Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Hezbollah War: इस्त्रायलाचा लेबनॉनच्या बेरुत भागात विध्वंस; हवाई हल्ल्यात 29 जण ठार

इस्त्रायली हल्लांमुळे लेबनॉनच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. इस्त्रायलने पुन्हा एकदा मध्य बेरुतच्या बस्ता भागामध्ये हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 25, 2024 | 01:51 PM
Israel Hezbollah War: इस्त्रायलाचा लेबनॉनच्या बेरुत भागांत विध्वंस; हवाई हल्ल्यात 29 जण ठार

Israel Hezbollah War: इस्त्रायलाचा लेबनॉनच्या बेरुत भागांत विध्वंस; हवाई हल्ल्यात 29 जण ठार

Follow Us
Close
Follow Us:

बेरुत: इस्त्रायली हल्लांमुळे लेबनॉनच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. इस्त्रायलने पुन्हा एकदा मध्य बेरुतच्या बस्ता भागामध्ये हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने 24 नोव्हेंबरला बेरुतच्या बस्ता भागांतील एका बहुमजली इमारतीवर लक्ष्य केले आहे. यामध्ये एकूण 29 जण टार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा हल्ला लेबनॉनमधील एक विनाशकारी घटनांपैकी एक होता. याने संपूर्ण लेबनॉन हादरले आहे.

12 हिजबुल्ला कमांड सेंटर्सना लक्ष्य

इस्त्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यांमध्ये बेरूतच्या दक्षिणेकडील दहेह भागातील 12 हिजबुल्ला कमांड सेंटर्सना लक्ष्य केरण्यात आले आहे. हिजबुल्ला गटाचे गुप्तचर युनिट, समुद्रातून प्रक्षेपित क्षेपणास्त्र युनिट आणि पोझिशन्स समाविष्ट असलेल्या युनिट 4400 या शस्त्रास्त्र तस्करी करणाऱ्या तळांवरही हल्ले इस्त्रायलने केले आहेत. यामुळे हिजबुल्ला गटाची दहशतवादी हल्ल्यांची योजना आणि अंमलबजावणी करण्याच्या कार्यक्षमता कमी झाल्याचे इस्त्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली 250 रॉकेट्स; तेल-अवीवच्या तळांना लक्ष्य करत दिले चोख प्रत्युत्तर

ISRAEL JUST BOMBED LEBANON:CONVERTED THE LAND INTO HELL☠️ 🗓24.11.2024 Israel launched airstrikes in Southern Beirut, Lebanon targeting many areas including residential buildings in Ghobeiry area dismantling infrastructures.
Injuries & deaths reported.#Beirut #BeirutMassacre pic.twitter.com/JX1xHY1gM0
— Barbarik (@Sunny_000S) November 24, 2024


लेबनॉनच्या इतर भागातही इस्त्रायलचा विध्वंस

लेबनॉनमधील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, बेरुतमधील मृतांची संख्या 20 वरून 29 झाली आहे. बचाव पथकांनी ढिगारा हटवून बचावकार्य सुरू ठेवले आहे, मात्र जोरदार गोळीबार आणि हल्ल्यांमुळे बस्तामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय, इस्त्रायली हल्ल्ये पूर्व लेबनॉनच्या बालबेक-हर्मेल भागापर्यंत देखील पसरले आहेत. शमिस्तरावरील हल्ल्यात चार मुलांसह 13 जणांचा मृत्यू असून इतर ३२ जण जखमी झाले आहेत. तसेच दक्षिण लेबनॉनमधील टायर शहरावरही हल्ला करण्यात आला. यात पाच जण ठार झाले आणि 19  जण जखमी झाले.

वाढता संघर्ष

इस्त्रायल-हिजबुल्लाह संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. आत्तापर्यंत या संघर्षात अनेक हिजबुल्ला कमांडर्स मारले गेले. तसेच लेबनॉनच्या पायाभूत सुविधांचेही या हल्ल्यांमुळे गंभीर नुकसान झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या संघर्षात 3000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. यामुळे मानवीय संकट अधिक तीव्र झाले आहे. हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

हिजबुल्लाहचे इस्त्रायलला चोख प्रत्युत्तर 

हिजबुल्लाहने एक आठवडाभर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांचे  प्रत्युत्तर दिले आहे. इस्त्रायलवर हिजबुल्लाहने 250 रॉकेट्स डागली असून हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. हिजहुल्लाहने 7 ऑक्टोंबर 2023 नंतर हा सर्वात मोठा हल्ला आहे. हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या तेल-अवीवमधील इस्त्रायलच्या गुप्त स्थळांवर देखील हल्ले केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कुर्स्क भागांतील युक्रेनच्या हल्ल्यात उत्तर कोरियाचे 100 हून अधिक सैनिक ठार; रशियाचे कीववर ड्रोन हल्ले

Web Title: Israel hezbollah war israel destroys parts of beirut lebanon 29 killed in airstrike nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 01:51 PM

Topics:  

  • Hezbollah
  • Israel

संबंधित बातम्या

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
1

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
2

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.