Israel-Iran War Israel killing top Iranian army officers with mobile phone
Israel Iran War News Marathi: जेरुसेलम : मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. दोन्ही देशांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यामध्ये इराणचे गंभीर नुकसान झाले आहे. इस्रायलच्या हल्ल्याविरोधात इराणने देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. यामुळे तीव्र युद्ध भडकण्याची शक्यता आहे.
१३ जून रोजी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या आण्विक तळांना, उच्चायुक्तालयांना आणि वरिष्ठ कमांड सेंटर्सना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलने इराणवर ‘प्रीएम्प्टिव स्ट्राईक’ करत त्यांच्या अनेक वरिष्ठ कमांडर्सवर हल्ला केला. यामध्ये इराणच्या सशस्त्र दलांचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी आणि इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सचे (IRGC) प्रमुख कमांडर हुसैन सलामी यांचा मृत्यू झाला. शिवाय २० हून अधिक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेल्याचा दावा देखील केला जात आहे. अनेक वैज्ञानिक शास्त्रज्ञांनाही ठार करण्यात आले आहे.
दरम्यान या अधिकाऱ्यांची हत्या ना ड्रोन, ना ही क्षेपणास्त्र ना बॉम्बने करण्यात आली आहे. यासाठी इस्रायलने एक खतरनाक शस्त्र वापरले आहे. इस्रायलने मोबाई फोन लोकेशन ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर केला आहे. याचा वापर करुन इस्रायली सैन्य इराणच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहे. फोर्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कोणत्याही अधिकाऱ्याने फोन बंद ठेवला तरी इस्रायल त्यांचे लोकेशन ट्रॅक करत आहे.
या कारणामुळे इराणच्या अधिकाऱ्यांना ट्रॅकिंग टाळण्यासाठी फोन न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तेहरानच्या खासदाराने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात इराणच्या लष्करी अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे मोबाईल न वापरण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारची हेरगिरी किंवा लोकेशन ट्रेस होणार नाही. सध्या यामुळे इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
गेल्या चार दिवसांपासून हा तणाव वाढत चालला आहे. इस्रायल आणि इराण दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. अशातच इराणमध्ये आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात तेहरानमधील सीवज पाईपलाई फुटल्याने रस्त्यांवर, लोकांच्या घरात घाणेरडे पाणी साचले आहे. यामुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. तसेच हा तणाव थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांनी इस्रायल आणि इराणला संयम बाळगण्याचे आवाहान केले आहे. परंतु दोन्ही देशांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.