Israel Iran War From bunker Missile attack on Israel as soon as Khamenei gave a warning
Israel Iran War News marathi : तेहरान : इस्रायल आणि इराणमध्ये 13 जून रोजी लष्करी संघर्ष सुरु झाला होता. या संघर्षामुळे मध्य पूर्वेत अशांततेचे वातावरण पसरलेले होते. या लष्करी संघर्षाची सुरुवात इस्रायलने इराणच्या अणु तळांवर, शास्त्रज्ञांवर आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला करुन सुरु केली. इराणच्या अणु प्रकल्पाला रोखण्यासाठी इस्रायलने इराणवर हल्ले सुरु केले होते. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने देखील इस्रायलवर हल्ला केला.
या संघर्षात इस्रायलचे 23 नागरिकांचा तर इराणच्या 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बंकरमध्ये लपून आपला जीव वाचवला होता. सध्या दोन्ही देशांमध्ये 12 दिवसांच्या युद्धानंतर विराम लागला आहे. परंतु सध्या अनेक मोठ्या आणि धक्कादायक घटनांचा खुलासा होत आहे.
याच वेळी अयातुल्ला अली खामेनी जर बंकरमध्ये लपून बसले होते, तर इस्रायलविरोधातील हल्ले नेमके कोण आहे आणि कसे हाताळत होते याचा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयातुल्ला अली खामेनी बंकरमध्ये बसून संपूर्ण कारभार हाताळत होते. इराणचे रिव्होल्यूशनरी गार्डचे माजी कमांडर आणि खामेनी यांचे जवळचे मोहसेन रेझाई यांनी याचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी बंकरमध्ये बसून सर्व कामकाज पाहत होते.
रेझाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 12 दिवसांच्या युद्धादरम्यान अली खामेनी बंकरमध्ये लपून बसलेले होते. यावेळी त्यांनी बाहेरच्या केवळ दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अली खामेनी यांनी आर्मी चीफ जनरल अब्दुल रहिम मोसावी आणि खतम अल अनमबिया सैन्य युनिटचे प्रमुख अली शदामानी यांच्याशी संपर्क साधला होता. या दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांना सर्व आदेश देण्यात येते होते.
इस्रायलवर कशा पद्धतीने हल्ला करायचा, केव्हा आणि कुठे कारायचा यावर या दोन अधिकाऱ्यांनमार्फत खामेनींनी नजर ठेवली होती. 13 जून रोजी इस्रायलने इराँणनर हल्ला केला होता. त्यावेळी इस्रायलच्या हल्ल्यानंतर तातडीने या दोन अधिकाऱ्यांच्या मार्फ खामेनींना सुरक्षित बंकरमध्ये हालवण्यात आले होते. युद्धाच्या संपूर्ण काळात बंतकरमधून खामेनी यांनी अचूक आणि नियंत्रित रणनीती इस्रायवर अवलंबवली. त्यांनी केवळ अब्दुल रहिम मोसावी आणि खतम अल अनमबिया यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पूर्ण हल्ल्याची रणनीती सांगितली होती.
शिवाय खामेनी यांनी युद्ध काळात नवीन कमांडरची प्रत्यक्ष देखील घेतली नाही. त्यांच्या सुरक्षेट्या कारणास्तव असे करण्यात आले होते. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत इस्रायलींना खामेनींचा तपास लागला असता, कारण इस्रायली इराणच्या सर्व लष्करी अधिकाऱ्यांवर कड पाळत ठेवून होते.यामुळे खामेनींनी सर्व अधिकाऱ्यांशी कोणत्याही मार्फत संपर्क टाळला होता. केवळ या दोन्ही अधिकाऱ्यांना अंतिम निर्णय घेण्याची मंजुरी खामेनींनी दिली होती.सध्या त्यांच्या या गुप्त रणीतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.