Israel Iran War Hezbollah, Hamas, Houthis... Why did Iran's friends abandon their support during the war with Israel
israel Iran War News Marathi : एक आवड्यपासून इस्रायल आणि इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. या युद्धात अमेरिका इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे. तसेच फ्रान्स, इटली, जर्मनी, यांरख्या देशांकडूनही इस्रायलला पाठिंबा मिळत आहे. परंतु इराणला ना इस्लामिक देशांकडून पाठिंबा मिळत आहे नाही त्यांच्या मित्र संघटनांनकडून पाठिंबा मिळत आहे. गेल्या चार दशकांत इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरोधात मोठी गुंतवणूक केली आहे. हमास, हिजबुल्ला, हुथी, शिया अशा संघटनांना अमेरिका इस्रायलविरोधी तयार केले. परंतु संकटाच्या काळात या मित्रांनी साथ सोडली आहे.
इस्रायलचे इराणवरील हल्ले क्रूर झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या मित्रांनी मौन पाळले आहे. सीरियाचे शासन बदल्याने देखील इराण लढाईत एकटा पडत चालला आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाह, गाझातील हमा, येमेनमधील हुथी आणि इराकमधील शिया मिलिशियांना इराणकडून आतापर्यंत पाठिंबा मिळत राहिली. परंतु सध्याच्या कमकुवत परिस्थितीत या मित्रांना इराणला एकटे पाडले आहे.
Israel-Iran War: “पुढील आठवड्यात भयानक…”; ट्रम्पच्या विधानाने इराणची हवा टाईट तर, खामेनींची एक वीत….
लेबनॉनमधील हिजबुल्लाहला इराणचा प्रॉक्सी गट मानले जाते. या गटाने अनेकवेळी इस्रायलने केहरानवर केलेल्या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले आहे. परंतु २०२३ नंतर इस्रायलशी सुरु झालेल्या युद्धामुळे या गटाची क्षमता कमकुवत झाली आहे. गेल्या वर्षी इस्रायली हल्ल्यात गटाचे प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यू झाला. यामुळे हिजबुल्लाहला मोठा धक्का बसला आहे. सध्या या संघटनेची ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही. यामुळे हिजबुल्लाह सध्या इराणला मदत करण्याच्या स्थितीत नाही.
गाझातील हमास संघटना हा एक पॅलेस्टाईन लोकांचा ग्रुप आहे. हा इराणच्या सर्वात जवळचा मानला जातो. परंतु इस्रायलच्या हल्ल्यामुळे हा गटही कमकुवत झाला आहे. इस्रालने हमासच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार केले आहे. यामुळे हमास इराणला मदत करण्याच्या स्थितीत नसून इस्रायलच्या इराणी हल्ल्यावर या संघटनेने मौन पाळले आहे.
गेल्या महिन्यांत इस्रायलच्या गाझातील कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हुथींनी इस्रायलवर तीव्र हल्ले केले होते. तसेच लाल समुद्रातील इस्रायलच्या जहाजांना ही लक्ष केले. परंतु त्यानंतर ही संघटना शांत झाली आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेने हुथींच्या तळांवर हल्ले केले होते. यामध्ये हुथींचे मोठे नुकसान झाले. यानंतर हा गट सध्या अंडग्राउंड झाला असल्याचे मानले जात आहे.
इराणकमधील शिया लढवय्यांनी इराणला अनेकवेळा साथ दिली आहे. परंतु यामुळे त्यांना अमेरिकेच्या कारवायांना सामोरे जावे लागले आहे. इराणी हितसंबंधांचे रक्षण आणि बगदादमध्ये तेहराना प्रभाव या गटामुळे झाला आहे. परंतु अकीडच्या काही काळात परिस्थितीत बदलली आहे. शिया लढवय्यांना इस्रायली हल्लाचे निषेध करणारे निवेदन जारी केले आहे, परंतु इराणला पाठिंब्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच इराकचे पंतप्रधान यांनी मिलिशिया लढवय्यांना संघर्षपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
सध्या इराणच्या बाजूने रशिया आणि चीनने समर्थन दर्शवल आहे. इराण, रशिया, चीन आणि उत्तर कोरिया एकत्र येऊन गट तयार होत आहे. अमेरिका हा या देशांचा शत्रू आहे, यामुळे हे देश अमेरिकेच्या मित्र देशांविरोधात इराणला साथ देत आहेत.
Israel Iran War: इस्रायल आणि इराणमधील तणावात वाढ; अमेरिकेचे ‘डूम्सडे विमान’ हाय अलर्टवर मोडवर