फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सियोल: रशियाच्या पश्चिम कुर्स्क भागांवर युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये उत्तर कोरियाचे 500 सैनिक मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती ग्लोबल डिफेन्स कॉर्पने दिली. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राचा वाप या हलल्यांमध्ये केला होता. उत्तर कोरियाने रशियाला 10,000 हून अदधिक सैन्य मदत पुरवली होती. या सैनिकांमधील काही सैनिक कुर्स्कमधील लढाईत मालरे गेल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले.
कुर्स्कमधील 40% भाग आता रशियाच्या ताब्यात
मीडिया रिपोर्टनुसार, रशियावरील युक्रेनच्या हलल्यानंतर कुर्स्क भागामध्ये रशियाने लष्करी कारवाया करण्यास सुरूवात केली आहे. रशियान सैन्याने युक्रेनियन सैन्याला पळवून लावले आहे. यामुळे युक्रेनने कुर्स्कमध्ये घेतलेल्या 40% भाग रशियाने पुन्हा मिळवला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या ताब्यात कुर्स्क प्रतांतील 1376 चौरस किमी होती. यामधील 800 चौरस किमी भाग रशियाने परत मिळवला आहे.
कुर्स्क क्षेत्रातून युक्रेनियन सैन्याला बाहेर काढणे- रशियाचा उद्देश
कुर्स्कमधील युक्रेनचा हल्ला रशियन हल्ले थांबविण्याचा आणि पूर्व युक्रेनमधील डोनेस्क प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी होता. सुरुवातीला युक्रेनला यश मिळाले होते, परंतु रशियन सैन्याने पुन्हा डोनेस्क आणि लुहान्स्क प्रदेशामध्ये प्रगती साधली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, पुतिनचा मुख्य उद्देश डॉनबासच्या पूर्ण काबीजासोबत कुर्स्क क्षेत्रातून युक्रेनियन सैन्याला बाहेर ढकलणे आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
रशियाने उत्तर कोरियाचे सैन्य तैनात केले
रशियाने कुर्स्कमध्ये सुमारे 11 हजार उत्तर कौरियाचे जवान तैनात केले आहे. मात्र, युक्रेनच्या या दाव्यावर रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. सध्या युक्रेनमध्ये 5.75 लाख रशियन सैनिक तैनात असून रशिया ही संख्या वाढवण्याची शक्यता आहे. याशिवाय, रशियन सैन्य युक्रेनच्या डोनेस्तक भागांमध्ये भूदली पुढे जात आहे. रशियन सैन्याने डोनेस्तकमधील संरक्षण रेषा ओलांडली आहे. तसेच रशियन सैन्य रोज डोनेस्तकच्या कुर्खोव्ये भागामध्ये 200 ते 300 मीटर पुढे जात आहे. युक्रेनच्या पोकरोव्स्क लॉजिस्टिक सेंटरपर्यंत पोहोचण्यासाठी हे क्षेत्र रशियाने महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
कीववर ड्रोन हल्ले
या दरम्यान, रशियाने युक्रेनच्या राजधानी कीववर ड्रोन हल्ले केले, तर युक्रेनियन हवाई संरक्षण यंत्रणेने 10 ड्रोन नष्ट करून प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेनने दावा केला आहे की, एका रात्रीत त्यांनी 73 ड्रोन पाडले, तर रशियाने कुर्स्क भागात देखील ड्रोन हल्ला रोखला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता 1000 दिवसांच्या वर पोहोचले आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या संघर्षाचे जगभर लक्ष लागले आहे, आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, त्यांच्या अध्यक्षतेखाली या युद्धाचा अंत होईल.