Israel Iran War Four iranian weapons that will destory whole world
Israel Iran War News Marathi: सध्या इराण आणि इस्रायलमदील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला होता. यानंतर इराणने देखील प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरु केली. याच वेळी इराणच्या काही धोकायादक शस्त्रांस्त्रांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या शस्त्रास्त्रांमुळे इस्रायलमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायलचे नव्हे तर पाश्चत्य राष्ट्रांमध्ये देखील भीती निर्माण झाली आहे. यामुळे पाश्चत्य देश सतर्क आहेत.
इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, इराण संपूर्ण जगाला नष्ट करण्याच्या तयारीत आहे. यासाठी इराणकडे अशी चार शस्त्रे आहेत, ज्यांच्यापुढे कोणताही देश गुडघे टेकण्यास मजबूर होईल. इस्रायलने दावा केला आहे की, इराणकडे अशी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आहेत जे एक झटक्यात संपूर्ण परिसराला नष्ट करु शकतात. आज आपण इराणकडे नेमकी अशी कोणतीही शस्त्रे आहेत आणि किती ताकदवर आहेत हे जाणून घेणार आहोत.
इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडे २००० किलोमीटरपेक्षा लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहे. ही जमिनीवरुन मार करणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहे. यामझ्ये शेकडो किलोपेक्षा अधिक स्फोटके भरता येतात. याशिवाय ही क्षेपणास्त्रे पिन पॉइंट टार्गेटवरही डागले जाऊ शकता. या क्षेपणास्त्रांनी इराणने इस्रायलच्या अनेक नागरिकांचा बळी घेतला आहे. तसेच अनेक निवासी क्षेत्रे उद्ध्वस्त केली आहेत.
याशिवाय इराणची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे आत्मगातकी यूव्ही ड्रोन. इस्रायलने दावा केला आहे की, इराणने या ड्रोन्सचा वापर नागरिकांवर हल्ला करण्यासाठी केला आहे. तसेच हे ड्रोन्स स्वस्त असल्याने सहजपणे तयार केले जाऊ शकतात. ही शस्त्रे आधी जमिनीवर आदळतात आणि मग नंतर अचानक यांचा स्फोट होतो. हा स्फोट इताका मोठा असतो की, यामुळे ड्रोन फेकलेल्या आसापासच्या परिसरात १० किलोमीटरपर्यंत याचा आवाज होतो. शिवाय याचे गंभीर परिणामही होतात.
इराकजे सर्वात धोकादायक असणारे आणि अत्याधुनिक शस्त्र म्हणजे क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. ही क्षेपणास्त्रे रडारवर अचूक हल्ला करतात करतात. या क्षेपणास्त्रांचा वापर शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करण्यासाठी करता येतो. यामुळे शत्रूचे हवाई संरक्षण यंत्रणा एका झटक्यात उद्ध्वस्त होते. इराणने या क्षेपणास्त्रांचाही वापर हल्ल्यात केला असल्याचा दावा इस्रायलच्या सुरक्षा दलांनी केला आहे.
सध्या इराणच्या अणु कार्यक्रमांवरुनच इस्रायल-इराणमध्ये युद्ध सुरु आहे. हे सर्वात धोकादायक शस्त्र आहे. सध्या इराणने आपली आण्विक शस्त्रे बनवण्याची गती वाढवली आहे. इराणतडे १५ अणुबॉम्ब बनण्याइतका युरेनियमचा साठा आहे. ही आण्विक शस्त्रे संपूर्ण जगाच्या विनाशासाठी तयारी केली जात असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे इस्रायलने इराणचे अणुतळ नष्ट करत आहे.