट्रम्प प्रशासनाचा ‘मिशन वेपन’ धमाका
1

US Defense : युद्धाच्या वणव्यात शस्त्रसाठा भरून काढण्यासाठी GM आणि Ford मैदानात; ट्रम्प प्रशासनाचा ‘मिशन वेपन’ धमाका

Nepal-India Border: नेपाळमध्ये बालेन शाह यांची मोठी ‘घेराबंदी’! भारतीय वाहनांना प्रवेशासाठी मोजावे लागणार पैसे; सीमेवर तणाव वाढला
2

Nepal-India Border: नेपाळमध्ये बालेन शाह यांची मोठी ‘घेराबंदी’! भारतीय वाहनांना प्रवेशासाठी मोजावे लागणार पैसे; सीमेवर तणाव वाढला

Airbus H130 crash : इंडोनेशियामध्ये मोठा विमान अपघात! बोर्नियोच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले; 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO
3

Airbus H130 crash : इंडोनेशियामध्ये मोठा विमान अपघात! बोर्नियोच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले; 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

Uranium Crisis: ट्रम्पचा ‘युरेनियम दावा’ अवास्तव कल्पना; इराणने पुन्हा उघडपणे उडवली अमेरिकेची खिल्ली, कराराचेही केले खंडन
4

Uranium Crisis: ट्रम्पचा ‘युरेनियम दावा’ अवास्तव कल्पना; इराणने पुन्हा उघडपणे उडवली अमेरिकेची खिल्ली, कराराचेही केले खंडन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.