Israel Iran War Israeli attack on Iran's most brutal prison 71 people died with Prisoners
Israel Iran War News marathi : तेहरान : इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांचा संघर्ष सध्या निवळला आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. अशातच अनेक धक्कादायक खुलासे देखील होत आहेत. नुकतेच इराणच्या युरेनियम साठा सुरक्षित असल्याच्या खुलाशाने मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. इस्रायलने इराणच्या सर्वात क्रूर आणि कुप्रसिद्ध तुरुंगावर तीव्र हल्ला केला होता. यामध्ये ७१ जणांचा मृत्यू झाला होता.
इराणच्या न्यायव्यवस्थेने रविवारी (२९ जून) इस्रायलने गेल्या आठवड्यात तेहरानच्या सर्वात क्रुप्रिसद्ध एविन तुरुंगावर हल्ला केला होता.या हल्ल्यात ७१ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये कैंद्यांसह राजकीय कार्यकर्त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही राजकीय कार्यकर्त्यांना इस्रायलपासून वाचवण्यासाठी तुरुंगात लपवण्यात आले होते. परंतु इस्रायलच्या हल्ल्यामुळे यामध्ये कर्मचारी, सैनिक, कैदी आणि कैद्यांना भेटायला आलेल्या कुटुंबीयांचा बळी गेला. परंतु न्यायव्यवस्थेच्या या दाव्याची अद्याप इराणने पुष्टी केलेली नाही.
इस्रायल आणि इराणमध्ये 24 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली. या युद्धबंदीच्या एक दिवसापूर्वी २३ जून रोजी इराणच्या तुरुंगावर हल्ला झाला. यावेळी इराणचे मंत्री जहांगीर यांनी सांगितले की, काही जखमींवर घटनास्थळी उपचार करण्यात आहे. तर काही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावर न्यूयॉर्कस्थित सेंटर फॉर ह्यूमन राईट्सने इस्रायलने केलेल्या हल्ल्यावर तीव्र टीका केली होती.
इस्रायलने १३ जून रोजी इराणच्या महत्त्वाच्या इराणी लक्ष्यांवर हल्ला केला. तसेच इराणच्या अणुशास्त्रज्ञानां आणि लष्करी अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केले. यामध्ये ७२० हून अधिक लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. यातील ३० कमांडर तर ११ अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याचा दावा इस्रायलमे केला आहे. वॉशिंग्टनमधील मानवाधिकार संघटनेने १००० हून लोकांनी इस्रायली हल्ल्यात जीव गमावल्याचे म्हटले आहे.
सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीनंतर दोन्ही देशात तणाव कायम आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणवर अणु करारासाठी आंतरराष्ट्रीय दबावाच्या प्रयत्न आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमांविरोधातच इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले केले होते. इराणच्या फोर्डो, नेतान्झ, इस्फाहन या तीन प्रमुख अणु तळांवर हल्ला केला होता. यामध्ये इराणच्या अणुप्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला होता. परंतु इराणने यावर कोणतेही मोठे नुकसान न झाल्याचे म्हटले होते. शिवाय इराणने हल्ल्यापूर्वीच आपला युरेनियमचा साठा सुरक्षित ठिकाणी हलवला असल्याचेही अनेक अहवालांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.