अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! इराण-इस्रायलमध्ये ट्रम्प गुंतलेले असताना उत्तर कोरियाच्या जासूसांची वॉशिंग्टनमध्ये घुसखोरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : एक मोठी खळबळजनक घटना समोर येत आहे. उत्तर कोरियाचे गुप्तहेर अमेरिकेत घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमधील युद्धात व्यस्त असताना उत्तर कोरियाने याचा फायदा घेतला आहे. उत्तर कोरियाने एक मोठी सायबर गुप्तहेरांचे जाळे अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये उभे केले आहे.
उत्तर कोरियाने बनावट कागदपत्रे, एआय टूल्स आणि ओळखपत्रे उत्तर कोरियाचे एजंट अमेरिकेच्या प्रमुख टेक कंपन्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. यामधून मिळणारे पैसे थेट उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्र प्रकल्पांसाठी वापरले जात आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या संपूर्ण नेटवर्कचा खुलासा केला आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकन कंपन्यांमध्ये दूरुस्ती कामगार म्हणून नोकऱ्या मिळवल्या. त्यांनी बनवट कागदपत्रांचा वापर केला. मुलाखती दरम्यान एआय टूल्सच्या मदतीने खरे उमेदवार म्हणून सादर केले. यामध्ये कॅलिफोर्नियातील एका संरक्षण कंपनीतही उत्तर कोरियाच्या गुप्तहेरांनी एन्ट्री केली आहे. एआय प्रकल्पाशी संबंधित फाइल्स या गुप्तहेरांनी परदेशात पाठवल्या आहे.
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील 16 राज्यांमधील कंपन्यांमध्ये उत्तर कोरियाचे हे जाळ पसरलेले आहे. त्यांनी याची झडती घेतली असताना 200 लपटॉप, डझनभर आर्थिक खातील आणि बनावट बेवसाईट्सची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत उत्तर कोरियाने मोठे डिजिटल नेटवर्क स्थापन केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे एफबीआयला या तपासणीदरम्यान अमेरिकन नागरिकांचा देखील सहभाग सापडला आहे. याअंतर्गत एका अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर उत्तर कोरियाच्या नागरिकांना अमेरिकन कंपन्यांची माहिती पुरवल्याचा आरोप आहे. उत्तर कोरियाच्या आयटी कर्मचाऱ्यांना बनावट बेबसाईट आणि बॅंक खाती बनवण्यातही मदत केली आहे. या योजनेतून उत्तर कोरियाने 5 दशलक्ष डॉलर्स कमावले आहे.
उत्तर कोरियाच्या नागरिकांवर दोन अमेरिकन कंपन्यांच्या 900 दशलक्ष डॉलर्स किमतीचे व्हर्च्युअल चलन चोरल्याचा आरोप आहे. तसेच क्रिप्टो करन्सी आणि मनी लॉंड्रिंगचा देखील आरोप उत्तर कोरियाच्या नागरिकांवर आहे. या गुप्तहेरांनी व्हर्च्युअल माहिती हॅक करुन पैसे कमवले आहेत. उत्तर कोरियाच्या या कृत्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये आधीच बिघडलेले संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे.