Israel Hamas war update attack on gaza killed 41
Israel Attack on Gaza : जेरुसेल : इस्रायलने पुन्हा एकदा गाझा शहरावर तीव्र हल्ले सुरु केले आहे. यावेळी इस्रायली सैन्याने जमिनीमार्गे कारवाई सुरु केली असून या हल्ल्यात ४१ जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी रात्री हे हल्ले सुरु झाले असून अद्यापही सुरुच आहेत. यामुळे पॅलेस्टिनी लोकांनी तातडीन स्थलांतर करण्यासही सुरुवात केली आहे. मंगळवारी (१६ सप्टेंबर) इस्रायलने गाझावरील हल्ल्याची पुष्टी केली.
आतापर्यंत ३ लाखाहूंन अधिक लोक शहर सोडून गेसे आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी हे हल्ले हमासला संपुष्टात आणण्यासाठी सुरु करण्यात आले आहेत. त्यांचे सैन्य बंधकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर पूर्ण ताकदीने हल्ला करण्यात आला आहे.
संरक्षण मंत्री काट्झ यांनी सांगितले आहे की, ओलिसांची सुटका होईपर्यंत गाझावरील हल्ले थांबणार नाहीत. गेल्या महिन्यात गाझाला पूर्णपणे ताब्यात घेण्याच्या योजनेला परवानगी मिळाल्यानंतर इस्रायलने गाझातील मोहीम तीव्र केली आहे. यामुळे गाझावर पूर्णपणे ताबा मिळवल्याशिवाय इस्रायली सैन्य मागे हटणार नसल्याचे काट्झ यांनी म्हटले. सध्या ६० सैनिकांना पुन्हा ड्युटीवर बोलण्यात आले असून त्यांना गाझात तैनात केले जाणार आहे. योजनेनुसार तब्बल १.३० लाख सैनिक गाझात तैनात होतील असे काट्झ यांनी सांगितले.
यापूर्वी इस्रायलने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ७५% भागावर ताबा नियंत्रण मिळवले आहे. पण अजूनही काही इस्रायली ओलिस हमासच्या ताब्या असल्याचा संशय असल्याने कारवाई केली जात आहे.
इस्रायलने आता उर्वरित २५% भागावर ताबा मिळवण्यास सुरुवातकेली आहे. या भागांमध्ये ओलिसांना ठेवण्यात आले असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. यातील २० जण जिंवत असून २८ जण मारले गेले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायलच्या मते, हमासचे जाळे केवळ गाझातच नसून जगभरातील कतार, सीरिया, लेबनॉन, कतार, येमेन आणि ट्युनिशिया, तुर्की अशा अनेक भागांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलने कतारची राजधानी दोहावर हल्ला केला होता. यामध्ये दोहातील हमासच्या कार्यालयाला आणि वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करण्यात आले होते. परंतु इस्रायलचा हा प्लॅन फसला आणि हमास नेत्यांनी हल्ल्यापूर्वी तिथून पळ काढला.
तर दुसरीकडे कतारने इस्रायलच्या हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. कारण मध्यपूर्वेत कतार हा अमेरिकेचा जवळचा मित्र असून कतारमध्ये त्यांचे लष्करी तळही आहेत.
इस्रायलने पुन्हा गाझावर का केले हल्ले?
इस्रायसच्या मते, अजूनही गाझामध्ये हमासचे काही भागांत वर्चस्व आहे. तसेच काही इस्रायली ओलिसही त्यांच्या ताब्यात आहेत. यामुळे इस्रायलने हमासविरोधी कारवाई पुन्हा सुरु केली आहे
इस्रायली हल्ल्यात किती जीवितहानी?
मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलच्या गाझावरील पुन्हा सुरु झालेल्या हल्ल्यात ४१ जण ठार झाले आहेत. तर २०२३ पासून सुरु असलेल्या युद्धात १३०० हून अधिक लोक मरण पावले आहेत.
इस्रायलचा तब्बल सहा इस्लामिक देशांवर हल्ला; सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू, हजारो जखमी