हे आधुनिक युद्धाचे उत्कृष्ट उदाहरण...; 'ऑपरेशन सिंदूर'ची रॉयल एअर फोर्सने केली वाह वाह (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Operation Sindoor News Marathi : बॅंकॉक : थायलंडच्या हवाई हलाच्या रॉयल फोर्सने भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहे. थाई दलाच्या रॉयल फोर्सने भारताच्या या मोहीमेचे आधुनिक युद्धाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून वर्णन केले आहे. थाई हवा दलाने याचे विश्लेषण देखील केले आहे. यामध्ये भारताच्या हवाई दलाचे भरभरुन कौतुक करण्यात आले आहे.
थायलंडच्या रॉयल थाई एअर फोर्सने (RTAF) ने भारताच्या ऑपरेशन सिंदूरला आधुनिक युद्धाचे एक मास्टरक्लास उदाहरण म्हणून संबोधले आहे. एका विशेष सैन्य परिषदेदरम्यान आरटीएफने भारतीय हवाई दलाच्या या ऑपरेशनची आणि भारताच्या रणनीतिक श्रतेची प्रशंसा केली आहे. आरटीएफच्या वरिष्ठ अधिकारी सोमई लीलिथम यांनी म्हटले की, भारतीय हवाई दलाने अतिशय अचूकतेने पाकिस्तानच्या आता खोलवर असलेल्या लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. यामुळे भारतीय हवाई दलाचे जागतिक स्तरावर आपला मान वाढवला आहे.
थाईलँडने भारताच्या रडार- इव्हेसिव्ह मार्गांचा, स्वदेशी ॲंटी- रेडिएशन क्षेपणास्त्रांचा आणि रिअल-टाइम बॅटल मॅनेजमेंट सिस्टीमचाही विशेष उल्लेख परिषदेत केला. भारताने S-400 प्रणालीद्वारे ३१४ किमी अंतरावरुन पाकिस्तानचे विमान पाडले होते. हा भारतासाठी जागतिक विक्रम असल्याचे थायलंडच्या थाई रॉयल फोर्सने म्हटले. यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षणातील कमकुवतपणा उघडकीस आला. तसेच त्यांच्या खोटारडेपणा आणि दहशतवाद्याला पाठिंब्याचा खुलासा झाल्याचे रॉयल फोर्सने म्हटले.
याशिवाय भारताने केवळ पारंपारिक युद्धातील हत्यारच नव्हे, तर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर सुरक्षा आणि मल्टी-लेयर डिफेन्स यंत्रणेचा देखील प्रभावी वापर केल्याचे रॉयल फोर्सने म्हटले.तसेच भारतीय वायुसेनेन चीनची बनावट संरक्षण प्रणाली आणि चीनचे HC -9 क्षेपणास्त्र देखील नष्ट केले. भारताच्या S-400, IACCS प्रणाली आणि हाय स्पीड लो-एल्टीट्यूडने पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेला संपूर्ण उद्ध्वस्त करुन टाकले.
पहलगाम हल्ला
भारताच्या जम्मू आणि काश्मीर येथील पहलमाग येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ निरापराध पर्टकांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण देशभरातून बदल्याची मागणी केली होती. यानंतर भारताच्या हवाई दलाने ९ मे रोजी पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर अचूक हल्ले केले.
यामध्ये शेकडो दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यानंतरही पाकिस्तानने देखील भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. परंतु यामध्येही भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता असे म्हटले जाते. परंतु भारताने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांच्या लष्करी तळांवर हल्ला करत अचूक कारवाई केली.