इराणचे माजी प्रिन्स रझा पलहवी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Iran News in marathi : तेहरान : इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता थांबले आहे. परंतु अद्याप इराणच्या अडचणी संपलेल्या नाहीत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली अली खामेनी यांची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये अंतर्गत प्रयत्न सुरु असून आता बाह्य देशांचाही समावेश होत आहे. इस्रायल आणि अमेरिकेने देखील खामेनींना पायउतार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोन्ही देशांच्या हा प्रयत्न असफल ठरला आहे.
आता इराणचे माजी राजाचे सुपुत्र प्रिन्स रझा पहलवी इराणमध्ये सत्ता बदलून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी अनेक विदेशी बैठकांचे आयोजन केले आहे. विशेष करुन सध्या रझा पहलवी यांनी ब्रिटनला भेट दिली आहे. सध्या ते लंडनमध्ये असून ब्रिटिश राजकारण्यांना भेट देते आहेत. सोमवारी (१ जुलै) त्यांनी ब्रिटिश खासदांराचे भेट घेतली आहे.
या भेटीदरम्यान त्यांनी इराणी नागरिकांसाठी देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्यावर चर्चा केली. यासाठी ब्रिटनकडून पहलवी यांना पाठिंबा देखील मिळाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रझा पहलवी यांनी १ जुलै रोजी ब्रिटिश संसदेत खासदारांनी इराणमधील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. तसेच त्यांनी इराणमधील राजवट बदलण्याची योजना देखील सादर केली. ज्याला ब्रिटिश खासदारांकडून पूर्णपण पाठिंबा मिळत आहेत.
यापूर्वी देखील युद्धादरम्यान पहलवी यांनी इराणच्या जनतेला पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यांनी खामेनींवर इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, सध्याच्या युद्धपरिस्थितीला खामेनी जबाबदार आहे, त्यांनी यावरील संपूर्ण नियंत्रण गमावले आहे. तसेच पहलवी यांनी युद्धावेळी खामेनी घाबरलेल्या उंदरासारखे ते भूमिगत झाल्याचीही टीका केली होती. यामुळे मोठा वाद सुरु झाला होता. खामेनी लोकशाहीसाठी धोका निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
The regime in Iran calls for “Death to the UK.” It’s not just a threat to the Iranian people but British people, too. I’m in London, meeting with political leaders to urge them to support the Iranian people’s fight for a secular, democratic Iran. It’s in both of our interests. pic.twitter.com/HbItBrjrhi
— Reza Pahlavi (@PahlaviReza) June 30, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, पलहवी ब्रिटिश खासदारांना इराणमधील सद्य परिस्थितीची, शासनाची माहिती देत आहे. यामध्ये धर्निरपे्क्ष लोकशाहीसाठी बदल करण्याची त्यांची इच्छा असून रणनीती देखील त्यांनी आखली आहे. युद्धादरम्यान देखील त्यांनी ब्रिटिश खासदारांशी काही बैठका घेतल्या होत्या. तसेच त्यांनी ब्रिटिश खासदारांशी बोलताना म्हटले की, केवळ इराणी नागरिकांसाठी नाही तर ब्रिटिश लोकांसाठी देखील धोका निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या हितासाठी इराणमध्ये लोकशाही आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.