Israel Iran War: इस्रायल आणि इराणमधील तणावात वाढ; अमेरिकेचे 'डूम्सडे विमान' हाय अलर्टवर मोडवर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War news marathi: इस्रायल आणि इराण युद्धात धगधगत आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. नुकतेच इस्रायलले इराणच्या अणु भट्टीवर तीव्र हल्ले केले आहेत. तर इराणने देखील इस्रायलच्या रुग्णलायांवर तीव्र हल्ले केले आहे. या युद्धाच्या वाढत्या पार्श्वभूमीवरच अमेरिका देखील हाय अलर्टवर आहे.
नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे डूम्सडे विमान E-4B वॉशिंग्टनमध्ये उतरवण्यात आले आहे. सध्या इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे विमान बाहेर काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. मध्य पूर्वेत सध्या युद्धामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थिती हा संघर्ष थांबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
यासाठी अमेरिकेसह जगातील अनेक देश इस्रायल आणि इराणला संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा इराणला हल्ले थांबवण्याचा इशारा दिला आहे. पंरतु इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच इस्रायल आणि इराण दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत यामुळे मध्य पूर्वेत तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे हे डूम्सडे प्लेन अणु आणि विद्युत चुंबकीय हल्ले रोखण्यासाठी सक्षण आहे. या विमानत हवेतही इंधन भरता येते. या विमानाची गुप्त लष्करी संप्रेषण प्रणाली आहे. जागतिक आपत्कालीन परिस्थितीत अमेरिकन सैन्यासाठी हे विमान मोबाईल कमांड सेंटर म्हणून काम करते. या विमानाला नाईट वॉट म्हणूनही ओळखले जाते. हे विमान अणुस्फोटांना रोखण्यात डिझाइन करण्यात आले आहे. बुधवारी (१८ जून) अमेरिकन हवाई दलाच्या ई-४बी विमानाने लुईझियानाहून व्हर्जिनियामार्गे उड्डाण केल्याचे दिसून आले. सध्या या विमानाने वॉशिंग्टन डीसीच्या डॉइंट बेस ॲंड्र्यूज येथे उतरले आहे. सध्या इराण आणि इस्रायसमधील युद्धादरम्यान या विमानाची चर्चा सुरु आहे.
नुकतेच इस्रायलने इराणच्या अणु भट्टीवर तीव्र हल्ला केला आहे. इराणमधील अरक हेवी वॉटर रिॲक्टरवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इराणचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे, मात्र अद्याप इराणकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच इस्रायलच्या सुरक्षा दलाने अरक आणि खोंडूब शहरांमधील लोकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. या परिसरात इराणची गेवी वॉटर अणुभट्टी आहे. हा इराणच्या अणु कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तसेच या भागात इराणच्या शस्त्रास्त्रांचे उत्पादनही केले जाते.