इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेची उडी (फोटो- ani)
Donald Trump: सध्या इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर भीषण स्वरूपाचे हल्ले करत आहेत. युद्धजन्य स्थितीमुळे मध्यपूर्वेत तणाव प्रचंड वाढला आहे. या युद्धात अमेरिका देखील इस्त्रायालच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी असा इशारा दिला आहे. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानाने इराणची चिंता वाढली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘Next Week Will Be Very Big’ असे विधान केले आहे. या विधानाने इराणवर कोणते संकट ओढवणार हे पहावे लागणार आहे. त्यामुळे इराणचे प्रमुख खामेनी यांची देखील चिंता वाढली आहे. या आठवड्यात खूप मोठे काहीतरी घडणार असे ट्रम्प म्हणाले आहेत.
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष भीषण झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर भीषण हल्ले करत आहेत. इस्त्रायलने इराणच्या अणूभट्टीवर देखील हल्ला केल्याचे समजते आहे. आता या युद्धात अमेरिका देखील उडी घेऊ शकते.
इस्रायलचा इराणच्या अणुभट्टीवर तीव्र हल्ला
सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्ध अधिक पेटले आहे. नुकतेच इस्रायलने इराणच्या अणु भट्टीवर तीव्र हल्ला केला आहे. इराणमधील अरक हेवी वॉटर रिॲक्टरवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इराणचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे, मात्र अद्याप इराणकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
गुरुवारी सकाळी इराणने इस्रायलच्या बिरशेबा येथील सोरोका रुग्णलायवार हल्ला केला होता. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी संताप व्यक्त केला होता. यानंतर इस्रायलने अरक आणि खोंडूब शहरांमधील लोकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या काही नंतरच इस्रायलने इराणच्या अणुभट्टीवर हल्ला केला.
इराणने इस्रायलच्या तेल अवीव, बेरशेबा, मत गान आणि होलोन या चार इस्रायली शहरांवर देखील क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात १७६ जखमी झाले आहेत, अनेक अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.
दरम्यान इराणच्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला आहे. इराण जाणूनबुजून त्यांच्या नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आतापर्यंतच्या हल्ल्यात २४ इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इराणी लोकांच्या मृत्यूची संख्या ६३९वर पोहोचली आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत.
इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी देखील इस्रायली संरक्षण दलांना तेहरानमधील इराणी धोरणात्मक प्रतिष्ठांवर देखील हल्ला करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे अयातुल्लाची राजवट कमकुवत होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
इस्रायल आणि इराणमधील हा संघर्ष गेल्या सात दिवसांपासून सुरु आहे. १३ जून रोजी इस्रायलने केलेल्या इराणच्या अणु तळांवरील, तसेच लष्करी कमांड सेंटर्सवर हल्ला केला होता. त्यानंतर इराणने देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरु केली. सध्या दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.